मंजुला अनागनी


मंजुला अनागनी या एक भारतीय प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ आहेत.[१]

मंजुला अनागनी
२०१५ मध्ये मंजुला अनागनी (डावीकडे) राष्ट्रपतींकडून(प्रणव मुखर्जी) पद्मश्री पुरस्कार प्राप्त करताना
पेशास्त्रीरोगतज्ज्ञ
जोडीदारसुरेश कोल्ली
पुरस्कारपद्मश्री
संकेतस्थळ
drmanjula.in

प्रारंभिक जीवन आणि शिक्षण

मंजुला अनगानींचा जन्म भारतातील तेलंगणा जिल्ह्यात झाला. त्या त्यांच्या तीन भावंडांमध्ये दुसऱ्या होत्या. अभियांत्रिकी कृषी आणि वैद्यकीय सामायिक प्रवेश परीक्षेत त्या ५८ व्या क्रमांकावर होत्या. नंतर त्यांनी गांधी वैद्यकीय महाविद्यालय प्रवेश घेतला. दहावीच्या शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी मुख्यमंत्र्यांची शिष्यवृत्ती त्यांना मिळाली होती. त्यांनी हैदराबाद उस्मानिया वैद्यकीय महाविद्यालय डॉक्टर ऑफ मेडिसिन पदवी प्राप्त केली.[citation needed]

नंतर त्यांनी जन्माच्या आधी अनुवांशिक मूल्यमापन, वंध्यत्व, अल्ट्रासोनोग्राफी आणि हिस्टेरोस्कोपी आणि लेप्रोस्कोपी यांसारख्या किमान आक्रमक प्रक्रियांचे उच्च प्रशिक्षण घेतले.[<span title="This claim needs references to reliable sources. (January 2019)">संदर्भ हवा</span> ]

कारकीर्द

द हिंदू या वर्तमान पत्राद्वारे, मंजुला अनागनी यांनी नवीन लॅपरोस्कोपिक तंत्रे विकसित केली आहेत. प्राथमिक अमेनोरिया, एंडोमेट्रियल पुनरुत्पादनासाठी स्टेम सेल प्रक्रिया आणि निओव्हाजिना तयार करण्याच्या तंत्रावर काम केले आहे.[२]

२०१५ मध्ये त्यांना भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला.[३] हा भारतातील चौथा सर्वोच्च भारतीय नागरी पुरस्कार आहे. २०१६ मध्ये, मुंबईतील इंडिया लीडरशिप कॉन्क्लेव्हमध्ये मंजुला अनागनी यांना इंडियन अफेअर्स इंडियन ऑफ द इयर पुरस्कार देखील मिळाला.[४] त्याच वर्षी, एकाच ऑपरेशनमध्ये गर्भाशयाच्या फायब्रॉइड्सची सर्वात जास्त संख्या काढून टाकल्याबद्दल त्यांना गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने देखील मान्यता दिली. त्यांनी आणि त्यांच्या टीमने एकूण ४ किलोग्रॅम वजनाचे ८४ फायब्रॉइड्स काढले. त्यातील सर्वात मोठ्या फायब्रॉइड्सचे वजन १.०७ किलो होते. मिनिमली-इनवेसिव्ह लो ट्रान्सव्हर्स मिनी-लॅपरोटॉमी चीराद्वारे कार्य करते.[५]

महिलांच्या आरोग्यासाठी मोहीम राबवण्यासाठी मंजुला अनागनी यांनी प्रत्युषा नावाच्या बिगर-सरकारी संस्थेची सह-स्थापना केली आहे.[२]महिला सक्षमीकरणासाठी त्या खूप काही करत आहेत. ८ फेब्रुवारी २०२० रोजी त्या अतिथी वक्ता होत्या आणि त्यांनी 'शी सेफ वॉक' मध्ये भाग घेतला. त्यांच्या उपक्रमाद्वारे त्या जगासाठी प्रेरणा आहेत.

वैयक्तिक जीवन

अनगनीचा विवाह कोल्ली सुरेशशी झाला आहे. [२]

संदर्भ

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत