बेजान दारूवाला

भारतीय ज्योतिषी

बेजान दारूवाला (११ जुलै, १९३१:अहमदाबाद, गुजरात - २९ मे, २०२०:मुंबई, महाराष्ट्र) हे भारतीय ज्योतिषी होते. यांचा जन्म पारशी परिवारात झाला होता. त्यांचे वडील एका मिलमध्ये काम करत होते. बेजान दारूवाला यांचं प्राथमिक शिक्षण हे अहमदाबादमध्ये पूर्ण झाले आणि त्यानंतर त्यांनी इंग्लिशचे प्राध्यापक म्हणून काम केले. देशातील अनेक टीव्ही चॅनल्स आणि वृत्तपत्रात त्यांनी सांगितलेले भविष्य प्रसारित होत होते.[१]

बेजान दारूवाला (Bejan Daruwala)
जन्म११ जुलै १९३१ (1931-07-11)
अहमदाबाद, गुजरात, भारत.
मृत्यू२९ मे, २०२० (वय ८८)
मुंबई, महाराष्ट्र, भारत
पेशाज्योतिषी
धर्मपारशी

प्रसिद्ध भविष्यवेत्ता

दारुवाला हे स्वयंभू गणेश भक्त होते. त्यांनी भारताच्या पंतप्रधान पदावरून भविष्यवाणी केली होती. अटलबिहारी वाजपेयी, मोरारजी देसाई आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्याचे भाकित त्यांनी केले होते.[२] याशिवाय त्यांनी राजीव गांधी यांची हत्या, संजय गांधी यांचा अपघात, भोपाळ गॅस दुर्घटनेवरही भविष्यवाणी केली होती.[ संदर्भ हवा ] दारूवाला यांनी २५ एप्रिल २००३ रोजी ज्योतिष वेबसाइटचा शुभारंभ मुंबईतील ताज हॉटेलमध्ये केला होता. त्यानंतर त्यांनी आपल्या जोतिषी सेवेची सुरुवात त्यांनी आपल्या वेबसाईटवरून केली. त्यांच्या वेबसाइटचं नाव बेजानदारूवाला.कॉम असं आहे.

मृत्यू

२९ मे २०२० रोजी वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, दारुवाला यांचा मुलगा नास्तुर दारुवाला यांनी बेजान दारुवाला यांचा मृत्यू न्यूमोनिया आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे झाला असे सांगितले. दारुवाला यांच्यावर अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.[१][permanent dead link][२]

संदर्भ

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत