सदस्य चर्चा:Mahitgar/जुनी चर्चा ६



साचे छान काम करतात

माहितीगार नमस्कार

आपण विदागार साचे पुनर्स्थापित केल्याचे पहिले. साचे छान काम करतात आहेत. काही शंका/विनंती

आपण दिनांका नुसार विदागार स्मपूर्ण सांभाळावे. आपण त्याचे विश्लेषण करून इतर उपपाने केली आहेत तेपण उत्तम झाले तरी दिनांका नुसार पण जशीच्या तशी चावडीची एक प्रत असावीच असे वाटते.

साच्यात संपादन हा दुवा दाखवा/लपवा जवळ होतो आणि चुकून तिचकवल्या जातो त्यास जर सं. अशा स्वरुपात दूर ठेवला कर कसे ? कारण साचा सम्पादन हा दुवा फारच थोड्या लोकांना (जाणकारांनला) लागते.

धन्यवाद राहुल देशमुख ०५:३३, ३ ऑगस्ट २०११ (UTC)


आपण केलेल्या योगदाना बद्दल धन्यवाद.


शिरावडे

दुसरे गाव शिरावडे हे पण सातारा जिल्ह्यातीलच आहे असे सादर लेखात म्हटले आहे पण कराड तालुक्यात तरी अशा प्रकारचे हेच एकाच गाव आहे.-- सागर:मराठी सेवक १२:३८, ३ ऑगस्ट २०११ (UTC)

काही अनाकलनीय कारणामुळे

  • >>>>काही अनाकलनीय कारणामुळे मराठी विकिपीडियन्सनी आतापर्यंत तरी चर्चा पानांवर लावण्याकरीता लागणार्‍या साचांवर काम करणे आणि असे साचे चर्चा पानांवर लावणे यात रस दाखवलेला नाही.

माहितीगार नमस्कार,

सामान्य संपादक कदाचित चर्चा पाना पर्यंत पोहचू शकणार नाही असे समजले आणि अशा आशयाचे साचे जर विस्तार साचा सोबत मुख्यलेख पानावरच प्रकल्प कळा पर्यत लाऊन ठेवले तर काय हरकत आहे. एक साचा बनवू, त्यामध्ये प्रकल्पाची नवे बदलून अनेक साचे करू आणि सांगकाम्या करवी सर्वत्र ठोकुन देउ. सुरुवातीला पाच - पन्नास लेखात हे साचे दिसायला लागले कि लोक आपोआप त्याचे वापर करण्याचे शिष्टाच्यार पाळायला लागतील आणि प्रकल्पांना आपोआप प्रसिद्धी आणि संपादक मिळतील असे वाटते. राहुल देशमुख ०२:२३, ४ ऑगस्ट २०११ (UTC)

  • थोडे अधिक

आपण ऑगस्ट २००९ मध्ये साचा:Wikipedia ads मराठी विपी वर नकवल्वला आहे. त्यावर पुढे कोणी/आपण काही काम केले होते का. त्यास प्रकल्प जाहिरातींसाठी वापरावे का ? राहुल देशमुख ०५:२६, ४ ऑगस्ट २०११ (UTC)

धन्यवाद

मी आपला आभारि आहे.Makyaj ०७:३४, ४ ऑगस्ट २०११ (UTC)

चैत्र

चैत्र शु.प्रतिपदा/द्वितिया- हे नुकतेच टाकलेले लेख बघावेत. काही दुरुस्त्या /त्रुटी असतील तर सुचवाव्यात ही विनंती.वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १३:४८, ४ ऑगस्ट २०११ (UTC)

घर-दार

ठीक. या संपादनाला आगा-पिछा काहीच नसल्याने आणि विकिफॉरमॅटिंग किंवा इतर काही संकेत नसल्याने मला वाटले कोणीतरी टाइमपास करीत आहे.

अभय नातू १६:०३, ४ ऑगस्ट २०११ (UTC)

नमस्कार

नमस्कार मालक, चावडी आजकाल लई गरम झालीय जनु!! :) निनाद ०७:००, ६ ऑगस्ट २०११ (UTC)

प्रोत्साहन

विकीवरील तारे किंवा इतर प्रोत्साहनपर चिन्हे कशी दिली जातात याविषयी काही माहिती द्याल का? सदस्यांना प्रोत्साहन देण्याच्या कामात मला रस आहे! निनाद ०८:१९, ६ ऑगस्ट २०११ (UTC)

तांत्रिक प्रश्न

बघतो. सध्या कामाचे दिवस चालू असताना अर्धा-एक तास जो मिळतो तो आशयात भर टाकणे आणि सहसदस्यांना मार्गदर्शन करण्यात जाताहे. तांत्रिक प्रश्नांमध्ये खोलात शिरायला जी जरा दीर्घशी बैठक लागते, ती सप्ताहांताला मिळते. तुम्ही मांडलेल्या एक्सटेन्शनाचा प्रस्ताव वाचून प्रतिसाद कळवतो.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १७:३५, ११ ऑगस्ट २०११ (UTC)

Invite to WikiConference India 2011


Hi Mahitgar,

The First WikiConference India is being organized in Mumbai and will take place on 18-20 November 2011.
You can see our Official website, the Facebook event and our Scholarship form.

But the activities start now with the 100 day long WikiOutreach.

Call for participation is now open, please submit your entries here. (last date for submission is 30 August 2011)

As you are part of Wikimedia India community we invite you to be there for conference and share your experience. Thank you for your contributions.

We look forward to see you at Mumbai on 18-20 November 2011

आपले अनुमोदन

वेगवान संपादने पार पाडण्यासाठी निरनिराळे बॉट्स (सांगकामे) वापरले जायला हवेत यास आपले अनुमोदन असल्यास प्लिज तसे त्या चर्चेत नोंदवा ना.... हा बॉट लवकर यायला हवा. त्यामुळे मोठे काम वाचेल आपल्या सर्वांचे. तुम्ही मनावर घेतले तर काम मार्गी लागण्यास मदत. (औचित्य राखून राहूल ने त्या चर्चेत येण्याचे टाळले आहे.)निनाद ००:१६, १३ ऑगस्ट २०११ (UTC)


व्यक्तिगत मत

नवीन सदस्यांनी केलेले लिखाण एकदम काढून न टाकता त्याला चर्चा पानावर पुनर्निदेषित करून बदल सुचवावे असे माझे व्यक्तिगत मत आहे. सागर:मराठी सेवक ०९:१३, १३ ऑगस्ट २०११ (UTC)

मराठी - आव्हान आणि उत्क्रांती

कृपया हा लेख विपी वरून काढून टाकण्यात यावा. मी पुन्हा नव्याने लिहिण्याचा पर्यंत करीनसागर:मराठी सेवक ११:३८, १३ ऑगस्ट २०११ (UTC)


       माझी काहीच हरकत नाही आहे, पण अशाने नुकसान होणार असेल तर ठेवण्यात काहीच अर्थ नाही आहे.आपणास जे योग्य वाटेल त्यास माझा पाठींबा आहे.
  • <<<

नमस्कार माहितीगार,

आपण साचा स्मरणपत्र वापरावा

  • " वेळ, बाइट्स,मेहनत वाचवा, धसास साचा वापरा "

(वरील पोस्टिंग हे गम्मत म्हणून आहे गैर समाज नसावा ...!) राहुल देशमुख १०:४१, २० ऑगस्ट २०११ (UTC)


विकिपीडिया:प्रमाणपत्र

नेमकी कशा आशयाची मदत हवी आहे हे कळवावे.

>>> प्रकल्पाच्या प्रगतीकरता काही वेळ देता आलातर - येथे पण काय करता येऊ शकते ते सांगावे राहुल देशमुख ११:२७, २० ऑगस्ट २०११ (UTC)

मसुदा आणि इतर माहिती

माहितीगार कुपया प्रमाणपत्रावर द्यावयाच्या मसुदा आणि इतर माहिती (लोगो, चिन्ह , आदी.) काही ब्र्याड रंग (असल्यास ) बाबदची माहिती द्यावी राहुल देशमुख १८:५६, २० ऑगस्ट २०११ (UTC)

काही मुद्दे

माहितीगार,आपण विकिपीडिया च्या लोगो वापर संबंधी परवानगी साठी त्वरित हालचाल करावयास हवी (मान्यता येईल तेव्हा येईल पण सुरुवात करून द्यावी )कारण विकिपीडियाच्या ब्र्यांड व्ह्यालूचा आपणास फायदा घेता येईल असे वाटते.

काही मुद्दे

  1. विकिपीडियाचा यु आर एल द्यावा का
  2. आपणास जे जे ठावे ..... मराठी विपी चे (अनधिकृत/अधिकृत) घोष वाक्य लिहावे का
  3. प्रमाण पत्रावर सही राहणार आहे का (~~)
  4. तारीख /कालावधी वैगरे
  5. हा साचा असावा असे आपण म्हणता मग तो कोणीहि लावला/वापरला तर ? त्याचे वापराचे तंत्र कसे असावे.
  6. बंधू प्रकल्प वा इतर काही विपिशी निगडीत गोष्टी जाहिरातीसाठी द्यावे का

राहुल देशमुख २१:२३, २० ऑगस्ट २०११ (UTC)


  • >>>बंधू प्रकल्प वा इतर काही विपिशी निगडीत गोष्टी जाहिरातीसाठी द्यावे का - "जाहिरातीसाठी द्यावे का" हे समजले नाही
मला असे म्हणायचे होते कि प्रमाणपत्रावर बंधू प्रकल्पांच उल्लेख लोगो अथवा नामे (तळाशी अथवा मायन्या मध्ये )द्यावीत का ? जेणे करून त्याची ह्याद्वारे जाहिरात/प्रसिद्धी होईल. राहुल देशमुख २२:२६, २० ऑगस्ट २०११ (UTC)

नारायम

माहितगार,

तुम्ही दिलेला दुवा पाहिला. आत्ता मराठी विकिपीडियावर जी लिप्यंतर प्रणाली आहे तीच अधिक ग्लोबल स्वरुपात उपलब्ध करुन देण्याची सोय दिसत आहे. ही स्वीकारण्यास हरकत नाही पण नेपाळी, हिंदी विकिपीडियांनी ही प्रणाली का स्वीकारली (स्थानिक लिप्यंतर सोडून) याची कारणे मिळाली तर मत अधिक ठाम होण्यास मदत होईल.

अभय नातू १४:४३, २१ ऑगस्ट २०११ (UTC)

काम चालू आहे.

साचा:Disambiguation हा साचा en:Template:Disambiguation साच्याप्रमाणे घडवावा लागेल. त्यानंतर मिडियाविकी:Disambiguationspage येथे या नव्या साच्याचा दुवा नोंदवावा लागेल; म्हणजे पायविकिपीडिया बॉटांना त्रासणारी कीड मरेल. :)

तूर्तास साचा:Disambiguation हा साचा बनवला आहे, पण तो en:Template:Disambiguation साच्याप्रमाणे दिसत नाही. अजून काहीतरी दुरुस्त्याअ कराव्या लागतील, असे दिसते. मला आता उद्या रात्री वेळ मिळेल. तोपर्यंत तुम्हांला काही प्रयत्न करता आल्यास जरूर करून बघा.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:४१, २४ ऑगस्ट २०११ (UTC)

संकल्पने सुरू केलेले काम बरेचसे संपवित आणलेले आहे. आता /docचे भाषांतर आणि इतर किरकोळ बदल करायचे राहिले आहे. इतर काही बदल पाहिजे असे दिसल्यास कळवालच.
अभय नातू २२:२८, २४ ऑगस्ट २०११ (UTC)
ता.क. - साच्याचे दोन-तीन उपयोग अशोक (निःसंदिग्धीकरण), कोयना आणि माँटेरे या लेखांद्वारे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.
अभय नातू २२:४४, २४ ऑगस्ट २०११ (UTC)

प्रमाणपत्र झलक

नमस्कार माहितीगार,मागे आपण सांगितल्या प्रमाणे प्रमाणपत्रासाठी साचा बनवला आहे. आपणास पुरवावलोकना साठी येथे देत आहोत. वापरास अत्यंत सोपा आणि छापता येण्यासारखा बनवण्याचा प्रयत्न आहे.

  • संकल्पना : तीमिरातुनी तेजा कडे
  • अर्थबोध : सदर चित्रात मराठी भाषेचा प्रवास भूतकाळापासून उज्वल भविष्या कडे दाखवण्याचा प्रयत्न आहे. तेव्हा तळाशी तिमिर म्हणजे काळा रंग वापरण्यात आला आहे ज्यात भूतकाळ असेपण अभिप्रेत आहे त्यासाठी काही ऐतिहासिक पार्श्वभूमी घेतली आहे जसे बुरुज, किल्ले आणि काळा प्रमाणे आधुनिक गगनचुंबी इमारती ह्या प्रकाशात दाखवल्या आहेत सोबत भगवा झेंडा, राजमुद्रा आणि छत्रपती सम प्रतिमा ह्या मराठीस असलेला राजाश्रय आणि लोकाश्रय दाखवतात. तुतारी फुंकणारे प्रमाण पत्राची इतमानाने करण्यात येणाऱ्या घोषणेचे प्रतिक आहेत.

सूचनांचे स्वागत आहे. राहुल देशमुख ०३:०४, २५ ऑगस्ट २०११ (UTC)

प्रमाणपत्र
नमस्कार,

Mahitgar/जुनी चर्चा ६


विकिपीडिया संपादन कसा करावा या संदर्भात आपण चांगले ( पॉवर पॉइंट) प्रेझेंटेशन मराठी भाषेतून बनवून दिल्याबद्दल मराठी विकिपीडिया समुदायातर्फे हे प्रमाणपत्र प्रदान करण्या येत आहे.


धन्यवाद

Mahitgar



नेर

नेर

AchhneraM.B.Uttar PradeshArumuganeriTamil NaduBankner Delhi *DhaneraMGujaratJobnerMRajasthanJaipurKhujnerN.P.Madhya PradeshRajgarhManerN.A.BiharPatnaNanguneriT.P.Tamil NaduTirunelveliNeralC.T.MaharashtraRaigarhParneraC.T.GujaratValsadPonneriT.PTamil NaduThiruvallurSangamnerM.Cl.MaharashtraAhmadnagarSavnerM.Cl.MaharashtraNagpurSingampuneriT.P.Tamil NaduSivagangaSusnerN.P.Madhya PradeshShajapurWankanerMGujaratRajkotAmalnerM.Cl.MaharashtraJalgaonArumuganeriT.P.Tamil NaduToothukudiBikanerM.Cl.RajasthanBikanerDhaneraMGujaratBanas KanthaJagnerN.P.Uttar PradeshAgraJobnerMRajasthanJaipurBamuner Alga lakhipurJharner char BilasiparaAminer SalmaraDewaner MankacharSingner HowraghatMoSingnerSamSingnerAthnerKunera BageshwarGumner 1931000 BhairamgarhBankaneri00158700BadamiBagalkot Bhimanere01119700ChannagiriDavanagere Bhimaneri karnatakaChikkanerale02758200PiriyapatnaMysoreDinneri01939800MalurKolar

hImachal Pradesh

Baner ,Nenula,Nemandi,Bhaner,Buner,HarneraKashmirAwnera00204300ShupiyanPulwamaChanera00611800BillawarKathuaChiner,Kaner,GhaneriNaner,

पंजाब

अजनेर,बाणेरा,हसनेर,जाणेर,झूनेर,

कॉपी-पेस्ट

फायब्रॉइड्‌स हा लेख या लेखात दाखविलेल्या संदर्भापासून कॉपी-पेस्ट केलेला आहे त्यामुळे ठीक करण्यात अडचणी येत आहेत. हा लेख त्या संदर्भ लेखात सामान्य स्त्रियांच्या माहितीसाठी तयार केलेला आहे. त्यामुळे वाक्य रचना बदलणे आवश्यक आहे. प्रयत्न करत आहे. सुचविल्या बद्दल धन्यवाद व बदलांवर आपण लक्ष ठेवाल अशी अपेक्षा.सचिन १२:४६, २८ ऑगस्ट २०११ (UTC)

भाषांतर

लेखात भाषांतर केले आहे.कृपया शुद्धलेखनाबाबत 'जे' यांनापण विनंती करावी.मुळ इंग्रजी मसुदा काय होता ते बघण्यासाठेए तो तसाच ठेवला आहे. यथायोग्य ते बदल केल्यावर कृपया तो काढुन टाकावा ही विनंती.वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १४:१०, १ सप्टेंबर २०११ (UTC)


विकिपीडिया:स्वागत आणि साहाय्य चमूवर थोडेफार काम केले आहे, कसे वाटते ते लिहावे...J १७:२७, १ सप्टेंबर २०११ (UTC)

याद्या च याद्या

माहितीगार नमस्कार,विपिवर आपली अनुपस्थिती/तुरळक उपस्थिती जाणवते आहे, आपल्या सुट्टी संपण्याची मी वाट पाहतो आहे. तरी थोडा त्रास देतो. इतक्यात विपीवर मोठ्या प्रमाणात याद्या स्वरूपाचे लेख बनवल्या जात असल्याचे पाहण्यात येत आहेत. त्यावर संबंधित चर्चा पानावर विखुरलेल्या अवस्थेत काही चर्चा होते आहे. बर्याच जुन्या मंडळींनी त्यावर ताशेरे मारले आहेत तर काहींनी समर्थन पण केले आहे. काय ह्यावर काही धोरण असावे/ठरवावे का ? तसे असल्यास मग सदर विषयावर चर्चा चावडी ध्येय आणि धोरणे वर सुरु करता येईल आणि त्यास झालेल्या चर्चेचे संधर्भ हि जोडता येतील. आपण ह्या बाबत मार्गदर्शन करावे असे वाटते. राहुल देशमुख १२:५७, १७ सप्टेंबर २०११ (UTC)

परत याद्या

ही सूची नाशिक या लेखातून हलवून स्वतंत्र लेख बनवण्याचे प्रयोजन विवाद्य वाटते. अश्याने 'पुणे परिसरातील नाट्यगृहे', 'पुणे परिसरातील चित्रपटगृहे', 'पिंपरी-चिंचवड परिसरातील नाट्यगृहे', 'पिंपरी-चिंचवड परिसरातील चित्रपटगृहे', 'इंदापूर परिसरातील हंगामी व कायमस्वरूपी चित्रपटगृहे' (महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्याच्या गावागणीक एक आणि मुंबई वगैरेंसारख्या शहराबाबत तर प्रत्येक उपनगरागणीक बनवायचा पायंडा पडेल.) असे लेखही बनायचे पायंडे पडतील. कृपया या लेखातील माहिती नाशिक या मुख्य लेखात संक्षेपाने लिहावी. ऐतिहासिक/सांस्कृतिक संदर्भात महत्त्वाच्या असलेल्या आणि त्यामुळे बर्‍यापैकी विश्वकोशीय उल्लेखनीयता सापडण्याजोग्या मोजक्या नाट्यगॄहांबद्दल/चित्रपटगॄहांबद्दल माहिती नोंदवायची असल्यास या लेखाचा पुनर्विचार करण्यात हशील वाटते. कारण काही वर्षांमध्ये नवीन ठिकाणांची या सूचीत भर टाकण्याचे व "कै." झालेली केंद्रे उडवण्याचे तुलनेने कमी महत्त्वाचे काम करण्याचे कष्ट कायम घेतले जायची व त्यायोगे पान कायम अद्ययावत राहायची शक्यता फार कमी! ही माहिती शिळी झाल्यावर, आधीच फारश्या महत्त्वाचा नसलेल्या माहितीवर एवढे का झिजावे, हा प्रश्न मनात उमटल्यास नवल वाटू नये.

तस्मात, आताच अश्या जंत्रीपर लेखांच्या निर्मितीआधी साधक-बाधक विचार करावा.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १३:३५, १७ सप्टेंबर २०११ (UTC)

मी यासाठी इंग्रजी विपी चा आधार घेतला आहे. तेथे अशाच प्रकारचे लेख आणि उपलेख आहेत. हे पाहूनच मी उपलेख सुचवले. जर सगळ्यांनाच ते मान्य नसेल तर माझे काही म्हणणे नाही. अभय आणि माहितगार यांचे यावर असेच मत आहे का?.....मंदार कुलकर्णी १७:५६, १७ सप्टेंबर २०११ (UTC)

AWB

Could you please gouid me on using AWB - प्रबोध (चर्चा) १३:५६, १२ ऑक्टोबर २०११ (UTC)

नमस्कार

काय महाराज ! आहात कुठे? आजकाल दिसत नाहीत ते?

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १७:५५, १२ ऑक्टोबर २०११ (UTC)

खुप वर्षांनी एखाद्या जुन्या जिवलग मित्राशी अचानक गाठ पडल्यावर जी मनात भावना निर्माण होते,तसे आता वाटत आहे.

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १८:०१, १२ ऑक्टोबर २०११ (UTC)

एडब्ल्यूबी

माहितगार, नमस्कार.

आपण एडब्ल्यूबी्/बॉट बाबत मी पुण्यात राहत असल्यास माझ्याकडून शिकण्याची उत्सुकता दाखवली आहे. त्याबाबत मी खुलासा करू इच्छितो की, मी अहमदनगर जिल्ह्यातील एका खेडेगावात राहतो. आपणास जशी उत्सुकता आहे तशीच मलाही सांगकाम्या ही काय भानगड आहे या उत्सुकतेतून मी वापरून पाहण्यास सुरूवात केली (अर्थात हे सगळे स्वयंअध्ययनच होते/आहे. अभय, संकल्प यांनी माझ्यावर विश्वास टाकून प्रयोग करून पाहण्याची संधी दिली म्हणूनच हे स्वयंअध्यन चालू आहे.) ही माझी सुरूवातच आहे मला वाटते १ टक्काच मला त्यातली माहिती झाली आहे. त्यामुळे मलाच पूर्ण माहिती नसल्याने सध्या तरी मी हे ज्ञान इतरांना देऊ शकेन असे वाटत नाही. पण आपणास माझ्यासारख्याच स्वयंअध्ययन करताना काही अडचणी आल्यास जरूर कळवा त्याला उत्तरे देण्याचा प्रयत्न करीन. (तुम्हाला आलेली अडचण मला आली असेल तर) आशा आहे आपल्या अडचणी मला विचाराल जेणेकरून आपल्याशी संवाद करण्याची संधी मिळेल आणि आपल्यासारख्या अनुभवी प्रचालकाकडून मार्गदर्शनही मिळेल. संतोष दहिवळ १७:२९, १३ ऑक्टोबर २०११ (UTC)

धन्यवाद!

नमस्कार,

चहाबद्दल धन्यवाद ! काही दिवसांनी तुम्हांला इथे पाहून आणि तुम्ही पुन्हा सक्रिय झाल्याचे पाहून खूप बरे वाटले. एकंदरीत सर्व काही ठीकठाक चालले आहे ना ?

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०३:२७, १५ ऑक्टोबर २०११ (UTC)

मी जमेल तसे काम करीत आहे. यावर कोणासतरी निष्णात हात फिरवावा लागेल असे दिसते.

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) ०८:०५, २३ ऑक्टोबर २०११ (UTC)

>>यावर कोणासतरी निष्णात हात फिरवावा लागेल असे दिसते.

होय खरे आहे, तांत्रीक आणि विषयाचे जाणते सोबत आपल्या सारख्या सर्व अनुभवी विकिपीडियन मंडळींनी मिळून पुढे न्यावे लागेल माहितगार ०८:०९, २३ ऑक्टोबर २०११ (UTC)
नमस्कार ! होय, यावर हळूहळू काम करतो. --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ११:२२, २३ ऑक्टोबर २०११ (UTC)

विकिपीडिया:चढवून हवी असलेली छायाचित्रे

विकिपीडिया:चढवून हवी असलेली छायाचित्रे व तत्संबंधी खालील पाने कृपया तपासावीत.

या पानांतील लाल दुवे काढण्यास व यावर निष्णात हात (फिनिशिंग टच) फिरविण्यास शक्य असेल तर मदत करावी ही विनंती.याचे वर्गीकरणही कृपया करावे.

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १४:०७, २३ ऑक्टोबर २०११ (UTC)

विकिपीडिया:पाहिजे असलेली छायाचित्रे

विकिपीडिया:पाहिजे असलेली छायाचित्रे येथे Commons:Commons:Help page maintenance#Translation of pagesCommons:Commons:सहाय्य पान निर्वाहही पाने (टिचकी मारुन) कृपया बघावीत. ती बहुतेक बदलली आहेत.

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) ०३:४२, २७ ऑक्टोबर २०११ (UTC)

गिरीश यांचे लेख

माफ करा. मी चावडीवरील चर्चा वाचली नाही.आपण वगळलेले लेख पुन्हा लिहिल्या गेलेत असे वाटून मी ते पुन्हा बगळले.मी त्यात आधी विकिकरण व वर्गीकरण साचा लावला होता. अ. बदल पानात खाली गेल्यावर ते आपण वगळल्याचे बघितले. यात माझी धारणा अशी झाली कि ते पुन्हा लिहिल्या गेलेत कि काय व म्हणुन मी जरा घाईत असल्यामुळे ते न तपासताच वगळले. पुनर्स्थापित करू काय?

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १३:३१, १ नोव्हेंबर २०११ (UTC)

माहीतगार, प्रताधिकार उल्लंघन करणारा मजकूर वगळल्याबद्दल धन्यवाद ! पण येत्या काळात अश्या प्रकारांकडे डोळ्यांत तेल घालून लक्ष द्यावे लागणार असे दिसते. --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १४:५३, १ नोव्हेंबर २०११ (UTC)

डोळ्यांत तेल

पण येत्या काळात अश्या प्रकारांकडे डोळ्यांत तेल घालून लक्ष द्यावे लागणार असे दिसते.

होय, मलाही तीच काळजी वाटते, आंतरजालावरून इतरत्रची झालेली कॉपी पेस्टींग भाषाशैलीवरून बरेच सहजतेने लक्षात येते.शासकीय विश्वकोशातील कुणी संदर्भ न देता कॉपी पेस्टींग केल्यास भाषेत अलंकृतता नसल्यामुळे आपल्या नजरेतून सुटेल पण त्याच वेळी तज्ञांनी स्वतःची भाषाशैली टिकवत लेखन केले आहे त्यामुळे कॉपीराईट भंग सिद्ध करणे तसे झाल्यास कायदेतज्ञांच्या मात्र हातचा मळ असेल आणि याचे गांभीर्य नवागत सदस्यांना कसे समजवावे हा एक मोठा यक्ष प्रश्न आहे चएचेतून भविष्याकारता काही मार्ग सुचावा याच उद्देशाने मी हा विषय चावडीवर मांडला आहे माहितगार १८:१२, १ नोव्हेंबर २०११ (UTC)
Can we have a bot in Marathi Wipi like English which immd. founds the copied content from net... I think this is now badly required as it is very difficult to search such content manually.... Also we need to guide and teach the editors how to right the article by taking help of "Vishwakosh" without getting caught in Copyright issue. I guess some discussion is required in this topic. Just to tell you, the information in http://manase.org/ was earlier free (no copyright) and that was mentioned specifically on the website. On that basis, some articles in Marathi Wipi are been created/copied from that site and given the reference on page by some editors. Now during last 2 months http://manase.org/ has put back dated line "Copyright @ 2009 Maharashtra Navnirman Sena. All rights reserved." What to do now? मंदार कुलकर्णी ०७:२२, २ नोव्हेंबर २०११ (UTC)

>>>Can we have a bot in Marathi Wipi like English which immd. founds the copied content from net... I think this is now badly required as it is very difficult to search such content manually.... सहमत मला वाटते हा विषय तांत्रीक चावडीवर मांडावयास हवा म्हणज्चे कुणी तरी या विषयात पुढाकार घेईल. सोबतच मराठी विकिपीडियाचा मजकुर इतरत्र घेणे मुक्त असला तरी त्या लोकांनी पण त्याचे क्रेडीट म्हणून मराठी विकिपीडियाचा वेळ तारीख आणि लेख नावानिशी संदर्भ नमुद करणे अपेक्षीत असते व त्याकरता ही बॉट आणि पाठपुरावा चमूची आवश्यकता आहे.>>>मनसे

माझ्या माहितीनुसार ती कॉपीराइटेड वेबसाईटच आहे आणि तेथील काही मजकुराचे कुठे कॉपी-पेस्टींग झाल्याचे निदर्शनास आल्यास असा मजकुर वगळणे गरजेचे आहे. माहितगार १३:००, २ नोव्हेंबर २०११ (UTC)

मी वेळ मिळाल्यास जरूर प्रयत्न करील. त्त्पूर्वी,हे संकेतस्थळ बघावे.वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १६:४९, ४ नोव्हेंबर २०११ (UTC)

मशीन ट्रान्सलेशनाचे दोष

नमस्कार माहीतगार !

गिरीश यांच्या चर्चापानावरील तुमचा मशीन ट्रान्सलेशनविषयक संदेश नजरेस पडला; त्यावरून : मशीन ट्रान्सलेशन ही सुविधा मराठीसाठी "टेस्टेड/क्यू.ए.-प्रमाणित" अजून उपलब्ध नसल्यामुळे (माझ्या माहितीप्रमाणे!), अश्या उपकरणांचा मराठी विकिपीडियावर थेट वापर करण्यास माझा विरोध आहे. अश्या प्रकारच्या तांत्रिक गोष्टी आधी अन्यत्र किंवा स्वतंत्र एखाद्या डेव्हलपमेंट-विकीवर चाचणी करून, क्यू.ए.प्रमाणित (इंग्लिश : QA Certified) करून घेतल्यानंतर मगच थेट मराठी विकिपीडियावर वापराव्यात. अन्यथा मराठी विकिपीडियाचा गिनीपिग म्हणून वापर होऊन मोठा दर्जात्मक फटका बसू शकतो (जो कन्नड व अन्य काही भारतीय भाषी विकिपीडियांना बसला आहे, आणि त्यांची मोठी गोची झाली आहे.).

तसेच अशी क्यू.ए.प्रमाणित सुविधा वापरतानाही प्रथम संबंधित संपादने धूळपाटी पानांवर करून त्यांचे समसमीक्षण करून मगच मुख्य नामविश्वातील मजकुरात माहिती सामावून घ्यावी. या संदर्भात ऑटोविकिब्राउझर टूल "टायपो" नावाचे उपकरण पुरवते, त्याचे उदाहरण अनुसरण्याजोगे आहे. त्या उपकरणात रेगेक्स तंत्रज्ञानावर आधारित शुद्धलेखनदुरुस्त्या करता येतात. मात्र ते उपकरण बॉट चालवून ऑटो-सेव्ह मोडात वापरता येत नाही; ते मॅन्युअल मोडात चालवावे लागते. अशी मर्यादा घालण्यामागे मशीन ट्रान्सलेशन कितीही चांगल्या दर्जाने केले असले, तरीही त्यातील त्रुटींमुळे अंदाधुंद गैरबदल संभवू शकतात, ही जोखीम लक्षात घेतली आहे.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १८:०१, ४ नोव्हेंबर २०११ (UTC)

  • हे इथे कामच करू देणार नाहीत प्रत्येक ठिकाणी झारीतील शुक्राचार्य !!!! आहो कुणी कल्पना मांडली कि लगेच धावता फाटे फोडायला. माहीतगार तुम्ही प्रयोग करायला काही हरकत नाही चुकेल तिथेच शिकेल. काही लेखांवर प्रायोगिक म्हणून हवेतर पाटीलवा आणि व्हा मोर्‍ह. गुंडांना आम्ही सांभाळतो. - मी राजाराम बोलतोय

अखिल भारतीय पहिले विकी संम्मेलन

नमस्कार ,खूपच दिवसानी आपण भेटलो.मी १-२ महिन्यापूर्वी १८,१९,२० नोव्हेबर साठी early bird नोंदणी केली आहे.पण त्यासंबधात मला फ़क्त pay recipt मिळाली.आपण जरा मला जरा व्यवस्थित सांगाल का?भ्रमणध्वणि मिळाला तर उत्ताम .......कळावे.अभय नातू यांना ही कळविले आहे.विनोद रकटे १३:१४, ९ नोव्हेंबर २०११ (UTC)

हॉट कॅट

हॉट कॅट संदर्भात एक bug report बगझिलावर submit केला आहे. त्यामध्ये काही बदल सुचवायचा असल्यास खाली दिलेल्या दुव्यावर टिचकी द्यावी ही विनंती.

संतोष दहिवळ १४:४०, १२ नोव्हेंबर २०११ (UTC)

अंकपत्त्यांचे योगदान

कृपया हे पहावे. - प्रबोध (चर्चा) १२:२६, १६ नोव्हेंबर २०११ (UTC)

नमस्कार

हे लिहून झाल्यावर मी बाहेर पडा या लिंकचा शब्दशः उपयोग करणार आहे. अर्थात मी परतणारच नाही असे नाही, काही चर्चा पाने आहेत ना हे पहायला तरी अधूनमधून येईन पण विकिपीडिया मराठीचे बाळ आता चालू लागले आहे धावूही लागेल अशी अशा वाटते, आपल्या मदतीबद्दल, माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार -मनोज १४:२७, २० नोव्हेंबर २०११ (UTC)

ता. क. तुमचा तारा, निर्णय बदलायला, भर घालत रहायला उद्युक्त करतो. फक्त सदस्यपानाऐवजी सदस्य चर्चापानावर तो लावला तर खिशातच ठेवल्यासारखा वाटतो (हलकेच घ्यावे). एनी वे, त्यासाठी धन्यवाद.

उ:अभिनंदन

धन्यवाद, माहितगार,

अभय नातू ०४:४३, २७ नोव्हेंबर २०११ (UTC)


धन्यवाद!

धन्यवाद ! (about barnstar) this keeps one going.... :) Kaajawa १४:५०, ३० नोव्हेंबर २०११ (UTC)

अभिनंदन!

भारतात असतांना वृत्तपत्रात (मटामध्ये) विकीवरचे लेख वाचताना 'माहितगार' हे नाव वाचून अतिशय आनंद झाला. दुर्दैवाने, मुंबईत असूनही विकीचर्चासत्राला उपस्थित राहू शकलो नाही या खंत आहे. अन्यथा आपली भेट झाली असती. आता परत कधी येईन तेव्हा भेटायला फार आवडेल. कळावे, लोभ असावा! आपला - निनाद निनाद ०१:१७, १ डिसेंबर २०११ (UTC)

Bureaucrat

माहितगार,

माझ्या मते Bureaucratचे प्रशासक हे भाषांतर ठीकच आहे पण बदलायचाच असल्यास स्विकृती अधिकारी हा शब्द बोजड आणि कृत्रिम वाटतो. एकच शब्द असलेले सुटसुटीत नामाभिधान चांगले.

अभय नातू ०५:२९, २ डिसेंबर २०११ (UTC)

दोघांच्याही चर्चा पाहिल्या. कारभारी या शब्दाचा विचार करा. एकच सुटसुटीत नामाभिधान आहे, अस्सल मराठी शब्द आहे आणि ओनरशीपचा सेन्स त्यातून अजिबात येत नाही. शिवाय आधुनिक मराठीत एका शब्दाची पुनर्स्थापना केल्याचं श्रेयही मिळेल.-मनोज ०७:०५, २ डिसेंबर २०११ (UTC)

माहितगार,
जुनी चर्चा शोधून काढल्याबद्दल धन्यवाद. त्यावेळी मला रुचलेल्या अधिकारीपेक्षा (मला वाटते संकल्प किंवा जे यांनी सुचवलेला) प्रशासक हा शब्द अधिक चपखल वाटला होता.
वर मनोज म्हणतात तो कारभारी सुद्धा चांगला वाटतो पण तो bureaucratसाठी वापरावा कि sysopबद्दल यावर तुमचे मत काय आहे? bureaucratपेक्षा sysop रोजच्यारोज कारभार करतात. आणि सदस्यांनी करून ठेवलेले कारभारही निस्तरतात. :-D
प्रशासकच पकडून बसावे हा माझा आग्रह नाही पण स्वीकृती अधिकारी हा नको असे वाटते आणि कारभारी हा शब्द sysopसाठी वापरला तर bureaucratसाठी प्रचालक किंवा तत्सम सुटसुटीत शब्द वापरावा हे माझे मत. नुसते अधिकारीसुद्धा चालेल.
अभय नातू १७:२५, २ डिसेंबर २०११ (UTC)

गीत संगीत च्या सदस्यत्वाचे आमंत्रण

आपण मला गीत संगीत च्या सदस्यत्वाचे आमंत्रण दिलेत. परंतु मला तांत्रिक अडचणी येत आहेत.. मार्गदर्शन करावे. मी {गीतसंगीतचमूसदस्य} असे लिहून पहिले माझ्या सदस्य पानावर.

आभार

नमस्कार,

मध्यंतरी विकी संमेलन आणि मग तेथे दिलेल्या जाहीरनाम्यातील घोषणांना कार्यान्वित करण्याचा हालचालीत जसे मोबाई अ‍ॅप, विपी सी डी, मराठी फॉन्ट सुलभीकरण, मिडिया विकिसाठी मराठमोळी सर्वेक्षण पुरवणी तसेच मराठी विकीस्त्रोत सुरु करण्यासाठी भाषांतर, स्रोत साठी मुखपृष्ठ आणि सुचालन, आधारभूत साचे आदी कामात व्यस्त असल्याने इकडे फिराकण्याचे टाळले.

माझ्या माघारीच मला प्रचालक पदाची जबाबदारी आपण देऊ केलीत. माझ्यावर टाकलेल्या विश्वासाबद्दल मी आपला आभारी आहे. दिलील्या जबाबदारीस मी माझ्या परीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन. भविष्यातही आपल्या अशाच सहकार्याची अपेक्षा.

धन्यवाद

राहुल देशमुख ०५:५१, ४ डिसेंबर २०११ (UTC)

ट्रांसलेटविकी

मी ट्रांसलेटविकीवर जवळपास ८० मेसेजेसचे अनुवाद केले आहेत. पण अशी अडचण आली की पूर्वीचे काही अनुवादीत मेसेज पाहिल्यावर त्याच्या अनुवादात !!FUZZY!!, $1, !!FUZZY!!$1, !!FUZZY!!!!FUZZY!!!!FUZZY!!, $1 ($2) असे काही संकेत दिसत आहेत. हे संकेत म्हणजे नेमके काय? ते कधी वापरावेत? ते वापरणे गरजेचे आहे काय? याचा खुलासा व्हावा नाहीतर मी केलेल्या योगदानाला अर्थ राहणार नाही. संतोष दहिवळ १२:५४, ९ डिसेंबर २०११ (UTC)

.

विकीपत्रिका सभासद नोंदणी ....!
नमस्कार, Mahitgar/जुनी चर्चा ६

मराठी विकिपीडियाचा वाढत असलेला व्याप, म्हणजे कामाच्या आघाड्या आणि विपी परिवार यामध्ये उत्तम समन्वय रहावा, वेगवेगळ्या दिशांनी होणार्‍या कामांची सर्वाना माहिती व्हावी आणि सद्द घटनांबद्दल आढावा ह्या उद्देशाने मराठी विकिपीडिया विकीपत्रिका दि. १ जानेवारी २०१२ पासून सुरू करीत आहोत.

पत्रिका इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये सदस्यांना त्यांच्या चर्चापानावर पोहचविण्यात येईल.

मराठी विकिपीडिया मासिक पत्रिकेचे सदस्यत्व स्वीकारा. सभासद नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा.

आपल्या माहिती आणि पुढील योग्य कार्यवाहीसाठी सादर.

कळावे - खबर्या (विकीपत्रिका)


आंभोरा

माहितगार,

आपला आंभोराविषयीचा संदेश वाचला आणि त्यामध्ये स्ट्राईक थ्रू केल्याचा खुलासा करावा म्हणून -

पहिला मुद्दा ज्या मजकुराला स्ट्राईक थ्रू केलेले होते तिथे आधीपासूनच म्हणजे आदरणीय नरसीकरांनी हे पान नवीन तयार केले तेव्हापासूनच संदर्भ हवा साचा लावलेला होता. त्यादृष्टीने मी संदर्भ शोधून तिथे जोडावा म्हणून संदर्भ शोधण्याचा प्रयत्न केला तर सदर मजकुराविषयी विसंगत संदर्भ मला मिळाले म्हणून मी मिळालेल्या संदर्भासह त्या मजकुराखालीच नवीन मजकूर संदर्भासह टाकला व पहिल्या मजकुराला संदर्भ नसल्याने त्याला स्ट्राईक थ्रू केले व संदर्भ हवा हा साचाही तसाच ठेवला. जेणेकरून या पानावर आलेल्यांना दोन्हीही मजकुरात फरक अजमावता येईल व संपादक/सदस्यांनाही दोन्ही मजकुरातील वस्तुनिष्ठता शोधण्यासाठी संदर्भ मिळवण्यास मदत होईल.

आता दुसरा मुद्दा संदर्भ हवा हा साचा लावला तरी किती जण संदर्भ शोधतील आणि कधी जोडतील ही शंकाच होती कारण या पानालाच मागच्या नव्वद दिवसात १०३ जणांनी भेटी दिल्या. या कालावधीत संदर्भ हवा साचा तेथेच होता. म्हणून थोड्या धाडसाने स्ट्राईक थ्रू करण्याचा निर्णय घेतला आणि आपल्याला सांगण्यास आनंद होतो की मी परत विकिवर येईपर्यंत Kmohanakar या सदस्यांनी स्ट्राईक थ्रू केलेल्या मजकुराचे दोन संदर्भ मिळाल्याचा संदेशही मला दिला. म्हणजे ज्या उद्देशाने स्ट्राईक थ्रू केले होते तो सफल झाला असेच म्हणावे लागेल.

सदस्य नाव बदल

मी ए.डब्लू.बी. द्वारे स्वयंचलित संपादन करण्यासाठी सदस्य:सांगकाम्याप्रबोध हे खाते तयार केले. परंतु, मला त्या सदस्य नावात बदल करायचा आहे. "सांगकाम्या" आणि "प्रबोध" या शब्दात स्पेस हवी आहे. हे करता येईल का? मला "सांगकाम्या प्रबोध" (स्पेस असलेले) सदस्य नावाने नवे खाते पण उघडता येत नाही आहे. - प्रबोध (चर्चा) १२:४५, २४ डिसेंबर २०११ (UTC)

येत्या मराठी भाषादिनानिमित्त (२७ फेब्रुवारी) उपक्रम करण्याविषयी

नमस्कार ! चावडीवर येथे येत्या मराठी भाषादिनानिमित्त (२७ फेब्रुवारी) उपक्रम करण्याविषयी काही प्रस्ताव मांडले आहेत. त्याविषयी कृपया आपली मते/कल्पना मांडावीत, अशी विनंती.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १४:५८, १ जानेवारी २०१२ (UTC)

स्तंभ

नमस्कार,

विकीपत्रीकेचा अंक आपण वाचलाच असेल.

एकंदरीत पत्रिकेतील लेख/माहितीची दिशा याबाबत काही सूचना/कल्पना असल्यास सुचवाव्यात. तसेच काही नियमित स्तंभ सुरु करावेत असे वाटते, जसे सांख्यिकी, प्रत्यक्ष क्षेत्रातील कार्यक्रम, पुढील महिन्यातील आयोजित कार्यक्रम आणि इतरही (सुचवावे ) ... त्यासाठी रंजक/आकर्षित स्तंभ नावे सुचवावीत हि विनंती. राहुल देशमुख ०४:४०, ४ जानेवारी २०१२ (UTC)


साईटनोटीस

>>>आज या वेळी SICSR पुणे येथे होत चालू असलेल्या विकिपीडिया ट्रेनिंग सेशन मध्ये सर्वांचे स्वागत आहे.या यादीतील व्यक्तिविशेषांची लेख तयार करावयाची आहेत विकिपीडिया ऑनलाईन पॉवरपॉईंट]आज तयार होत असलेली नवीन पाने सात दिवसां पर्यंत वगळू नयेत. सहसंपादनात सर्वांचे स्वागत आहे. माहितगार ०८:२४, ८ जानेवारी २०१२ (UTC)


नमस्कार माहितीगार,

प्रथम टेक मराठी शिकवणी बद्दल अभिनंदन.

ह्या उपक्रम दरम्यान वरील माहिती साईट नोट वर टाकण्यात आल्याची मी पहिली त्या अनुषंगाने काही टिपण्या कराव्याशा वाटतात.

  1. मी साईट नोट लॉक केली असल्याने सध्या एकाच संदेश सर्वच पानावर सदा सर्वकाळ दिसतो हे आपणास माहीतच आहे.
  2. अशा परिस्थितीत संदेशांची व्हीजीबीलिटी मोठ्या प्रमाणात वाढते आणि त्याचे उत्तम निकाल मिळतात (उदा. विकीपात्रीकेचे नोंदणी)
  3. तेव्हा ह्या माध्यमाचा उपयोग हा फक्त प्रचार, जनहितार्थ घोषणा, जाहिराती साठीच व्हावा आणि निरोपासाठी होवूनाये असे वाटते.
  4. वरील संदेशात वगळण्याचे अधिकार असलेले प्रचालक (१२) ह्यांना सहीनिशी निरोप लिहिल्याचे जाणवते (पाने सात दिवसां पर्यंत वगळू नयेत) पण त्यामुळे सामान्य वाचकास चुकीचा संदेश जाण्याची पण शक्यता आहे.
  5. भविष्यात त्यास उत्तरा दाखल पण संदेश लोकं तिथेच (साईट नोट मध्ये ) देण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि मग मते, विचार, मतभेत ह्याचे प्रदर्शन साईट नोट वरून होण्याचा धोका संभवतो.
  6. वरील संदेश हा निरोप स्वरूपाचा आहे आणि साईट नोटचा वापर नोरोप देण्यासाठी अथवा विशिष्ठ मर्यादित ग्रुपला संबोधण्यासाठी नकरता सामान्य वाचकाच्या दृष्टीने साईटनोटीस लिहावी असे वाटते.

अर्थात हे माझे व्यक्तिगत मत झाले. जर आपण ह्याचेशी सहमत असाल तर साईट नोट मधील संदेश बदलावा.

धन्यवाद

राहुल देशमुख ०६:३३, ९ जानेवारी २०१२ (UTC)

नमस्कार,

माळेगाव (नांदेड) या लेखाचे संपादन करताना मला असे वाटले की याच परिसरातील कंधारचा किल्लागुराखी साहित्य संमेलन या गोष्टीही विकिपीडियावर असणे आवश्यक आहे म्हणून संपादन करतानाच मी त्या लेखात परिसरातील हेही पहा या विभागात या दोन्हींचे दुवे टाकले. दुवे टाकल्यावर ते लाल दिसत असले तरी ती पाने पूर्ण करण्याची जबाबदारी घेतल्यासारखे वाटते व आगामी योगदानात अग्रक्रमाने ती पूर्ण करण्याकडे माझा कल असतो त्याच हिशेबाने मी हे दुवे टाकले होते व वेळ मिळेल तसा दोन-चार दिवसात ते पूर्ण करणार होतो. पण त्यापूर्वीच आपण त्या दुव्यांपैकी गुराखी साहित्य संमेलन हे पान तयार करुन विस्तारासाठी उपलब्ध करुन दिले म्हणून आणि माझ्यासह अन्य विकिकरांचे काम हलके केल्याबद्दल धन्यवाद. -संतोष दहिवळ ०६:१७, १६ जानेवारी २०१२ (UTC)

शंकर शिवदारे

नमस्कार माहीतगार ! शंकर शिवदारे या लेखाची निर्मिती तुम्ही केल्याचे पाहिले. त्यात आता केवळ एकच वाक्य लिहिले गेले आहे. कृपया तो लेख किमान तीन-चार वाक्ये किंवा एका परिच्छेदापर्यंत वाढवावा, अशी विनंती.

नवीन लेख कसे घडवावेत, याचा वस्तुपाठ म्हणून प्रचालकांनी/जाणत्या सदस्यांनी बनवलेल्या लेखांकडे नवे सदस्य पाहत असतात. त्यामुळे तुमच्या-माझ्यसह सर्व जाणत्या सदस्यांवर नवीन लेख लिहितान काही वाक्ये लिहून विषयाची प्रस्तावना मांडण्याची नैतिक जबाबदारी येऊन पडते.

--संकल्प द्रविड (Sankalp Dravid) (चर्चा | योगदान) ०६:५९, २३ जानेवारी २०१२ (UTC)

ओके. कदाचित एखादा स्वतंत्र आयडी घेऊन संपादने केल्यासही मागोवा घेणे सोयीचे होईल. किंवा त्यापेक्षाही अजून एक चांगली कल्पना अशी, की एक-दोन वाक्ये लिहून लेख निर्मिला गेला तरीही, त्यात अन्य संकेतस्थळावर माहितीपूर्ण लेख असल्यास बाह्य दुवे म्हणून तसे दुवे नोंदवणे. याने ऑनलाइन स्तरावर सक्रिय असलेल्या लोकांना पुढील माहिती भरायला मदत/इनपुट मि़ळेल.

--संकल्प द्रविड (Sankalp Dravid) (चर्चा | योगदान) ०३:१२, २४ जानेवारी २०१२ (UTC)

Return to the user page of "Mahitgar/जुनी चर्चा ६".
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत