माधवी मुद्गल

भारतीय नृत्यांगना

माधवी मुद्गल ( ४ ऑक्टोबर १९५१, दिल्ली) [१] एक भारतीय शास्त्रीय नृत्यांगना आहेत. त्या ओडिसी नृत्य शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. संस्कृती  पुरस्कार (१९८४), पद्मश्री पुरस्कार (१९९०)[२], ओरिसा राज्य संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९९६), फ्रेंच सरकारचा ग्रँड मेडेल डेला विले (१९९७), केंद्रिय संगीत नाटक अकादमी पुरस्कार (२०००) , दिल्ली राज्य परिषद सन्मान (२००२) आणि नृत्य चुडामणी ही उपाधी (२००४) [३] असे अनेक पुरस्कार त्यांना लाभले आहेत.

माधवी मुद्गल

माधवी मुद्गल
आयुष्य
जन्म४ ऑक्टोबर १९५१
जन्म स्थानदिल्ली
संगीत कारकीर्द
कार्यओडीसी नृत्य
पेशानर्तिका, नृत्य दिग्दर्शक
कार्य संस्थागांधर्व महाविद्यालय, दिल्ली
गौरव
गौरवपद्मश्री
पुरस्कारसंगीत नाटक अकादमी पुरस्कार – २०००

बालपण

माधवी मुद्गल यांचे वडील म्हणजे नवी दिल्लीतील हिंदुस्थानी संगीत आणि शास्त्रीय नृत्य यासाठी सर्वात प्रसिद्ध असलेल्या गांधर्व महाविद्यालयाचे संस्थापक प्राध्यापक विनयचंद्र मौदगल्य. माधवी मुद्गल यांना आपल्या कुटुंबाकडूनच कला आणि नृत्य प्रेमाचा वारसा मिळाला. त्या स्वर्ण-सरस्वती यांच्याकडून भरतनाट्यम तसेच आणि दुर्गा लाल आणि बिरजू महाराज यांच्याकडून कथक शिकल्या. वयाच्या चौथ्या त्यांनी पहिले सार्वजनिक सादरीकरण केले. गुरू श्री. हरेकृष्ण बेहरा यांच्या योग्य मार्गदर्शनाखाली त्यांनी ओडिसी नृत्याच्या शिक्षणाला सुरुवात केली.[४] सुरुवातीला त्या भरतनाट्यम आणि कथक शिकल्या तरीही शेवटी त्यांनी ओडिसी नृत्याला आपल्या अभिव्यक्तीचे माध्यम म्हणून निवडले. महान गुरू केलुचरण महापात्रांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे ओडिसी कला कौशल्य उत्तम प्रकारे बहरून आले.

नृत्यक्षेत्रातील कारकीर्द

नृत्यदिग्दर्शनाच्या क्षेत्रातील माधवी मुद्गल यांचे कौशल्य आणि नवोदित कलाकारांना ओडीसी नृत्यातील बारकावे शिकवण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठीची बांधिलकी यासाठी त्या जगभरात विख्यात आहेत.जगभरातील नृत्य महोत्सवांमध्ये त्यांच्या सादरीकरणाचे कौतुक झाले आहे. यामध्ये युकेचा एडिंबरो आंतरराष्ट्रीय नृत्य महोत्सव,[५] अमेरिकेतील भारतीय महोत्सव; सर्व्हेंटिनो महोत्सव, मेक्सिको; व्हिएन्ना नृत्य महोत्सव, ऑस्ट्रिया; भारतीय नृत्य महोत्सव, दक्षिण आफ्रिका; भारतीय संस्कृती सण, साओ पाउलो, ब्राझील; भारतीय संस्कृती दिवस, हंगेरी; लंडन; ॲोविग्नॉन फेस्टिव्हल, फ्रान्स; पिना बाशचा उत्सव, वुपरताल आणि बर्लिन फेस्पीइल, जर्मनी; आणि इटली, स्पेन, लाओस, व्हिएतनाम, मलेशिया, जपान आणि भारतीय उपखंडातील महोत्सवांचा समावेश आहे. ओडिसी नृत्याला ध्वनीचित्रफितींच्या सादरीकरणांच्या तसेच मैफिली, भारतात खास नृत्य महोत्सवांचे आयोजन या माध्यमातून भारतीय शास्त्रीय नृत्य प्रकारांपैकी एक म्हणून स्थान देण्यामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. गुरू केलुचरण महापात्रा यांनी माधवी यांना आपली शिष्या म्हणून स्वीकारले, तो दिवस आपल्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय दिवस आहे, असे त्यांना वाटते.[३] त्यांनी आर्किटेक्चरमध्ये डिप्लोमा केला आहे आणि त्या बऱ्याचदा वेगवेगळी मासिके आणि पुस्तकांसाठी लिहितात.

वैयक्तिक आयुष्य

त्यांचे भाऊ पद्मश्री पुरस्कार विजेते, मधुप मुद्गल हे ख्याल आणि भजन गाण्यासाठी प्रसिद्ध आहेत.[६] ते संगीतकार, संगीत संयोजक देखील आहेत आणि १९९५ पासून गांधर्व महाविद्यालय, नवी दिल्लीचे प्राचार्य आहेत. आपली भाच्ची, मधुप मुद्गल यांची मुलगी आरुषी यांना माधवी मुद्गल यांनी ओडीसी नृत्याचे प्रशिक्षण दिले.[७] तिने आपले पहिले एकल ओडीसी सादरीकरण २००३ मध्ये केले. २००८ मध्ये जर्मन नृत्यदिग्दर्शक पीना बाउश यांनी आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय नृत्य महोत्सव २००८ मध्ये भाग घेणारी ती एकमेव भारतीय नृत्यांगना होती. यामध्ये तिने बागेश्री हा स्वतः नृत्यदिग्दर्शन केलेला प्रकार सादर केला. माधवी मुदगल यांचे दुसरे भाऊ मुकुल मुदगल दिल्ली उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश आहेत.[८]

संदर्भ

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत