भाषांतरित-रूपांतरित नाटके

मराठी नाटके ही दीर्घकाळपर्यंत केवळ भाषांतरितच असत. सुरुवातीला संस्कृत आणि नंतर पाश्चात्त्य नाट्यकृतींची भाषांतरे मराठी रंगभूमीवर येत. यांशिवाय अनेक भारतीय भाषांमधील नाटकांचीही मराठीत भाषांतरे होत गेली. ज्यांनी अशी नाटके मराठी रंगभूमीवर आणली, त्यांनी मराठी प्रेक्षक या नाटकांशी कितपत समरस होऊ शकेल याचा विचार केला होताच असे नाही. उदाहरण म्हणून आयनेस्कोच्या ’चेअर्स’चे वृंदावन दंडवते यांनी केलेले ’खुर्च्या’ हे भाषांतरित नाटक. ’रंगायन’ने जेव्हा ’खुर्च्या’चा प्रयोग केला तेव्हा तो प्रेक्षकांच्या डोक्यावरून गेला. यामुळेच अनेक मराठी नाटककारांनी पाश्चात्त्य नाटकांना मराठी बाज देऊन त्या नाटकांचे मराठीत रूपांतर केले. विल्यम शेक्सपियरच्या ३६ नाटकांपैकी २७ नाटकांची मराठीत भाषांतरे वा रूपांतरे झाली आहेत.त्या सर्व नाटकांची यादी याच विकिपीडियावर शेक्सपियर या लेखात आली आहे. त्याशिवाय अन्य अमराठी भाषांतून अनेक नाटके मराठीत आली. त्या बहुतांशी नाटकांची नावे पुढे दिलेल्या तक्त्यात दिली आहेत. ही यादी अर्थात परिपूर्ण असणे शक्य नाही; आणि जशीजशी नवीन रूपांतरित नाटके मराठीत येतील, तशीतशी या यादीत सतत भरच पडत जाईल.

मराठीतील भाषांतरित-रूपांतरित नाटकांची जंत्री :

नाटकाचे नावमराठी रूपांतरकारमूळ नाटकभाषात्याचा लेखक
अजब न्याय वर्तुळाचाचिं.त्र्यं. खानोलकरद कॉकेशियन चॉक सर्कलजर्मनब्रेख्त
ॲंटिगॉनश्रीराम लागूॲंटिगॉनग्रीकसोफोक्लीज
अडीच घरे वजिरालायशवंत केळकरमेघबंगालीउत्पल दत्त
अंमलदारपु.ल. देशपांडेद गव्हर्नमेन्ट इन्स्पेक्टर ऊर्फ इन्स्पेक्टर जनरलरशियननिकोलाय गोगोल
आईमाधव मनोहरमदरइंग्रजीकॅरेल कॅपोक
आंधळ्याची शाळाश्रीधर वर्तकग्वॉन्टलेटइंग्रजीबायरसन (?)
आधे अधुरेविजय तेंडुलकरआधे अधुरेहिंदीराकेश मोहन
आनंदवि.वा.शिरवाडकरआनंद(चित्रपट)हिंदी
उत्तम रामचरित्रश्रीपाद बेलवलकरउत्तररामचरित्रसंस्कृतभवभूती
उत्तम रामचरित्र नाटकपरशुराम गोडबोलेउत्तम रामचरित्रसंस्कृतभवभूती
उद्याचे जगमधुसूदन कालेलकरमदरइंग्रजीकॅरेल कॅपोक
उसना नवराना.धों. ताम्हनकरहर स्टेप हजबंडइंग्रजीलॅरी जॉन्सन
एक झुंज वाऱ्याशीपु.ल देशपांडेद लास्ट अपॉइन्टमेन्ट(कथा)रशियन
एक रात्र, अर्धा दिवस(पवित्र ज्योति)लीला चिटणीसद सेक्रेड फ्लेमइंग्रजीसॉमरसेट मॉम
एक होती राणीश्रीराम लागूLa regina egle in sortiइटालियनऊगो बेट्टी
एका रात्रीचा घोटाळामारुती पाटीलशी स्टूप्स टु कॉंकरइंग्रजीगोल्ड स्मिथ
एवम्‌ इंद्रजितअरविंद देशपांडेएवम्‌ इंद्रजितबंगालीबादल सरकार
ओझ्यावाचून प्रवासीशांता वैद्यद ट्रॅव्हेलर विदाउट लगेज (अ व्हॉयेजर सीम्स बॅग्ज)फ्रेन्चज्यॉं अनुई
कवडीचुंबकप्र.के. अत्रेला व्हार (द मायझर)फ्रेन्चमोलियर
कमलाय.ना. टिपणीसथेल्मा(कादंबरी)इंग्रजीमेरी कॉरेली
कमळेचे लग्न (कपट विवाह)वि.सी. गुर्जरल अमूर मेन्डसेफ्रेन्चमोलियर
काचेची खेळणीवसंत कामतद ग्लास मेनाजेरीजइंग्रजीटेनेसी विल्यम्स
कार्टी प्रेमात पडलीरत्‍नाकर मतकरीद स्मॉल बॅचलर (कादंबरी)इंग्रजीपी.जी.वुडहाउस
कार्टी श्रीदेवीवसंत सबनीसआय वॉन्ट टु बी इन पिक्चर्सइंग्रजीनील सायमन
कीर्तिसिंह (संगीत)आचार्य मार्तंडद टेलिस्मनइंग्रजीवॉल्टर स्कॉट
कुटाळकंपूवि.बा.आंबेकरद स्कूल फॉर स्कॅन्डलइंग्रजीरिचर्ड ब्रिन्सले शेरिडन
कृष्णाकुमारीबापू भावेकृष्णाकुमारी(कादंबरी)बंगालीमायकेल दत्त
कोंडीअशोक शहाणेअ‍ॅन एनेमी ऑफ द पीपलइंग्रजीहेन्‍रिक इब्सेन
कौटिल्यके. नारायण काळेमुद्राराक्षसम्‌संस्कृतविशाखादत्त
खुर्च्यावृंदावन दंडवतेचेअर्सइंग्रजीआयेनेस्को
खून पहावा करूनसरिता पदकीनॉट इन द बुकइंग्रजीऑर्थर वॅटकिन
गगनभेदीवसंत कानेटकरऑथेल्लो+किंग लिअर+मॅकबेथ+हॅम्लेटइंग्रजीविल्यम शेक्सपियर
गंभीर घटनागोविंदराव टेंबेदि इंपॉर्टन्स ऑफ बीइंग अर्नेस्टइंग्रजीऑस्कर वाइल्ड
गर्वनिरसन (सुंदरी)गोविंद काळेलेडी ऑफ लिऑन्सइंग्रजीलॉर्ड लिन्टन
गुरूबाजीर.धों. कर्वेल तात्युर्फफ्रेन्चमोलियर
गृहपाशन.का. घारपुरेहायमाटजर्मनसुंडरमान हेरमान
गोचीसदानंद रेगेगॉन आउटपोलिशतादोझ रूझिविच
गौराईव्यंकटेश माडगूळकरद रोझ टॅटूइंग्रजीटेनेसी विल्यम्स
घरकुलअनंत काणेकरडॉल्स हाउसइंग्रजीहेन्‍रिक इब्सेन
चंद्र जेथे उगवत नाहीवि.वा. शिरवाडकररिसरेक्शनरशियनटॉलस्टॉय
चंद्र नभीचा ढळलापुरुषोत्तम दारव्हेकरकॅलिगुलाआल्बर्ट कामू
चंद्रशेखर (समर्थ भिकारी)भा.वि. वरेरकरसाइन ऑफ द क्रॉसइंग्रजीबॅरेट विल्सन
चांगुणाआरती हवालदार(मानसी कणेकर)यर्मास्पॅनिशफेडरिको गार्सिया लॉर्की
चित्रांगदारामचंद्र व हेमचंद्र चित्रेचित्राबंगालीरवींद्रनाथ टागोर
चेहरे आणि मुखवटेपद्माकर गोवईकरद मास्क ॲन्ड द फेसफ्रेन्चलुइजी चिआरली
जनावरशं.ना.नवरेइंग्रजीएडवर्ड आल्बी
जबरीचा विवाहह.ना. आपटेल मरिआन फोर्सेफ्रेन्चमोलियर
जयध्वज(असूयाग्निशमन)ह.ना. आपटेहेर्नानीफ्रेन्चव्हिक्टर ह्यूगो
जळते शरीरह.वि. देसाईघोस्ट्‌सइंग्रजीहेन्‍रिक इब्सेन
जुलूसअमोल पालेकरजुलूसबंगालीबादल सरकार
ज्याचे होते प्राक्तन शापितसदानंद रेगेमॉर्निंग बिकम्स एलेक्ट्राओनील यूजीन
ज्वालेत उभी मीअनिल जोगळेकरकॅट ऑन अ हॉट टिन रूफइंग्रजीटेनेसी विल्यम्स
झुंजअनंत काणेकरस्ट्राइफइंग्रजीगॉल्स वर्दी
डाकघरकाशीनाथ भागवतपोस्ट ऑफिसबंगालीरवींद्रनाथ टागोर
डॉक्टर हुद्दारश्री.ना. पेंडसेडर्टी हॅन्ड्सफ्रेन्चज्यॉं पॉल सात्र
तलेदंडउमा कुलकर्णीतलेदंडकानडीगिरीश कर्नाड
तक्षशिलाश्री.वि. वर्तकद व्हायकिंग्ज ऑफ हेल्गोलॅन्डइंग्रजीहेन्‍रिक इब्सेन
तीन पाशेर पाला (बंगाली)शंभू मित्रथ्री पेनी ऑपेराजर्मनब्रेख्त
तीन पैशाचा तमाशापु.ल. देशपांडेथ्री पेनी ऑपेराजर्मनब्रेख्त
ती फुलराणीपु.ल. देशपांडेपिग्मॅलियनइंग्रजीजॉर्ज बर्नार्ड शॉ
तुघलकविजय तेंडुलकरतुघलककानडीगिरीश कर्नाड
तोही मी आणि हाही मीच अथवा नवरदेवाची जोडगोळीन.चिं.केळकरद रायव्हल्सइंग्रजीरिचर्ड ब्रिन्सले शेरिडन
दुर्गागो.ब. देवलफेटल मॅरेजइंग्रजीइसाबेला
दूरचे दिवेवि.वा. शिरवाडकरआयडियल हजबंडइंग्रजीऑस्कर वाइल्ड
देवाजीने करुणा केलीव्यंकटेश माडगूळकरद गुड वुमन ऑफ सेत्सुआनजर्मनबर्टोल्ट ब्रेख्त
धूर्तविलसितह.ना. आपटेफ्रेन्चमोलियर
नागमंडलराजीव नाईकनागमंडलकानडीगिरीश कर्नाड
नाटककाराच्या शोधात सहा पात्रेमाधव वाटवेसिक्स कॅरॅक्टर्स इन सर्च ऑफ अ‍ॅन ऑथरइटालियनलुइगी पिरॅंदेलो
निशिकांताची नवरीअनंत काणेकरशी स्टूप्स टु कॉंकरइंग्रजीगोल्ड स्मिथ
निळावंतीवसंत सबनीसDer blaue Engel (कादंबरी)जर्मनहेनरिच मान
पंडित विद्याधरदिवाकरफ्राउस्टइंग्रजीगटे
पतंगाची दोरीअनंत काणेकरव्हॉट एव्हरी वूमन नोजइंग्रजीजेम्स बेरी
परी तू जागा चुकलासीह.रा. महाजनीअ‍ॅन एनेमी ऑफ द पीपलइंग्रजीहे्न्‍रिक इब्सेन
पवित्र ज्योति (एक रात्र, अर्धा दिवस)लीला चिटणीसद सेक्रेड फ्लेमइंग्रजीसॉमरसेट मॉम
पांथस्थसरिता पदकीआ: ! वाइल्डनेसइंग्रजीओनील यू्जीन
पिझॅरोना.के.बेहेरेपिझॅरोइंग्रजीरिचर्ड ब्रिन्सले शेरिडन
पिठाचा कोंबडाउमा कुलकर्णीहिट्टीन हुंजाकानडीगिरीश कर्नाड
प्रणयविवाहत्रिं.वि. मोडकड्युएनाइंग्रजीरिचर्ड ब्रिन्सले शेरिडन
प्रतापराव आणि चंद्राननानारायण कानिटकरकेनेल वर्थइंग्रजीवॉल्टर स्कॉट
प्रयोजनके.नारायण काळेद पर्पजइंग्रजीत्यागराज कैलासम्‌
प्रीती परी तुजवरतीराजाराम हुमणेमॅरेज गो राउंडइंग्रजीलेस्ली स्टीव्हन्स
प्रेमध्वजकृष्णाजी प्रभाकर खाडिलकरद टेलिस्मनइंग्रजीवॉल्टर स्कॉट
प्रेषिताचे पाय मातीचेपद्माकर गोवईकरसलोमीइंग्रजीऑस्कर वाइल्ड
फासअनंत काणेकरअटेन्शनफ्रेन्चडब्ल्यू.ओ. सोमिन
बंद दरवाजे (हिंदी व मराठी)इन कॅमेरा,नो एक्झिट व व्हिशस सर्कलफ्रेन्च/इंग्रजीज्यॉं पॉल सात्र
बंधुप्रेम (सुंदरराव व हंबीरराव)भास्कर पटवर्धनमिस्ट्रीज ऑफ कोर्ट ऑफ लंडनइंग्रजीरेनॉल्ड
बाकी इतिहासअरविंद देशपांडेबाकी इतिहासबंगालीबादल सरकार
बाकी सारंस्ट्रीटकार नेम्ड डिझायरइंग्रजीटेनेसी विल्यम्स
बादशहासदानंद रेगेएम्परर जोन्सइंग्रजीओनील यूजीन
बेइमानवसंत कानेटकरबेकेटफ्रेन्चज्यॉं अनुई
बेकेट(महंत)वि.वा. शिरवाडकरबेकेटफ्रेन्चज्यॉं अनुई
ब्रांदसदानंद रेगेब्रॅन्डइंग्रजीहेन्‍रिक इब्सेन
भाग्यवानपु.ल. देशपांडेशेपीइंग्रजीसॉमरसेट मॉम
भित्रा मोगराव्यं.ल. जोशीअंजुमल्लिगेकानडीगिरीश कर्नाड
भीमरावशिवराम महादेव परांजपेरॉबर्सइंग्रजीशिलर
मराठी शाकुंतललक्ष्मण लेलेअभिज्ञान शाकुंतलम्‌संस्कृतकालिदास
महंत(बेकेट)वि.वा. शिरवाडकरबेकेटफ्रेन्चज्यॉं अनुई
महाराष्ट्र शाकुंतलकेशव गोडबोलेअभिज्ञान शाकुंतलम्‌संस्कृतकालिदास
माते, तुला काय हवंयगो.के. भटविसर्जनबंगालीरवींद्रनाथ टागोर
मारून मुटकून वैद्यबुआह.आ. तालचेलकरद डॉक्टर इन्स्पाइट ऑफ हिमसेल्फफ्रेन्चमोलियर
मारून मुटकून वैद्यबुवाह.ना. आपटेद डॉक्टर इन्स्पाइट ऑफ हिमसेल्फफ्रेन्चमोलियर
मालती माधवकृष्णशास्त्री राजवाडेमालतीमाधवसंस्कृतभवभूती
मालविकाग्निमित्र(संगीत)वामन जोशीमालविकाग्निमित्रसंस्कृतकालिदास
मुक्तधाराकिरातद वॉटर फॉल(मॉडर्न रिव्हर)इंग्रजीरवींद्रनाथ टागोर
मुक्तधाराशिवराम टेंबेमुक्तधाराबंगालीरवींद्रना्थ टागोर
मोरूची मावशीप्र.के.अत्रेचार्लीज ऑन्टइंग्रजीब्रॅन्डन थॉमस
ययातीश्री.रं.भिडेययातीकानडीगिरीश कर्नाड
यक्षप्रमादकिरातमेघदूत(खंडकाव्य)संस्कृतकालिदास
रक्तबीजअरविंद देशपांडेरक्तबीजहिंदीशंकर शेष
रंगेल रंगरावदिवाकरयॉर्कशायर ट्रॅजेडीइंग्रजीथॉमस मिडलटन
रत्‍नावली(संगीत)सीताराम गुर्जररत्नावलीसंस्कृतश्रीहर्ष
राईचा पर्वतना.ह. हेळेकरद स्कू्ल फॉर स्कॅन्डलइंग्रजीरिचर्ड ब्रिन्सले शेरिडन
राजा ईडिपसपु.ल. देशपांडेइडिपसग्रीकसोफोक्लीस
राव जगदेवराव मार्तंडमंगेश पदकीसिरॅनो द बर्जे रॉकफ्रेन्चएदमॉं रोस्तॉं
रावबहादूर पर्वत्याह.ना. तालचेरकरल बुर्झ्वा जान्तिल ऑमफ्रेन्चमोलियर
रिंगणप्रवीण भोळेद कॉकेशियन चॉक सर्कलजर्मनबर्टोल्ड ब्रेख्त
लग्नसोहळा(संगीत)ल.ग. सुळेड्युएनाइंग्रजीरिचर्ड ब्रिन्सले शेरिडन
ल तात्युर्फशांता वैद्यल तात्युर्फफ्रेन्चमोलियर
लोभ नसावा ही विनंतीविजय तेंडुलकरहेस्टी हर्टइंग्रजीजॉन पॅट्रिक
वंगजागृतीकाशिनाथ मित्रजागरणबंगालीहरनाथ बसू
वनहंसीपा.रं. अंबिकेद वाइल्ड डकइंग्रजीहेन्‍रिक इब्सेन
वनहंसीभा.वि. वरेरकरद वाइल्ड डकइंग्रजीहेन्‍रिक इब्सेन
वरवंचना (संगीत)गो.स.टेंबेड्युएनाइंग्रजीरिचर्ड ब्रिन्सले शेरिडन
वल्लभपूरची दंतकथाअमोल पालेकरवल्लभपुरबंगालीबादल सरकार
वाजे पाऊल आपुलेविश्राम बेडेकरसेन्ड मीनो फ्लॉवर्सइंग्रजीकॅरॉल मूर
वाडा भवानी आईचामानसी कणेकरद हाउस ऑफ बर्नाडा आल्बाइंग्रजीफेडरिको गार्सिया लॉर्की
वासनाचक्रविजय तेंडुलकरस्ट्रीटकार नेम्ड डिझायरइंग्रजीटेनेसी विल्यम्स
विकत घेतला न्यायमधुकर तोरडमलद व्हिजिटइंग्रजीफ्रिडरिश ड्यूरनमॅट (?)
विक्रमोर्वशीयभास्कर ताम्हणकरविक्रमोर्वशीयसंस्कृतकालिदास
विचारविलसितगोपाळ भाटेप्राइड ॲन्ड प्रेज्युडिसइंग्रजीजेन ऑस्टिन
विजय जिगीषाधुंडिराज जोशीशी स्टूप्स टु कॉंकरइंग्रजीगोल्ड स्मिथ
विमलादेवीरामचंद्र प्रधानमोनाव्हनाइंग्रजीमेटरलिंक
वीरवंचना (संगीत)गोविंदराव टेंबेड्युएनाइंग्रजीशेरिडन
वेटिंग फॉर गोदोअशोक शहाणेऑन अटेन्डन्ट गोडोइंग्रजीसॅम्युअल बेकेट
वेटिंग फॉर गोदोमाधुरी पुरंदरेऑन अटेन्डन्ट गोडोइंग्रजीसॅम्युअल बेकेट
वेणीसंहारपरशुराम गोडबोलेवेणीसंहारसंस्कृतभट्टनारायण
वैजयंतीवि.वा. शिरवाडकरमोनाव्हनाइंग्रजीमेटरलिंक
व्यक्ती तितक्या प्रकृतीपद्माकर गोवईकरईच इन हिज ओन वेइटालियनलुइगी पिरॅंदेलो
शकुंतला (संगीत)हणमंत महाजनीअभिज्ञान शाकुंतलम्‌संस्कृतकालिदास
शाकुंतलकृष्णशास्त्री राजवाडेअभिज्ञान शाकुंतलम्‌संस्कृतकालिदास
शाकुंतल नाटकपरशुराम गोडबोलेअभिज्ञान शाकुंतलम्‌संस्कृतकालिदास
शाकुंतल(संगीत)अण्णासाहेब किर्लोस्करअभिज्ञान शाकुंतलम्‌संस्कृतकालिदास
शाकुंतल(संगीत)वासुदेव डोंगरेअभिज्ञान शाकुंतलम्‌संस्कृत
शापसंभ्रम(संगीत)गोविंद बल्लाळ देवलशापसंभ्रमसंस्कृतबाणभट्ट
शीलसंन्यासवीर वामनराव जोशीमोनाव्हनाइंग्रजीमेटरलिंक
श्रुतकीर्तिचरितह.ना. आपटेद मोर्निंग ब्राइडइंग्रजीकॉग्रेव्ह
शूर रायबा /शेवटी डाव फसलाहरिश्चंद्र तालचेलकररुचिव्हलाफ्रेन्चव्हिक्टर ह्यूगो
सखाजीराव ढमालेशिवराम सीताराम वागळेद पुरसोनकफ्रेन्चमोलियर
सटवाई अथवा नटमोगऱ्याची फटफजितीड्युएनाइंग्रजीरिचर्ड ब्रिन्सले शेरिडन
समजुतीचा घोटाळाअनंत बर्वेशी स्टूप्स टु कॉंकरइंग्रजीगोल्ड स्मिथ
समर्थ भिकारी (चंद्रशेखर)भा.वि. वरेरकरसाइन ऑफ द क्रॉसइंग्रजीबॅरेट विल्सन
संशयकल्लोळ (संगीत)गो.ब .देवलऑल इन द रॉंगइंग्रजीमर्फी
द साइटलेसदिवाकरद साइटलेसइंग्रजीमेटरलिंक
सारेच सज्जनव्यंकटेश वकीलअ‍ॅन इन्स्पेक्टर कॉल्सइंग्रजीजे.बी. प्रीस्टले
साक्षीदारविद्याधर गोखलेइंग्रजीअ‍ॅगाथा ख्रिस्ती
सुख पाहतास.गं. मालशेस्ट्रेन्ज इन्टरव्ह्यूडइंग्रजीओनील यूजीन
सुंदर मी होणारपु.ल .देशपांडेबॅरट्स ऑफ विंपोल स्ट्रीटइंग्रजीरुडॉल्फ बेसीर
सुंदरराव व हंबीरराव (बंधुप्रेम)भास्कर पटवर्धनमिस्ट्रीज ऑफ कोर्ट ऑफ लंडनइंग्रजीरेनॉल्ड
सुंदरी (गर्वनिरसन)गोविंद काळेलेडी ऑफ लिऑन्सइंग्रजीलॉर्ड लिन्टन
सुमतिविजयह.ना. आपटेमेझर फॉर मेझरइंग्रजीविल्यम शेक्सपियर
सुशील गृहस्थरघुनाथ राजाध्यक्षगुड नेचर्ड मॅनइंग्रजीगोल्ड स्मिथ
हयवदनचि.त्र्यं. खानोलकरहयवदनकानडीगिरीश कर्नाड
हिरा जो भंगला नाहीमालतीबाई बेडेकरअनास्तॉंशियाफ्रेन्चमार्सेल मॉरेट
देखवेना डोळाश्रीनिवास नार्वेकरअ‍ॅन एनिमी ऑफ द पीपलइंग्रजीहेन्रिक इब्सेन


शेक्सपियरच्या नाटकांच्या मराठी रूपांतरांसाठी पहा : विल्यम शेक्सपियर

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत