महावतार बाबाजी

हिंदू योगी

महावतार बाबाजी हे एका भारतीय संताला इ. स. १८६१ ते १९३५ या दरम्यान भेटलेल्या लाहिरी महाशय व लाहिरींच्या अनेक शिष्यांनी[१] दिलेले नाव आहे. यांपैकी काही भेटींचे वर्णन परमहंस योगानंद यांनी ऑटोबायोग्रफी ऑफ अ योगी या आपल्या पुस्तकात केलेले आहे.[२] या पुस्तकात योगानंद व महावतार बाबाजी यांच्याही भेटीचा तपशील आहे. द होली सायन्स या आपल्या पुस्तकात श्री युक्तेश्वर गिरी यांनीही काही भेटींचा तपशील दिलेला आहे.[३] श्री मधुकर नाथ यांच्या आत्मचरित्राप्रमाणे (अप्रेन्टिस्ड टू अ हिमालयन मास्टर) बाबाजी हे शिवरूप होते. आपल्या पुस्तकातील शेवटून दुसऱ्या प्रकरणात त्यांनी बाबाजींनी आपले रूप शिवाप्रमाणे बदलल्याचा उल्लेख केलेला आहे. हे सर्व वृत्तान्त आणि आणखी काही भेटींचा तपशील विविध चरित्रांमध्ये उपलब्ध आहे. [४][५][६] योगानंदांच्या आत्मचरित्राप्रमाणे बाबाजी भारतातील हिमालय क्षेत्रात किमान काही‘शे’ वर्षे राहिलेले होते आणि त्यांना प्रत्यक्ष भेटीत केवळ काही शिष्यांनी व अन्य व्यक्तींनीच पाहिले होते.[७] [८]

महावतार बाबाजी - ऑटोबायोग्रफी ऑफ अ योगीमधील रेखाचित्र. परमहंस योगानंद यांनी हे चित्र स्वतःच्या भेटीच्या आधारे काढवून घेतले होते.

संदर्भ व नोंदी

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत