सीमा अंतिल

सीमा पुनिया अंतिल उर्फ सीमा पुनिया किंवा सीमा अंतिल (२७ जुलै, १९८३ - ) या एक भारतीय थाळीफेक खेळाडू आहेत.यांचे सर्वोत्कृष्ट प्रदर्शन हे २०१६ मध्ये अमेरिकेतील सलिनास (कॅलिफोर्निया) येथे पॅट यंगच्या थ्रोअर्स क्लासिक फेरीत ६२.६२ मीटर (२०५.४ फूट) आहे.[१]

मेडल घेताना सीमा अंतिल

सुरुवातीचे जीवन

सीमा अंतिल यांचा जन्म हरयाणाच्या सोनेपत जिल्ह्यातील खेढा गावात झाला.वयाच्या ११ वर्षी त्यांनी आपल्या खेळला सुरुवात केली.

सुरुवातीला ते लांब-जम्पर खेळले. परंतु नंतर त्यांनी डिस्कस थ्रो केला.[२]सांतियागो येथे २००० साली जागतिक ज्युनिअर चॅम्पियनशिपमध्ये विजय मिळून त्यांना सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले.त्यानंतर त्यांचे उपनाम 'मिलेनियम चाइल्ड' असे ठेवले.त्यांनी सोनीपाट येथे शालेय व महाविद्यालय शिक्षण पूर्ण केले.[३]

कारकीर्द

सीमा यांनी २००० च्या जागतिक ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक जिंकले.परंतु स्यूडोफिड्रिनसाठी सकारात्मक औषधे चाचणीमुळे ती गमावली.त्यावेळेस अशा प्रकारचे गुन्हेगारीसाठी नियमावली लागू झाली त्यानुसार,नॅशनल फेडरेशनने तिला पदक काढून टाकल्यानंतर सार्वजनिक चेतावणी दिली.२००२ मध्ये पुढील विश्व ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी कांस्यपदक पटकावले.[४]

२००६ च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये त्यांनी रौप्यपदक जिंकले आणि २६ जून २००६ रोजी हरियाणा राज्य सरकारद्वारे भीम पुरस्काराने त्यांना सन्मानित केले.त्यांनी खेळांपूर्वी एक स्टिरॉइड (स्टॅनॉओझॉल) साठी चाचणी घेतली.त्यांना नॅशनल फेडरेशनने भाग घेण्यास मान्यता दिली.तथापि,तिने गेमसाठी संघातून वगळले.[५]

२०१० राष्ट्रकुल खेळात त्यांनी कांस्यपदक पटकावले.२०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये त्या १३ व्या स्थानावर होत्या.२०१४ मध्ये,राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत त्यांनी रौप्यपदक आणि आशियाई खेळांमध्ये सुवर्ण जिंकले.[६]

वैयक्तिक जीवन

सीमा अंतिल यांचा विवाह त्यांचे प्रशिक्षक अंकिल पुनीया यांच्याशी झाला.ते एक डिस्कस थ्रोअर होते.ज्यांनी अथेन्समध्ये २००४ च्या उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले.[७]

संदर्भ आणि नोंदी

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत