विमान वाहतूक कंपनी

विमान वाहतूक कंपनी ही प्रवासी व मालाची हवाई वाहतूक करणारी कंपनी आहे.

जेट एरवेझ ही भारतामधील एक आघाडीची प्रवासी विमान वाहतूक कंपनी आहे.
ब्ल्यू डार्ट एव्हीएशन ही भारतामधील एक आघाडीची माल विमान वाहतूक कंपनी आहे.

नोव्हेंबर १९०९ मध्ये स्थापन झालेली डेलाग (जर्मन: Deutsche Luftschiffahrts-Aktiengesellschaft) ही फायदेतत्त्वावर हवाई वाहतूक करणारी जगातील सर्वात पहिली कंपनी होती. १९१९ सालापासून सतत सेवेत असणारी के.एल.एम. ही जगातील सर्वात जुनी कंपनी आहे. सध्या अनेक देशांमध्ये विमान कंपन्यांवर पूर्णपणे त्या देशातील सरकारचे नियंत्रण असून खाजगी कंपन्यांना परवानगी नाही. भारतासह बव्हंशी देशांमध्ये नागरी उड्डाण खुले असून अनेक कंपन्या विमान वाहतूक चालवू शकतात.

आय.ए.टी.ए.आय.सी.ए.ओ. ह्या दोन आंतरराष्ट्रीय संस्था जगातील हवाई वाहतूक नियंत्रित करतात. एरबसबोइंग ह्या विमान उत्पादन करणाऱ्या जगातील प्रमुख कंपन्या आहेत.

जगातील मोठ्या विमान वाहतूक कंपन्या

महसूलानुसार

फोर्ब्ज मासिकामधील माहितीनुसार:[१]

क्रमकंपनीदेशमहसूल ($B)नफा ($B)मालमत्ता ($B)बाजार मूल्य ($B)
1अमेरिकन एरलाइन्स 40.41.942.335.8
2लुफ्तान्सा 39.90.440.112.3
3युनायटेड एरलाइन्स 38.30.636.823.6
4डेल्टा एरलाइन्स 37.72.759.439.9
5एर फ्रान्स-के.एल.एम. 34-2.4354.7
6ब्रिटिश एरवेझ-आयबेरिया 24.70.228.614.3
7साउथवेस्ट एरलाइन्स 17.70.819.316.8
8ऑल निप्पॉन एरवेझ 160.220.57.6
9चायना सदर्न एरलाइन्स 15.90.327.33.7
10क्वांटास 14.9-0.317.92.2

प्रवासी संख्येनुसार (दशलक्ष)

क्रमकंपनी20132012201120102009संदर्भ
1 अमेरिकन एरलाइन्स1193.7107.8107.2105.2104.5
[२]
2 डेल्टा एरलाइन्स2164.6164.6163.8162.6161.1
[३]
3 युनायटेड एरलाइन्स3139.2140.4141.8145.681.4
[४]
4 साउथवेस्ट एरलाइन्स4133.1133.9135.2106.2101.3
[५]
5 रायनएर81.479.375.872.166.5
[६]
6 चायना ईस्टर्न एरलाइन्स79.173.168.764.944.0
[७]
7 लुफ्तान्सा76.374.765.558.955.6
[८]
8 लाताम एरलाइन्स66.765.019.717.315.4
[९]
9 चायना सदर्न एरलाइन्स64.561.858.757.749.4
[१०]
10 इझीजेट61.359.255.549.746.1
[११]
टीपा

संदर्भ आणि नोंदी

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत