बार्जबोर्ड

बार्जबोर्डचा वापर छताच्या गेबल्सला ताकद, संरक्षण देण्यासाठी केला जातो. तसेच सहसा उघड्या राहणाऱ्या गोष्टी लपविण्यासाठी केला जातो. या शब्दाचा उगम मध्ययुगीन लॅटिन बार्गस शब्दापासून झाला असावा याचा अर्थ मचान असा होतो. इमारतीच्या छताचे आडवे लाकूड किंवा छप्पर जे सहसा उघडेच राहते ते यामुळे झाकले जाते आणि सुरक्षित राहते. बार्जबोर्ड कधीकधी केवळ कोरलेले असतात. ब्रिटनमधील याचे एक उदाहरण म्हणजे बर्कशायरमधील ओकवेल्स येथे (१४४६ – १४६५ बांधले गेले) केलेले बांधकाम.[१] बार्जबोर्डवर जपानमध्ये हियन काळातील बांधलेल्या कारामॉनचा प्रभाव दिसून येतो.

बार्जबोर्ड, १९०८ मधील चित्र

न्यू ऑर्लीयन्समध्ये, बार्जबोर्ड हे एक लाकूड आहे ज्यामधून १८०० च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात बरीच क्रेओल कॉटेज तयार केली गेली होती. न्यू ऑर्लीयन्सला जाणाऱ्या नदिच्या काठावर बार्जेस् बांधण्यात आले होते. काम झाल्यावर हे तोडून त्यापासून घरे बांधली गेली. यातील फळ्या साधारणत: २ इंच (५.१ सेंमी) जाड आणि वेगवेगळ्या लांबी आणि रुंदीच्या होत्या. बहुतेकदा १० इंच (२५ सेंमी) रुंदी सामान्य असते. हे लाकुड ओलसर, दमट हवामानात १५० ते २०० वर्ष टिकून राहणारे कठोर आणि घन लाकूड आहे. 

चित्र:Lte Victorian Bargeboards.jpg|उत्तर आयर्लंडच्या काउंटी डाउन, बॅंगोरमधील 38 प्रिन्सटाउन रोडवरील या व्हिक्टोरियन घराला असणारे बार्जबोर्ड्स.[२]चित्र:Saitta House Dyker Heights.JPG|१८९९ मधील बांधलेले सइट्टा हाऊस, डायकर हाइट्स, ब्रुकलिन, न्यू यॉर्क.[३]</gallery>

हे सुद्धा पहा

संदर्भ

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत