राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ

(हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)

राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ किंवा हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ भारताच्या हैदराबाद महानगरातील प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हा विमानतळ हैदराबाद शहराच्या २२ किमी दक्षिणेस शमशाबाद ह्या गावाजवळ स्थित आहे. २३ मार्च २००८ रोजी वाहतूकीस खुला करण्यात आलेला हा विमानतळ सरकारी-खाजगी भागेदारीद्वारे बांधण्यात आलेला भारतामधील दुसराच विमानतळ होता. हा नवा विमानतळ वापरात आल्यानंतर हैदराबादमधील अपूरा पडत असलेला व शहराच्या मध्यभागात असलेला बेगमपेट विमानतळ नागरी वाहतूकीसाठी बंद करण्यात आला.

राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ
आहसंवि: HYDआप्रविको: VOHS
HYD is located in तेलंगणा
HYD
HYD
तेलंगणामधील स्थान
नकाशा
माहिती
विमानतळ प्रकारसार्वजनिक
मालकभारतीय विमानतळ प्राधिकरण
प्रचालकजीएमआर हैदराबाद इंटरनॅशनल एरपोर्ट लिमिटेड
  • जीएमआर ग्रूप
  • मलेशिया एरपोर्ट्स
  • तेलंगणा सरकार
  • ए.ए.आय.
कोण्या शहरास सेवाहैदराबाद
स्थळशमशाबाद, तेलंगणा, भारत
हब
समुद्रसपाटीपासून उंची२,०२४ फू / ६१७ मी
संकेतस्थळहैदराबाद.एरो
धावपट्टी
दिशालांबीपृष्ठभाग
फूमी
०९L/२७L१३,९७६४,२६०डांबरी
०९R/२७R१२,४६७३,८००डांबरी[२]
सांख्यिकी (एप्रिल २०१२-मार्च २०१३)
प्रवासी आवागमन८३,००,४६९
विमान उड्डाणोत्तलन९०,१५१
सामान (टन)७९,२३६
स्रोत: ए.ए.आय.[३][४][५]
येथे थंबलेले जेट एरवेझचे बोईंग ७३७ विमान

आंध्र प्रदेशचा दिवंगत मुख्यमंत्री वाय.एस. राजशेखर रेड्डी ह्याने हैदराबाद विमानतळाला भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी ह्यांचे नाव दिले. सध्या हा विमानतळ भारतामधील सर्वोत्तम विमानतळांपैकी एक मानला जात असून येथून भारतामधील सर्व प्रमुख शहरांसाठी थेट प्रवासी सेवा उपलब्ध आहे.

राजीव गांधी विमानतळ हैदराबाद शहरासोबत एका ११.६ किमी लांबीच्या द्रुतगती महामार्गाद्वारे जोडला गेला आहे.

विमानकंपन्या व गंतव्यस्थाने

विमान कंपनीगंतव्य स्थान .
एर अरेबियाशारजा
एर कोस्टाबंगळूर, चेन्नई, कोइंबतूर, तिरुपती, विजयवाडा, विशाखापट्टणम
एर इंडियाअहमदाबाद, बंगळूर, चेन्नई, शिकागो, दिल्ली, दुबई, जेद्दाह, कोलकाता, कुवेत, मुंबई, मस्कत, पुणे, तिरुपती, विजयवाडा, विशाखापट्टणम
एरएशियाक्वालालंपूर
ब्रिटिश एरवेझलंडन
कॅथे पॅसिफिकहाँग काँग
एमिरेट्सदुबई
एतिहाद एरवेझअबु धाबी
फ्लायदुबईदुबई
गल्फ एरबहरैन
इंडिगोआगरताळा, अहमदाबाद, बंगळूर, भुवनेश्वर, चेन्नई, कोइंबतूर, दिल्ली, दुबई, गोवा, गुवाहाटी, इंदूर, जयपूर, कोची, कोलकाता, लखनौ, मुंबई, पुणे, रायपूर, त्रिवेंद्रम, विशाखापट्टणम
जेट एरवेझअबु धाबी, अहमदाबाद, दम्मम, कोची, मंगळूर, मुंबई, वडोदरा
जेट एरवेझ
चालक: जेटकनेक्ट
बंगळूर, चेन्नई, दिल्ली, जयपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, पुणे, राजमहेंद्री
मलेशिया एरलाइन्सक्वालालंपूर
ओमान एरमस्कत
कतार एरवेझदोहा
सौदियादम्मम, जेद्दाह, रियाध
सिल्कएरसिंगापूर
स्पाइसजेटअगरतला, अहमदाबाद, बंगळूर, चेन्नई, कोइंबतूर, दिल्ली, गोवा, कोची, कोलकाता, मदुराई, मंगळूर, मुंबई, पुणे, राजमहेंद्री, तिरुपती, विजयवाडा, विशाखापट्टणम
थाई एरवेझबँकॉक
टायगरएरसिंगापूर
व्हिस्टारादिल्ली

संदर्भ

बाह्य दुवे

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत