फ्रँकलिन डिलानो रूझवेल्ट

(फ्रॅंकलिन डिलानो रूझवेल्ट या पानावरून पुनर्निर्देशित)

फ्रँकलिन डिलानो रूझवेल्ट (इंग्लिश: Franklin Delano Roosevelt) ) (-जानेवारी ३०, इ.स. १८८२; हाईड पार्क, न्यू यॉर्क, अमेरिका मृत्यू:- एप्रिल १२, इ.स. १९४५ वार्म स्प्रिंग्स जॉर्जिया), हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. हे एकमेव राष्ट्राध्यक्ष आहेत ज्याची या पदी ४ वेळा निवड झाली. १९३२ ते १९४५ या काळात सलग तेरा वर्षे अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष म्हणून पद सांभाळले.

फ्रँकलिन डिलानो रूझवेल्ट

सहीफ्रँकलिन डिलानो रूझवेल्टयांची सही

परिचय

इ.स. १९३२ साली पहिल्यांदा डेमोक्रॅटिक पक्षातर्फे ते अमेरिकेचे ३२ वे अध्यक्ष म्हणून निवडून आले. वयाच्या चाळिसाव्या वर्षी पोलिओग्रस्त झाल्यावरही ते राजकारणात सतत व्यस्त राहिले.फ्रँकलिन रुझवेल्ट यांचा जन्म १८८२ मध्ये अमेरिकेतील न्यूयोर्क राज्यात झाला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थियोडोर रुझवेल्ट हे फ्रँकलिन यांचे दूरचे नातेवाईक होते. त्यांनी हार्वडमधून कायद्याचे शिक्षण घेतले. १९०५ मध्ये इलानोर हिच्याशी विवाहानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. १९१३ मध्ये त्यांना नौदलाचे सचिवपद मिळाले. १९३२ मध्ये त्यांनी डेमोक्रॅटिक पक्षाकडून राष्ट्राध्यक्ष पदाची उमेदवारी मिळवली व त्यानंतर सलग चारवेळा जिंकून इतिहास रचला. चौथ्या वेळेस अध्यक्षपदी निवडून आल्यावर तो कालावधी पूर्ण व्हायच्या आतच त्यांचा मृत्यू झाला.

कामगिरी

१९२९ च्या महामंदी नंतर त्यांनी अमेरिकेचे नेतृत्व केले तसेच अत्यंत खडतर अश्या दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ते राष्ट्राध्यक्ष होते. याकाळातील त्यांच्या कणखर नेतृत्वाने अमे‍रिकेच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा आकार आला. तसेच दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने प्रभावी कामगीरी बजावली. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात रुझवेल्ट नसले तरी अमेरिका एक प्रभावी सत्ता होण्यास रुझवेल्ट यांचे मोलाचे कार्य होते.

बाह्य दुवे

  • "व्हाइट हाउस संकेतस्थळावरील अधिकृत परिचय" (इंग्लिश भाषेत). 2012-10-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-09-25 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  • वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती फेब्रुवारी ५, २००९ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)
  • "फ्रँकलिन डिलानो रूझवेल्ट: अ रिसोर्स गाइड (फ्रँकलिन डिलानो रूझवेल्ट: संसाधनांची मार्गदर्शिका)" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत