रश्मी आनंद

रश्मी आनंद या एक भारतीय कार्यकर्त्या आणि लेखिका आहे ज्यांचे कार्य कौटुंबिक हिंसाचाराबद्दल आहे. ज्यासाठी त्यांना भारताच्या राष्ट्रपती द्वारा नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित केले गेले. भारतातील महिलांसाठी हा सर्वोच्च पुरस्कार आहे. तिने "वुमन ऑफ द एलिमेंट्स ट्रस्ट" ची स्थापना केली जी दिल्लीतील कौटुंबिक अत्याचार पीडितांना मदत पुरवते.

रश्मी आनंद
जन्मकोलकाता
निवासस्थानदिल्ली
राष्ट्रीयत्वभारतीय
पेशालेखिका, समाजसेवा
मालकवुमन ऑफ द एलिमेंट्स ट्रस्ट
पुरस्कारनारी शक्ती पुरस्कार
संकेतस्थळ
www.rashmianand.com

वैयक्तिक आयुष्य

आनंद यांचे बालपण कोलकाता शहरात गेले. त्यानंतर त्या दिल्ली येथे गेल्या. त्यांचे लग्न दिल्ली शहरातील एका वकिलासोबत झाले. त्यांच्या पतीने मारहाण केल्याने अनेकदा त्यांना रुग्णालयात जावे लागले होते. तरीही त्यांनी संसार न मोडता टिकून राहावे अशी त्यांच्या पालकांची इच्छा होती.[१]

आनंद यांनी दहा वर्षे पतीकडून शारीरिक अत्याचार सहन केले. तोपर्यंत त्यांना दोन मुले झाली होती. शेवटी एकदिवस त्यांनी आपले घर सोडले. त्यांच्या सोबत त्यांचा सहा वर्षांचा मुलगा होता, जो या घरगुती हिंसाचारामुळे मुका झाला होता.[२] पतीने दिलेल्या धमक्यांमुळे तिने त्यांच्यावर केस तर केली नाही परंतु आपल्या मुलांचा ताबा मात्र मिळवला. याच कथेवर त्यांनी आपले पहिले पुस्तक लिहिले.[१]

इ.स. २०१० चे दिल्ली पोलिस कॅलेंडर त्यांच्या या पहिल्या पुस्तकावर आधारित होते.[३]

नंतर त्यांनी "वुमन ऑफ द एलिमेंट्स ट्रस्ट" ची स्थापना केली जी दिल्लीतील क्राईम अगेन्स्ट वुमन सेल[४][२] येथे घरगुती अत्याचाराला बळी पडलेल्यांना मोफत कायदेशीर आणि भावनिक आधार देत होती.

इ.स. २०१४ मध्ये त्यांना शबाना आझमी यांच्या हस्ते 'धैर्य आणि शौर्यासाठी' नीरजा भानोत पुरस्कार मिळाला. वीर हवाई सुंदरी नीरजा भानोट यांच्या स्मरणार्थ दरवर्षी १,५०,००० रुपये सह हा पुरस्कार दिला जातो.[४]

इ.स. २०१५ मध्ये त्यांच्या नेतृत्व आणि कार्यासाठी त्यांना पहिल्या आठ नारी शक्ती पुरस्कारांपैकी एक पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.[५] भारताचे तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय महिला दिनी हा पुरस्कार देण्यात आला.[६]

आनंद यांनी तेरा पुस्तके लिहिली आहेत. त्यांची जीवनकथा भारतीय टीव्ही शो सत्यमेव जयते मध्ये दाखवली गेली आहे. चिकन सूप फॉर द सोलच्या अंकात "जागरण" या शीर्षकाखाली त्यांची जीवनकथा दाखवली गेली.[३]

पुरस्कार

  • २०१५ मध्ये भारताच्या राष्ट्रपतींकडून नारी शक्ती पुरस्कार[५]
  • नीरजा भानोत पुरस्कार[४]
  • कर्मवीर ज्योती,
  • कर्मवीर पुरस्कार[३]
  • 'आधी आबादी बात नारी की' चा दूरदर्शनचा वुमन अचिव्हर पुरस्कार,
  • द भारत एक्सलंसी पुरस्कार,
  • वुई आर द सिटी - रायझिंग स्टार इंडिया - २०१६[७]
  • इंडियन वुमन अचिव्हर्स अवॉर्ड
  • इंडियन कौन्सिल फॉर यूएन रिलेशन कडून साहित्यासाठी पुरस्कार.[८]

संदर्भ

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत