सिमोन दि बोव्हा

सिमोन ल्युसी एर्नेस्तीन मरी बेर्त्रां दि बोव्हा (फ्रेंच: Simone Lucie Ernestine Marie Bertrand de Beauvoir; ९ जानेवारी १९०८ - १४ एप्रिल १९८६) ही एक फ्रेंच लेखिका, विचारवंत व अस्तित्ववादी तत्त्वज्ञ होती. ह्याचसोबत ती महिला हक्क व सामाजिक तत्त्वांची पुरस्कर्ती होती. तिने महिलावादावर लिहिलेली १९४९ सालची कादंबरी द सेकंड सेक्स जगप्रसिद्ध झाली होती. तिने तत्त्वज्ञानावर अनेक कथा, निबंध व लेख लिहिले.'पुरुषप्रधान जगात पुरुषी मूल्यांच्या चौकटीत स्त्रीला राहावे लागते, तिला स्वतःच्या मूल्यांची निर्मिती करता येत नाही. त्यामुळे आपल्या अस्तित्वाला अर्थ देणे स्त्रीला अवघड जाते', असे बोव्हा हिचे मत होते. या तिच्या मतामुळे स्त्रीवादी इतिहासलेखनाला बळकटी आली; तसेच इतिहासलेखनात स्त्रियांच्या लेखनाचा अंतर्भाव केला गेला.

सिमोन दि बोव्हा
जन्म९ जानेवारी १९०८ (1908-01-09)
पॅरिस, फ्रान्स
मृत्यू१४ एप्रिल, १९८६
पॅरिस
राष्ट्रीयत्वफ्रेंच
ख्यातीतत्त्ववेत्ती, लेखिका, कादंबरीकार


ज्याँ-पॉल सार्त्र ह्या प्रसिद्ध फ्रेंच तत्त्वज्ञासोबत दि बोव्हाचे जवळीकीचे संबंध होते परंतु त्यांनी विवाह केला नाही.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत