शंकर केशव कानेटकर

शंकर केशव कानेटकर ऊर्फ कवी गिरीश (ऑक्टोबर २८, इ.स. १८९३:सातारा, महाराष्ट्र, भारत - डिसेंबर ४, इ.स. १९७३) हे मराठी कवी होते. साताऱ्यात जन्मलेल्या कानेटकरांनी फर्ग्युसन व विलिंग्डन या कॉलेजांतून अध्यापन केले. ते मुधोजी हायस्कूल, फलटण या शाळेचे प्राचार्य होते. त्यांनी अनेक प्रसिद्ध कविता फलटण मुक्कामी रचल्या आहेत.[१] कवी गिरीश हे रविकिरण मंडळाचे एक प्रमुख सदस्य होते.

कवी गिरीश
जन्म नावशंकर केशव कानेटकर
टोपणनावगिरीश
जन्मऑक्टोबर २८, इ.स. १८९३
सातारा
मृत्यूडिसेंबर ४, इ.स. १९७३
पुणे
राष्ट्रीयत्वभारतीय
कार्यक्षेत्रसाहित्य
भाषामराठी
साहित्य प्रकारकविता
वडीलकेशव कानेटकर
अपत्येनाटककार वसंत कानेटकर व मुंबई आकाशवाणीवरील भूतपूर्व अधिकारी आणि गायक मधुसूदन कानेटकर

कवी गिरीश यांचे ५ काव्यसंग्रह आहेत. त्याशिवाय त्यांनी चार स्वरचित खंडकाव्ये व टेनिसनच्या ’इनॉक आर्डेन’चा ’अनिकेत’ हा काव्यानुवाद केला. माधव ज्युलियन यांचे चरित्र त्यांनी लिहिले, तर रेव्हरंड ना.वा. टिळक यांच्या ख्रिस्तायनची प्रत संपादित केली.

लेखन

  • कांचनगंगा (काव्यसंग्रह)
  • चंद्रलेखा (काव्यसंग्रह)
  • फलभार (काव्यसंग्रह)
  • बालगीत (काव्यसंग्रह)
  • सोनेरी चांदणे (काव्यसंग्रह)
  • कवी यशवंत आणि गिरीश यांच्या एकत्रित कवितांचे ‘वीणाझंकार’ व ‘यशो-गौरी’ या नावांचे दोन कवितासंग्रह आहेत.[२]
  • माधव ज्यूलियन यांचे ‘स्वप्नलहरी’ तसेच रेव्हरंड ना.वा. टिळक यांचे ‘ख्रिस्तायन’ या ग्रंथांचे संपादन.

संदर्भ

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत