वसंत डावखरे

वसंत डावखरे (१९४९ - ४ जानेवारी, २०१८) हा महाराष्ट्रातील राजकारणी होते. हे शेतकरी कुटुबात जन्माला आले. महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांचा राजकारणाशी संबंध आला. हिवरे गावचे सरपंच ते विधान परिषदेचे उपसभापती हा त्यांचा राजकारणातील प्रवास आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यावर वसंत डावखरे काँग्रेसमधून राष्ट्रवादीमध्ये गेले.

१९८६ साली ठाणे महापालिकेची स्थापना झाली. त्यानंतर पहिल्याच निवडणुकीत डावखरे हे नौपाड्यातून काँग्रेसपक्षातर्फे नगरसेवक म्हणून विजयी झाले. १९८६-८७ साली ते ठाणे महापालिकेत विरोधी पक्षनेते होते. त्यानंतर ते ठाण्याचे महापौरही झाले. ठाणे जिल्ह्यातील मोठे नेते म्हणून डावखरे यांची ख्याती होती. त्यानंतर १९९२ पासून चार वेळा ते विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवडून गेले. १९९८ मध्ये विधान परिषदेच्या उपसभापतीपदी त्यांची एकमताने निवड झाली. त्यानंतर सलग १८ वर्षे ते उपसभापती होते. २०१६ च्या निवडणुकीत ते पराभूत झाले.

लष्करे तोयबाची कुप्रसिद्ध दहशतवादी इशरत जहाँ हिला गुजरात पोलिसांनी मारून टाकल्यानंतर, डावखरे यांनी तिच्या कुटुंबीयांना व्यक्तिगतरीत्या एक लाख रुपयांची मदत केली होती.

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत