पंचायतन पूजा

हिंदू धर्मातील एक पूजा संकल्पना

पंचायतन पूजा म्हणजे पाच देवांचा, पाच गुरूंचा, पाच थोर व्यक्तींचा किंवा पाच वस्तूंचा समुदाय आणि त्यांची पूजा होय.[१]विभिन्न उपास्य देवांना मानीत असलेल्या उपासकांमध्ये असलेले द्वेष कमी करण्यासाठी आद्य शंकराचार्य यांनी समाजात जाणीवपूर्वक पंचायतन पूजेची सुरुवात केली.[२] ह्या पद्धतीनुसार विष्णूपंचायतनात हरी (विष्णू), शिव, गणपती, तेज (भास्कर) आणि देवी (अंबा) ह्या पाच देवांचे पूजन होते. ह्या पाच देवतांतून उपासक ज्याला प्रधान मानीत असेल त्याला मुख्य स्थान देऊन आजूबाजूला दुसरे चार देव ठेवून पूजा करायची. याच्या परिणामी 'गणेश पंचायतन', 'शिव पंचायतन' वगैरे सुरू झाले. पंचायतन पूजापद्धतीने माणसांच्या श्रद्धा जपल्या गेल्या आणि समाजात असलेला विभिन्न संप्रदायांमधील राग द्वेषही कमी झाला.[३]

राजा रवी वर्मा यांनी काढलेले पंचायतनाचे चित्र

गणपती, शिव, हरी (विष्णू), तेज (भास्कर) आणि अंबा ह्यांचे पूजन म्हणजे बुद्धी, ज्ञान, लक्ष्मी, तेज आणि शक्ती ह्यांची उपासना. मानवी विकासात ह्या पाच तत्त्वांचीच आवश्यकता असते.



  • सूर्य पंचायतानात देवांचा क्रम सूर्य, शंकर, गणेश, विष्णू देवी असा आहे.[६]


  • देवी पंचायतन म्हणजे देवी, विष्णू, शंकर, गणेश, सूर्य [७]


  • गणेश पंचायत म्हणजे गणेश, विष्णू, शंकर, सूर्य, देवी[७]


समर्थ पंचायतनात समर्थ रामदासस्वामी, जयरामस्वामी वडगावकर, रंगनाथस्वामी निगडीकर, आनंदमूर्ती, आणि केशवस्वामी यांचा समावेश होतो.[८] याबद्दलचा एक श्लोक असा आहे :-

श्रीरामदास जयराम रंगनाथ।
आनंदमूर्ति केशव सनाथ।।
ऐसे हे पंचायतन समर्थ।
रामदासस्वामींचे॥१॥

हे दिसताती वेगळाले।
परी ते स्वरूपी मिळाले॥।
अवघे मिळोनि येकच जाले।
निर्विकारवस्तु॥२॥

हेदेखील पहा

वैदिक प्रतीक-दर्शन

हे सुद्धा पहा

सार्वजनिक गणेशोत्सव

प्रसिद्ध गणपती मंदिरे

संदर्भ


🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत