पठार

पठार म्हणजे पर्वतावर असलेला साधारणतः सपाट प्रदेश आहे.त्याचे निर्माण ज्वालामुखी, लाव्हारस, पाण्याद्वारे किंवा हिमनगाद्वारे होणारी झीज अश्यासारख्या भौगोलिक घडामोडींमुळे होते.तिबेटचे पठार हे त्याचे उदाहरण आहे.[ चित्र हवे ]

जगातील प्रसिद्ध पठार

दख्खनचे पठार हे मध्य भारतातील एक मोठे पठार आहे. या पठाराचा बराचसा भाग महाराष्ट्र राज्यात आहे . नर्मदेच्या दक्षिणेला हा त्रिकोणी प्रदेश आहे.मेघालय पठार आणि त्याच्याशी ्संबंधित ईशान्येकडील डोंगराचा समूह हा दख्खनचा पठाराचा एक भाग आहे.दख्खनच्या पठाराच्या मुख्य भागापासून तो गंग्येच्या मुखाकडील मैदानामुळ्ये आणि सुंदरबनच्या प्रदेशामुळे अलग झाला आहे.सातपुडा पर्वतरांगांच्या दक्षिणेला असलेल्या दख्खनच्या पठारात अनेक पठारे सामावलेली आहे.पश्चिम घाट आणि पूर्व घाट या दख्खनच्या पठाराच्या सीमा आहेत.

महाराष्ट्राचे पठार मुख्यत: अग्निजन्य(बेसाल्ट) खडकापासून बनले आहे. बेसाल्ट खडकांचे थर जवळ जवळ क्षितिजसमांतर आहेत आणि त्यामुळे संपूर्ण भूस्वरूपाची रचना पा-य्रांसारखी झाली आहे.या बेसाल्ट खडकांच्या रचनेला 'डेक्कन ट्रयाप ' म्हटले जाते . कर्नाटक-तेलंगाना पठार मुख्यत: कानाश्म आणि पत्तीताश्म खडकांनी बनलेले आहे. कर्नाटकचे पठार 'मैदान' या नावाने ओळखले जाते .महाराष्ट्रातील पठाराना सडे म्हणतात

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत