प्रभाकर कारेकर

प्रभाकर जनार्दन कारेकर (जन्म : जुबे-मोशल-अंत्रुज महाल-उत्तर गोवा, ४ जुलै १९४४) हे एक भारतीय शास्त्रीय गायक आहेत. वयाच्या १२व्या वर्षी ते गोव्याहून मुंबईत गाणे शिकायला आले. ते जितेंंद्र अभिषेकी यांचे शिष्य. कारेकरांनी मराठी संगीत नाटकांतील अनेक पदे गायली आहेत. त्यांनी गायलेले 'प्रिये पहा हे गीत विशेष प्रसिद्ध झाले. त्यांना मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार मिळाला आहे.

गोव्यात शांतादुर्गेच्या परिसरात होणाऱ्या सम्राट संगीत महोत्सवाचे कारेकर मुख्य आधार असतात. गोव्यात शास्त्रीय संगीताची अभिरुची वाढावी यासाठी ते प्रयत्नशील असतात.

१९९८ साली उत्तर गोव्यात म्हापसा येथे अंजनीबाई मालपेकर यांच्या नावाचा आविष्कार संगीत महोत्सव सुरू झाला. तेथेही सुरुवातीच्या काळात प्रभाकर कारेकर यांचेच नियोजन असे. .

प्रभाकर कारेकर यांनी गायलेली नाट्यगीते

चरित्र

प्रभाकर कारेकर यांचे 'स्वर प्रभाकर : पं. प्रभाकर कारेकर यांचा सुरेल जीवनप्रवास' नावाचे चरित्र शास्त्रीय संगीत गायिका मंगला खाडिलकर यांनी लिहिले आहे. कौशिक प्रकाशनाने ते प्रसिद्ध केले आहे.

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत