हरिद्वार

भारताच्या उत्तराखंड राज्यातील एक शहर.


हरिद्वार हे भारताच्या उत्तराखंड राज्यातील एक शहर आहे.हरिद्वार जिल्ह्याचे मुख्य ठिकाण(मुख्यालय) आहे. हरिद्वार शहर उत्तराखंडच्या दक्षिण भागात गंगा नदीच्या काठावर वसले आहे व ते राजधानी देहरादूनच्या ५० किमी नैऋत्येस स्थित आहे. २०११ साली हरिद्वारची लोकसंख्या सुमारे २.२८ लाख होती.

हरिद्वार
भारतामधील शहर

हर की पौडी घाट
हरिद्वार is located in उत्तराखंड
हरिद्वार
हरिद्वार
हरिद्वारचे उत्तराखंडमधील स्थान
हरिद्वार is located in भारत
हरिद्वार
हरिद्वार
हरिद्वारचे भारतमधील स्थान

गुणक: 29°56′50″N 78°9′40″E / 29.94722°N 78.16111°E / 29.94722; 78.16111

देश भारत ध्वज भारत
राज्य उत्तराखंड
जिल्हा हरिद्वार जिल्हा
क्षेत्रफळ १२.३ चौ. किमी (४.७ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १,०३० फूट (३१० मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर २,२८,८३२
  - महानगर ३,१०,७९६
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ

हरिद्वार हे हिंदू धर्मामधील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक मानले जाते. गंगा नदीचा हरिद्वार येथे भारतीय उपखंडामध्ये प्रवेश होतो. कुंभमेळा भरणाऱ्या ४ स्थानांपैकी हरिद्वार एक असून येथे दर १२ वर्षांनी हा मेळा भरतो. (नाशिक, अलाहाबादउज्जैन ही कुंभमेळ्याची इतर तीन स्थाने). तसेच अयोध्या, मथुरा, वाराणसी, कांचीपुरम, उज्जैनद्वारका समवेत हरिद्वार सप्त पुरी ह्या सात पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक मानले जाते. हिंदू पुराणानुसार हरिद्वारमध्ये गंगेत स्नान केल्याने सर्व पापे धुतली जातात व मोक्षप्राप्ती होते.

वाहतूक

गंगाघाटावरील मिठाई दुकान

हरिद्वार रेल्वे स्थानक भारतीय रेल्वेच्या उत्तर रेल्वे क्षेत्रामधील एक स्थानक दिल्ली-देहरादून ह्या प्रमुख मार्गावर स्थित असून येथे दररोज अनेक गाड्या थांबतात. राष्ट्रीय महामार्ग ५८ हरिद्वारमधून जातो.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत