बरहा

(बरह या पानावरून पुनर्निर्देशित)


बरहा हा मूळ कन्नड शब्द असून त्याचा अर्थ 'लिखाण' असा होतो. बरहा ही भारतीय भाषांत सहज लेख लिहिण्याकरता बनवलेली सोपी संगणक प्रणाली आहे. ही संगणक प्रणाली भारतीय भाषेतील शब्दांवर विविध प्रकारच्या प्रक्रिया सुलभतेने करते. त्यामुळे संगणकावरील विविध कामे जसे की विविध दस्तऐवज (Word Application), इंटरनेट आणि संकेतस्थळांवर लिहीणे, इ-मेल लिहिणे, संगणकावरील कार्यालयीन कामे आपण आपल्या स्वतःच्या मातृभाषेत करू शकतो.

बरहा
ಬರಹ
मूळ लेखकशेषाद्रिवासु चंद्रशेखरन
सद्य आवृत्ती१०.१०.१५२
विकासाची स्थितीसद्य
संगणक प्रणालीविंडोज एक्सपी व त्यापुढील
संचिकेचे आकारमान६.१४ एमबी
भाषाइंग्लिश
सॉफ्टवेअरचा प्रकारदस्तऐवज संपादक
सॉफ्टवेअर परवानामोफत (काही सुविधांविना)
विकत (१५००)
संकेतस्थळबरहा.कॉम

भाषा

यात देवनागरी लिपीतील मराठी, आसामी, हिंदी भाषा, संस्कृत, कोकणी, काश्मिरी, सिंधी, गुजराती, ओडिया, बंगाली, आसामी, मणिपुरी तसेच गुरुमुखी लिपीतील पंजाबी, तामिळ, मल्याळम, तेलुगू, कन्नड इत्यादी भाषांतून लेखन करता येते.

सुविधा

बरहा विविध सुविधांचा व संगणक प्रणालींचा संच उपलब्ध करून देते.

  1. बराहा एक स्वतंत्र दस्तऐवज संपादक (document editor) आहे. यात दस्तावेज संपादित करण्याच्या मूलभूत आवश्यक सुविधांचा समावेश आहे.
  2. बराहा डायरेक्ट (Baraha Direct)ने दुसऱ्या प्रणालीत मजकूर (Text) थेट (direct) टंकलिखित (type) करता येतो. जसे की विकीपीडिया, मायक्रोसॉफ्टचे वर्ड, एक्सेल, पॉवरपॉइंट इ., इमेल्स, मेसेंजर वगैरे.

बराहामध्ये मराठी कसे लिहावे

मुख्य पान: बराहा मध्ये मराठी कसे टाइप करावे

इतर सुविधा

बरहा मध्ये एक बरहापॅड नामक प्रोग्रॅम असून त्यामध्ये आपण मराठी व इतर उपलब्ध भाषांत लेखन करू शकतो.

बाह्य दुवे आणि संदर्भ

मुद्रणाधिकार संबंधीची माहिती

मुद्रणाधिकार संबंधीची माहिती

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत