भारताच्या अधिकृत भाषांची यादी

भारतात वेगवेगळ्या गटांचे लोक वेगवेगळ्या भाषा बोलतात. भारतात जवळपास ८०० प्रमुख भाषा व अंदाजे २०० बोलीभाषा आहेत. भारतीय राज्यघटनेनुसार इंग्रजी आणि हिंदी या दोन केंद्र सरकारच्या व्यवहाराच्या अधिकृत भाषा आहेत. भारताला कोणतीही राष्ट्रभाषा नाही. सर्व स्वतःच्या भाषेसोबत इंग्रजीचा वापर करतात. उदाहरणार्थ, केंद्र शासन माहिती इंग्लिश भाषेत महाराष्ट्र शासनाकडे पाठवते. महाराष्ट्र शासन केंद्र शासनाशी संवाद साधताना मराठी आणि इंग्रजी भाषेचा वापर करते.
भारताच्या २१ भाषा या अधिकृत भाषा आहेत. केंद्र शासनातर्फे घेण्यात येणाऱ्या केंद्रीय सेवांच्या परीक्षांसाठी, कोणताही उमेदवार या २१ पैकी एक किंवा हिंदी/इंग्रजी भाषेची निवड परीक्षेचे माध्यम म्हणून करू शकतो.
भारतीय राज्यघटना किंवा कायद्याने कोणत्याही भाषेला राष्ट्रभाषा असा दर्जा दिलेला नाही. भारतीय कायद्यानुसार जोपर्यंत भारतीय संघराज्याची सर्व राज्ये मान्यता देत नाहीत तोपर्यंत कोणतीही भाषा ही राष्ट्रभाषा म्हणून मान्य करता येणार नाही.
घटनेच्या ३४३ व्या कलमानुसार देवनागरी लिपीत लिहिलेली हिंदी ही केंद्र शासनाच्या व्यवहाराची प्रमुख भाषा तर इंग्रजी ही व्यवहाराची सहकारी भाषा आहे. १९५० साली इंग्रजीचा व्यवहारातील वापर बंद करण्याचे घटनेने मान्य केले होते. दक्षिणेकडील राज्यांच्या विरोधामुळे इंग्रजीचा व्यवहारातील वापर हा १९६५ पासून पुन्हा सुरू करण्यात आला आहे. सध्या केंद्र शासनाशी व्यवहार करताना उपरोल्लेखित दोन भाषांपैकी एका भाषेचा वापर करण्यात येतो.
वेगाने होणारे औद्योगिकीकरण आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांचा अर्थव्यवस्थेवरील प्रभाव यामुळे इंग्रजी हीच आता केंद्र शासनाशी व्यवहाराची प्रमुख भाषा झाली आहे. त्यामुळे केंद्र शासनाशी व्यवहाराची भाषा म्हणून इंग्रजीऐवजी हिंदीचा वापर करणे अवघड झाले आहे.

Every state almost have Sindhi language but we don't have specific state or Union territory but Sindhi is official language of India you can see on Indian currency notes as fifteenth /Last language
भारताचे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश, सर्वात जास्त बोलली जाणारी अधिकृत भाषा.[१][a]

अधिकृत भाषा - केंद्र सरकार

केंद्र सरकारतर्फे प्रशासनामध्ये दोन भाषांचा वापर केला जातो.

  1. इंग्रजी भाषा: ह्या भाषेचा वापर ज्या राज्यांची अधिकृत भाषा हिंदी नाही त्यांच्याशी व्यवहार करताना केला जातो.
  2. हिंदी भाषा: ह्या भाषेचा वापर ज्या राज्यांची अधिकृत भाषा हिंदी आहे त्यांच्याशी व्यवहार करताना केला जातो.

अधिकृत भाषा - राज्य सरकारे

राज्ये

क्र.राज्यअधिकृत भाषाइतर ओळखले भाषा
१.अरुणाचल प्रदेशइंग्रजी भाषा, हिंदी भाषा
२.आंध्र प्रदेशतेलुगू, हिंदी भाषा, उर्दू
३.आसामअसमी, बोडो, बंगाली, करबी
४.उत्तर प्रदेशहिंदी भाषा, उर्दू
५.उत्तराखंडहिंदी भाषा संस्कृत भाषा
६.ओडिशाओरिया
७.कर्नाटककन्नड
८.केरळमल्याळम
९.गुजरातगुजराती
१०.गोवाकोंकणी, मराठीपोर्तुगीज
११.जम्मू आणि काश्मीरउर्दू, काश्मीरी
१२.छत्तीसगडहिंदी भाषा, छत्तीसगडी
१३.झारखंडहिंदी भाषाबंगाली[२]
१४.तमिळनाडूतमिळ, इंग्रजी भाषा
१५.त्रिपुराबंगाली, कोकबोरोक
१६.नागालॅंडइंग्रजी भाषा
१७.पंजाबपंजाबी
१८.पश्चिम बंगालबंगालीनेपाळी
१९.बिहारहिंदी भाषा, उर्दू, भोजपुरी, मगधी, मैथिली
२०.मध्य प्रदेशहिंदी भाषा
२१.मणिपूरमैतेई
२२.महाराष्ट्रमराठी
२३.मिझोरममिझो, इंग्रजी भाषा
२४.मेघालयखासी, गारो, इंग्रजी भाषा
२५.राजस्थानहिंदी भाषा, राजस्थानी
२६.सिक्कीमनेपाळी
२७.हरियाणाहिंदी भाषा, पंजाबी
२८.हिमाचल प्रदेशहिंदी भाषा, पहाडी संस्कृत भाषा

केंद्रशासित प्रदेश

क्र.केंद्रशासित प्रदेशअधिकृत भाषा
१.अंदमान आणि निकोबारनिकोबारी, बंगाली, इंग्रजी भाषा, मल्याळम, पंजाबी, तमिळ, तेलुगू, हिंदी भाषा, उर्दू
२.चंदीगडपंजाबी, हिंदी भाषा
३.दमण आणि दीवइंग्रजी भाषा, गुजराती, मराठी
४.दादरा आणि नगर हवेलीलक्षद्वीपगुजराती, मल्याळम मराठी
५.दिल्लीपंजाबी,इंग्रजी भाषा, उर्दू, हिंदी भाषा
६.पुदुच्चेरीतमिळ, फ्रेंच
७.जम्मू आणि काश्मीरकाश्मीरी
८.लडाखलडाखी

अधिकृत भाषांची सूची

इंग्रजी आणि हिंदीप्रमाणेच खाली दिलेल्या २१ भाषांना भारतीय राज्यघटनेने अधिकृत आणि राजभाषा असा दर्जा दिला आहे.

क्र.अधिकृत भाषाराज्य/समाज
१.आसामीआसाम
२.उर्दूजम्मू आणि काश्मीर, आंध्र प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश
३.ओडियाओडिशा
४.कन्नडकर्नाटक
५.काश्मिरीजम्मू आणि काश्मीर
६.कोंकणीगोवा
७.गुजरातीदादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव, गुजरात
८.डोगरीजम्मू आणि काश्मीर
९.तमिळतमिळनाडू, पुदुच्चेरी, अंदमान आणि निकोबार
१०.तेलुगूआंध्र प्रदेश, पुदुच्चेरी, अंदमान आणि निकोबार
११.नेपाळीसिक्कीम
१२.पंजाबीपंजाब, चंदीगढ, दिल्ली, हरयाणा
१३.बंगालीत्रिपुरा, पश्चिम बंगाल
१४.बोडोआसाम
१५.मराठीमहाराष्ट्र, गोवा
१६.मल्याळमकेरळ, पुदुच्चेरी, लक्षद्वीप
१७.मैतेईमणिपूर
१८.मैथिलीबिहार
१९.संथालीछोटा नागपूर पठारावरील संथाली टोळ्या
२०.संस्कृतपुरातन भाषा
२१.सिंधीसिंधी समाज

इतर महत्त्वाच्या राज्यभाषा

खालील भाषा या विशिष्ट राज्यांच्या अधिकृत भाषा आहेत. मात्र त्यांना भारतीय राज्यघटनेने अधिकृत दर्जा दिलेला नाही.

क्र.राज्यअधिकृत भाषा
१..गोवापोर्तुगीज
२..त्रिपुराकोकबोरोक
३.मिझोरममिझो
४.मेघालयखासी, गारो
५.पुदुच्चेरीफ्रेंच

भारतातील इतर लोकप्रिय भाषा

खालील भाषांच्या भाषिकांची संख्या ही ५० लाखांपेक्षा जास्त आहे. या भाषांना अधिकृत दर्जा देण्यात आलेला नाही. यातील बहुतेक भाषा या हिंदीच्या बोलीभाषा आहेत.

बिहारी

खालील बिहारी भाषांच्या भाषिकांची संख्या ५० लाखांपेक्षा जास्त आहे. यांना अधिकृत दर्जा देण्यात आलेला नाही.

  1. अंगिका — उत्तर आणि दक्षिण बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमधील माल्डा जिल्ह्यात बोलली जाते.
  2. भोजपुरी — बिहार
  3. मागधी — दक्षिण बिहार

राजस्थानी

राजस्थान राज्यातील ५ कोटी लोक हे राजस्थानी भाषिक आहेत. मात्र राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये बोलल्या जाणाऱ्या भाषेमध्ये फरक आहे. यातील बहुतेक लोक हिंदी बोलू शकतात. अनेकांचे मते राजस्थानी ही हिंदीचीच एक बोलीभाषा आहे. राजस्थानी भाषेचे खालील प्रकार आहेत.

  1. मारवाडीमारवाड: जोधपूर, नागौर आणि बिकानेर परिसर.
  2. मेवाडीमेवाड: उदयपूर, चित्तोड आणि कोटाबुंदी परिसर.
  3. शेखावती — शेखावती: सिकर, चुरू, झुंझूनू परिसर.

इतर भाषा

१.कच्छीगुजरातमधील कच्छ प्रदेश.२.कोडवा टाक, कर्नाटकमधील कोडागू जिल्ह्यात बोलली जाते.३.गोंडी (गोंड टोळ्या)४.तुळू — कर्नाटक व केरळमधील तुळू लोकांकडून बोलली जाते.५.भिल्ली (भिल्ल टोळ्या)६संकेती — कर्नाटक, केरळ व तमिळनाडूतील संकेती लोकांकडून बोलली जाते.७.हरयाणवी - हरयाणामधील एक बोलीभाषा.

अल्पसंख्याक लोकांच्या भाषा

खालील भाषांच्या भाषिकांची संख्या ही दहा लाखांपेक्षा कमी आहे.१.महल — लक्षद्वीप प्रदेशातील मिनिकॉय बेटावर ही भाषा बोलली जाते.

हे सुद्धा पहा

दुवे

संदर्भ


चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता <ref>खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="lower-alpha"/> खूण मिळाली नाही.

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत