परमवीर चक्र पुरस्कार

परमवीर चक्र हा भारताचा सर्वोच्य सैन्य पुरस्कार असून युद्धकाळात गाजवलेल्या अतुलनीय कामगिरी बाबत हा पुरस्कार देण्यात येतो. आतापर्यंत २१ परमवीर चक्र पुरस्कार प्रदान करण्यात आले असून त्यातले १४ पुरस्कार हे मरणोत्तर आहेत. एकवीसपैकी वीस पुरस्कार भारतीय सैन्य तर एक वायुसेनेच्या सदस्यांस प्रदान केले गेले आहेत.

परमवीर चक्र


पुरस्कार माहिती
प्रकारयुद्ध कालीन वीरता पुरस्कार
वर्गराष्ट्रीय बहादुरी
स्थापित१९५०
प्रथम पुरस्कार वर्ष१९४७
अंतिम पुरस्कार वर्ष१९९९
एकूण सन्मानित२१
सन्मानकर्तेभारत सरकार
रिबन
प्रथम पुरस्कारविजेतेमेजर सोमनाथ शर्मा
(मरणोत्तर)
अंतिम पुरस्कारविजेतेकॅप्टन विक्रम बत्रा
(मरणोत्तर)
पुरस्कार क्रम
नाही ← परमवीर चक्रमहावीर चक्र

ग्रेनेडियर्स रेजिमेंट आणि गोरखा रायफल्स या पथकांना प्रत्येकी ३, शीख रेजिमेंट, कुमाऊॅं रेजिमेंट, जम्मू काश्मीर रायफल्स आणि द पूना हॉर्सेस या पथकांना प्रत्येकी २ पुरस्कार दिले गेले. हा पुरस्कार मिळवणाऱ्यांपैकी लेफ्टनंट अर्देशर तारापोर हे सगळ्यात वरच्या पदाचे अधिकारी होते.

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीने १९८३-८५ दरम्यान पंधरा तेलवाहू जहाजे विकत घेतली. यांना त्यावेळच्या १५ परमवीरचक्र विजेत्यांची नावे दिली गेली.

विजेते

नावसैन्यपथकतारीखयुद्धभूमीयद्ध
मेजर सोमनाथ शर्माचौथी बटालियन, कुमाऊॅं रेजिमेंटनोव्हेंबर ३, १९४७बडगाम, काश्मीर१९४८ चे भारत-पाक युद्ध
लान्स नायक करम सिंह१ बटालियन, शीख रेजिमेंटऑक्टोबर १३, १९४८टिथवाल, काश्मीर१९४८ चे भारत-पाक युद्ध
नायक यदुनाथ सिंग१ बटालियन, राजपूत रेजिमेंटफेब्रुवारी, १९४८नौशेरा, काश्मीर१९४८ चे भारत-पाक युद्ध
सेकंड लेफ्टनंट राम राघोबा राणेइंडियन कोर ऑफ इंजिनियर्सएप्रिल ८, १९४८नौशेरा, काश्मीर१९४८ चे भारत-पाक युद्ध
कंपनी हवालदार मेजर पीरू सिंग शेखावत६ बटालियन, राजपूताना रायफल्स१७-जुलै १८, १९४८टिथवाल, काश्मीर१९४८ चे भारत-पाक युद्ध
कॅप्टन गुरबचन सिंग सलारिया३ बटालियन, १ गुरखा रायफल्सडिसेंबर ५, १९६१एलिझाबेथ व्हिलेज, काटंगा, कॉंगो, आफ्रिकाकॉंगो संकट
मेजर धनसिंग थापा१ बटालियन, १ गुरखा रायफल्सऑक्टोबर २०, १९६२लद्दाख, भारत१९६२ चे भारत-चीन युद्ध
सुबेदार जोगिंदर सिंग१ बटालियन, शीख रेजिमेंटऑक्टोबर २३, १९६२तोंगपेन ला, नॉर्थईस्ट फ्रंटियर एजन्सी, भारत१९६२ चे भारत-चीन युद्ध
मेजर शैतान सिंग१३ बटालियन, कुमाऊॅं रेजिमेंटनोव्हेंबर १८, १९६२रेजांग ला, नॉर्थईस्ट फ्रंटियर एजन्सी, भारत१९६२ चे भारत-चीन युद्ध
कंपनी क्वार्टर मास्टर अब्दुल हमीद४ बटालियन, बॉम्बे ग्रेनेडियर्ससप्टेंबर १०, १९६५चीमा, खेमकरण, भारत१९६५ चे भारत-पाक युद्ध
लेफ्टनंट कर्नल अर्देशर तारापोरद पूना हॉर्सेसऑक्टोबर १५, १९६५फिलौरा, सियालकोट, पंजाब, भारत१९६५ चे भारत-पाक युद्ध
लान्स नायक आल्बर्ट एक्का१४ बटालियन, बिहार रेजिमेंटडिसेंबर ३, १९७१गंगासागर, बोग्रा, बांगलादेश१९७१ चे भारत-पाक युद्ध
फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंह शेखों१८ स्क्वॉड्रन, भारतीय वायुसेनाडिसेंबर १४, १९७१श्रीनगर, काश्मीर, भारत१९७१ चे भारत-पाक युद्ध
लेफ्टनंट अरुण खेतरपालद पूना हॉर्सेसडिसेंबर १६, १९७१जरपाल, बारापिंड, पाकिस्तान१९७१ चे भारत-पाक युद्ध
मेजर होशियार सिंह३ बटालियन बॉम्बे ग्रेनेडियर्सडिसेंबर १७, १९७१बसंतार, पाकिस्तान१९७१ चे भारत-पाक युद्ध
नायब सूबेदार बन्ना सिंग८ बटालियन, जम्मू काश्मीर लाइट इन्फंट्रीजून २३, १९८७सियाचिन हिमनदी, भारत१९८७चा सियाचीन संघर्ष
मेजर रामस्वामी परमेश्वरन८ बटालियन, महार रेजिमेंटनोव्हेंबर २५, १९८७जाफना प्रांत, श्रीलंकाभारतीय शांतिसेनेच्या कारवाया (ऑपरेशन पवन)
लेफ्टनंट मनोज कुमार पांडे१ बटालियन, ११ गुरखा रायफल्सजुलै ३, १९९९जुबेर टाप, बटालिक सेक्टर, काश्मीर, भारतकारगिल युद्ध
ग्रेनेडियर योगेन्द्र सिंह यादव१८ बटालियन, द ग्रेनेडियर्सजुलै ४, १९९९टायगर हिल, कारगिल, काश्मीर, भारतकारगिल युद्ध
रायफलमन संजय कुमार१३ बटालियन, जम्मू काश्मीर रायफल्सजुलै ५, १९९९फ्लॅट टॉप, कारगिल, काश्मीर, भारतकारगिल युद्ध
कॅप्टन विक्रम बात्रा१३ बटालियन, जम्मू काश्मीर रायफल्सजुलै ६, १९९९पॉइंट ५१४०, पॉइंट ४८७५, कारगिल, काश्मीर, भारतकारगिल युद्ध

पुढील वाचन

  • परमवीर गाथा भाग १ ते ८. (मूळ लेखक - रचना बिश्त-रावत आणि मेजर जनरल शुभी सूद; मराठी अनुवाद - भगवान दातार)
  • शौर्यगाथा (मूळ लेखक - रचना बिश्त-रावत आणि मेजर जनरल शुभी सूद; मराठी अनुवाद - भगवान दातार)

संदर्भ

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत