न्यू झीलंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१६-१७

न्यूझीलंड क्रिकेट संघाने सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०१६ मध्ये तीन कसोटी सामने आणि पाच एकदिवसीय सामन

न्यू झीलंड क्रिकेट संघ सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०१६ दरम्यान ३-कसोटी आणि ५-एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारताचा दौरा केला.[१][२][३] कसोटी मालिका भारताने ३-० अशी जिंकली तर शेवटच्या एकदिवसीय सामन्यात न्यू झीलंडचा दणदणीत पराभव करून एकदिवसीय मालिका ३-२ अशी खिशात टाकली.

न्यू झीलंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१६-१७
भारत
न्यू झीलंड
तारीख२२ सप्टेंबर – २९ ऑक्टोबर २०१६
संघनायकविराट कोहली (कसोटी)
महेंद्रसिंग धोणी (ए.दि.)
केन विल्यमसन
रॉस टेलर (२री कसोटी)
कसोटी मालिका
निकालभारत संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावाचेतेश्वर पुजारा (३७३)ल्युक रॉंची (२००)
सर्वाधिक बळीरविचंद्रन अश्विन (२७)ट्रेंट बोल्ट (१०)
मिचेल सॅंटनर (१०)
मालिकावीररविचंद्रन अश्विन (भा)
एकदिवसीय मालिका
निकालभारत संघाने ५-सामन्यांची मालिका ३–२ जिंकली
सर्वाधिक धावाविराट कोहली (३५८)टॉम लॅथम (२४४)
सर्वाधिक बळीअमित मिश्रा (१५)टीम साउथी (७)
मालिकावीरअमित मिश्रा (भा)

एप्रिल २०१६, रोजी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने जाहीर केले होते की कसोटी मालिकेतील एक कसोटी सामना दिवस-रात्र खेळवला जाईल.[४] त्यावर प्रतिक्रिया देताना न्यू झीलंड क्रिकेटने नमूद केले की "त्याआधी इतर बऱ्याच गोष्टींना अंतिम स्वरूप देणे बाकी आहे".[५] जून २०१६, मध्ये भारताने २०१६/१७ च्या मोसमासाठी वेळापत्रक जाहीर केले, परंतु त्यात कोठेही दिवस/रात्र कसोटीबद्दल नमूद केले नव्हते.[६] परंतु बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या एका मोठ्या अधिकाऱ्याने सांगितले की कोलकातामधील सामना दिवस/रात्र होणार आहे.[७][८] परंतु यानंतर जूनच्या शेवटी सामन्यांच्या तारखांची घोषणा झाली, आणि बीसीसीआयने नमूद केले की सर्व कसोटी सामने स्थानिक वेळेनुसार ९:३० वाजता सुरू होतील.[९] सप्टेंबर २०१६ मध्ये, बीसीसीआयने २०१६-१७ मोसमातील कोणतीही कसोटी दिवस/रात्र खेळवली जाणार नाही ह्या वृत्ताला पुष्टी दिली.[१०][११]

सप्टेंबर २०१६ मध्ये बीसीसीआयने १९ ऑक्टोबर रोजी निर्धारित असलेला दुसरा एकदिवसीय सामना करवा चौथमुळे २० ऑक्टोबर रोजी खेळवण्याचा निर्णय घेतला.[१२][१३] कानपूर येथे होणारा पहिला कसोटी सामना हा भारताचा ५०० कसोटी सामना असेल.[१४] धरमशाला येथे खेळवला गेलेला पहिला एकदिवसीय सामना हा भारताचा ९०० वा एकदिवसीय सामना होता.[१५]

दुसरी कसोटी संपल्या नंतर, लोढा समितीने बीसीसीआयची बँक खाती गोठविली आहेत अशा बातम्या आल्या.[१६] त्यानंतर बीसीसीआयने दौऱ्यावरील उर्वरीत सामने रद्द होण्याची भिती व्यक्त केली.[१७] न्यू झीलंड क्रिकेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड व्हाईट म्हणाले, संघ दौरा चालूच ठेवेल आणि सध्या इंदूरला जायची तयारी करत आहे.[१८] लोढा समितीने त्यांचे म्हणणे स्पष्ट करताना सांगितले की बीसीसीआयची कोणतीही खाती गोठवण्यात आलेली नाहीत, परंतु मंडळाशी संलग्न राज्य संघटनांना पैसे देण्यास मनाई करण्यात आलेली आहे.[१९][२०]

कसोटी मालिकेतील दुसरी कसोटी जिंकून भारतीय संघाने पाकिस्तानला मागे टाकून आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. तिसऱ्या कसोटीसह मालिका ३-० अशी जिंकल्यानंतर भारतीय संघाला आयसीसी कसोटी अजिंक्यपदाची गदा बहाल करण्यात आली. असा मान मिळवणारा विराट कोहली हा दुसरा भारतीय कर्णदार ठरला.[२१]

संघ

कसोटीएकदिवसीय
 भारत[२२][२३]  न्यूझीलंड[२४]  भारत[२५][२६]  न्यूझीलंड[२७]

सराव सामना

१६-१८ सप्टेंबर
धावफलक
वि
३२४/७घो (७५ षटके)
टॉम लॅथम ५५ (९७)
बलविंदरसिंग संधू २/२१ (११ षटके)
४६४/८घो (११४ षटके)
सुर्यकुमार यादव १०३ (८६)
इश सोधी २/१३२ (२० षटके)
२३५ (६६.४ षटके)
ल्युक रॉंची १०७ (११२)
परिक्षित वालसांगकर ३/४१ (१२.४ षटके)
  • नाणेफेक: मुंबई, गोलंदाजी
  • प्रत्येकी १५ खेळाडू (११ फलंदाज, ११ क्षेत्ररक्षक)


कसोटी सामने

१ली कसोटी

२२-२६ सप्टेंबर
धावफलक
वि
३१८ (९७ षटके)
मुरली विजय ६५ (१७०)
ट्रेंट बोल्ट ३/६७ (२० षटके)
२६२ (९५.५ षटके)
केन विल्यमसन ७५ (१३७)
रविंद्र जडेजा ५/७३ (३४ षटके)
३७७/५घो (४७ षटके)
चेतेश्वर पुजारा ७८ (१५२)
मिचेल सॅंटनर २/७९ (३२.२ षटके)
२३६ (८७.३ षटके)
ल्युक रॉंची ८० (१२०)
रविचंद्रन अश्विन ६/१३२ (३५.३ षटके)
भारत १९७ धावांनी विजयी
ग्रीन पार्क मैदान, कानपूर
पंच: रिचर्ड केटेलबोरो (इं) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: रविंद्र जडेजा (भा)
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी
  • २ऱ्या दिवशी चहापानापुर्वी आलेल्या पावसामुळे थांबवण्यात आला आणि शेवटच्या सत्राचा खेळ होऊ शकला नाही.[३४]
  • भारताचा ५०० वा कसोटी सामना.[१४]
  • कसोटी क्रिकेट मध्ये सर्वात जलद २०० बळी पूर्ण करणारा (३८ कसोटी) रविचंद्रन अश्विन (भा) हा दुसरा गोलंदाज.[३५][३६]


२री कसोटी

३० सप्टेंबर–४ ऑक्टोबर
धावफलक
वि
३१६ (१०४.५ षटके)
चेतेश्वर पुजारा ८७ (२१९)
मॅट हेन्री ३/४६ (२० षटके)
२०४ (५३ षटके)
जीतन पटेल ४७ (४७)
भुवनेश्वर कुमार ५/४८ (१५ षटके)
२६३ (७६.५ षटके)
रोहित शर्मा ८२ (१३२)
ट्रेंट बोल्ट ३/३८ (१७.५ षटके)
१९७ (८१.१ षटके)
टॉम लॅथम ७४ (१४८)
रविंद्र जडेजा ३/४१ (२० षटके)
भारत १७८ धावांनी विजयी
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: रिचर्ड केटेलबोरो (इं) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: वृद्धिमान साहा (भा)
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी
  • २ऱ्या दिवशी दुपारच्या सत्रात पावसामुळे २ तासाचा खेळ वाया गेला.
  • भारतीय संघाचा मायदेशी २५०वा कसोटी सामना.[३७][३८]
  • केन विल्यमसनला ताप आल्यामुळे त्याच्याऐवजी रॉस टेलरने कर्णधाराची भूमिका पार पाडली.[३९]
  • ह्या सामन्यातील विजयामुळे भारतीय संघ आयसीसी अजिंक्यपद स्पर्धा क्रमवारीत पहिल्या स्थानी पोहोचला.[४०]


३री कसोटी

८-१२ ऑक्टोबर २०१६
धावफलक
वि
५५७/५घो (१६९ षटके)
विराट कोहली २११ (३६६)
ट्रेंट बोल्ट २/११३ (३२ षटके)
२९९ (९०.२ षटके)
मार्टिन गुप्टिल ७२ (१४४)
रविचंद्रन अश्विन ६/८१ (२७.२ षटके)
२१६/३घो (४९ षटके)
चेतेश्वर पुजारा १०१* (१४८)
जीतन पटेल २/५६ (१४ षटके)
१५३ (४४.५ षटके)
रॉस टेलर ३२ (२५)
रविचंद्रन अश्विन ७/५९ (१३.५ षटके)
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी
  • या मैदानावर खेळवली जाणारी पहिलीच कसोटी.[४१]
  • कसोटी क्रिकेटमध्ये २,००० धावा पूर्ण करणारा अजिंक्य रहाणे हा भारताचा ३६वा फलंदाज.[४२][४३]
  • कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून दोन द्विशतके करणारा विराट कोहली हा पहिलाच भारतीय.[४४][४५]
  • विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेची ३६५ धावांची भागीदारी ही भारतातर्फे चवथ्या गड्यासाठी सर्वोत्कृष्ट भागीदारी होय.[४५][४६]
  • रविचंद्रन अश्विनची (भा) कसोटी डावातील तसेच कसोटी सामन्यातील सर्वोत्कृष्ट कामगिरी.[४७][४८]
  • धावांच्या दृष्टीने, कसोटी इतिहासात भारताचा दुसरा सर्वात मोठा विजय तर न्यू झीलंडचा दुसरा सर्वात मोठा पराभव[४९]


एकदिवसीय मालिका

१ला सामना

१६ ऑक्टोबर
१३:३० (दि/रा)
धावफलक
भारत 
१९० (४३.५ षटके)
वि
 न्यूझीलंड
१९४/४ (३३.१ षटके)
टॉम लॅथम ७९* (९८)
हार्दिक पंड्या ३/३१ (७ षटके)
विराट कोहली ८५* (८१)
इश सोधी १/३४ (४.१ षटके)
  • नाणेफेक : भारत, गोलंदाजी.
  • एकदिवसीय पदार्पण: हार्दिक पंड्या (भा).
  • हा भारताचा ९०० वा एकदिवसीय सामना असून इतर कोणत्याही देशापेक्षा सर्वात जास्त एकदिवसीय सामने भारतीय संघ खेळला आहे.[१५]
  • अमित मिश्रचे (भा) ५० एकदिवसीय बळी पूर्ण.
  • डावामध्ये संघ सर्वबाद होवून शेवटपर्यंत नाबाद राहणारा टॉम लॅथम हा एकूण दहावा तर न्यू झीलंडचा पहिलाच फलंदाज[५०]


२रा सामना

२० ऑक्टोबर
१३ः३० (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड 
२४२/९ (५० षटके)
वि
 भारत
२३६ (४९.३ षटके)
केन विल्यमसन ११८ (१२८)
जसप्रित बुमराह ३/३५ (१० षटके)
केदार जाधव ४१ (३७)
टिम साऊथी ३/५२ (९.३ षटके)
न्यू झीलंड ६ धावांनी विजयी
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
पंच: अनिल चौधरी (भा) आणि ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
सामनावीर: केन विल्यमसन(न्यू)
  • नाणेफेक : भारत, गोलंदाजी
  • हा भारताचा ४००वा एकदिवसीय पराभव असून कोणत्याही संघापेक्षा सर्वात जास्त एकदिवसीय पराभव भारतीय संघाच्या नावावर.[५१]
  • रोहित शर्माचा (भा) १५०वा एकदिवसीय सामना.[५१]
  • यष्टिरक्षक म्हणून ल्युक रॉंचीचे (न्यू) १०० बळी पूर्ण.[५१]
  • आठ किंवा त्याहून जास्त एकदिवसीय शतके काढणारा केन विल्यमसन हा न्यू झीलंडचा पाचवा फलंदाज. तसेच भारताविरुद्ध शतक करणारा तो न्यू झीलंडचा तिसरा कर्णधार आणि भारतामध्ये भारताविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा फलंदाज.[५१]
  • १३ वर्षांनंतर पहिल्यांदाच न्यू झीलंड क्रिकेट संघाचा भारतात एकदिवसीय विजय आणि फिरोजशहा कोटला मैदानावर पहिलाच विजय.[५१]


३रा सामना

२३ ऑक्टोबर
१३ः३० (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड 
२८५ (४९.४ षटके)
वि
 भारत
२८९/३ (४८.२ षटके)
टॉम लॅथम ६१ (७२)
केदार जाधव ३/२९ (५ षटके)
विराट कोहली १५४* (१३४)
मॅट हेन्री २/५६ (९.२ षटके)
भारत ७ गडी व १० चेंडू राखून विजयी
पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली
पंच: ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ) आणि चेट्टीतोडी शमशुद्दीन (भा)
सामनावीर: विराट कोहली (भा)
  • नाणेफेक : भारत, गोलंदाजी
  • जेम्स नीशॅम आणि मॅट हेन्री दरम्यानची ८४ धावांची भागीदारी ही न्यू झीलंडतर्फे ९व्या गड्यासाठीची सर्वोच्च एकदिवसीय भागीदारी.[५२]
  • महेंद्रसिंग धोणीच्या ९,००० एकदिवसीय धावा पूर्ण. तसेच त्याचा भारतातर्फे एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक षट्कार आणि कर्णधारातर्फे सर्वाधिक षट्कार मारण्याचा विक्रम.[५३]
  • विराट कोहलीचे (भा) २६वे एकदिवसीय शतक. ह्या मैदानावरील ही कोणत्याही फलंदाजातर्फे सर्वोच्च धावसंख्या (१५४ धावा).
  • विराट कोहलीचे हे यशस्वी पाठलागामधील १४वे शतक. ही त्याची संयुक्तरित्या पहिल्या क्रमांकाची कामगिरी.[५४]
  • विराट कोहलीच्या मायदेशी सर्वात कमी डावांमध्ये ३,००० एकदिवसीय धावा पूर्ण.(६३ डाव)[५४]
  • एकदिवसीय क्रिकेट मध्ये १५० यष्टिचीत करणारा महेंद्रसिंग धोणी हा पहिलाच यष्टिरक्षक.[५४]


४था सामना

२६ ऑक्टोबर
१३:३० (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड 
२६०/७ (५० षटके)
वि
 भारत
२४१ (४८.४ षटके)
मार्टिन गुप्टिल ७२ (८४)
अमित मिश्रा २/४१ (१० षटके)
अजिंक्य रहाणे ५७ (७०)
टिम साऊथी ३/४० (९ षटके)
न्यू झीलंड १९ धावांनी विजयी
जेएससीए आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल, रांची
पंच: अनिल चौधरी (भा) आणि ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
सामनावीर: मार्टिन गुप्टिल (न्यू)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी


५वा सामना

२९ ऑक्टोबर
१३:३० (दि/रा)
धावफलक
भारत 
२६९/६ (५० षटके)
वि
 न्यूझीलंड
७९ (२३.१ षटके)
रोहित शर्मा ७० (६५)
ट्रेंट बोल्ट २/५२ (१० षटके)
केन विल्यमसन २७ (४०)
अमित मिश्रा ५/१८ (६ षटके)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी
  • एकदिवसीय पदार्पण: जयंत यादव (भा).
  • सी. के. नंदन (भा) यांचा पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
  • ही न्यू झीलंडची भारताविरुद्ध सर्वात लहान धावसंख्या आहे तसेच एकदिवसीय क्रिकेटमधील त्यांचा सर्वात लहान पूर्ण झालेला डाव आहे.[५५]
  • अमित मिश्राची ह्या सामन्यातील कामगिरी ही भारतीय गोलंदाजातर्फे एकदिवसीय क्रिकेटमधील न्यू झीलंडविरुद्ध सर्वोत्कृष्ट कामगिरी.[५६]
  • विराट कोहलीच्या मालिकेमधील ३५८ धावा ह्या कोणत्याही फलंदाजातर्फे भारत-न्यू झीलंड दरम्यानच्या मालिकेतील सर्वात जास्त धावा.[५६]


संदर्भ आणि नोंदी

बाह्य दुवे


१९५५-५६ | १९६४-६५ | १९६९-७० | १९७६-७७ | १९८८-८९ | १९९५-९६ | १९९९-२००० | २००३-०४ | २०१०-११ | २०१२ | २०१६-१७ | २०१७-१८ | २०२१-२२ | २०२२-२३
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत