नैसर्गिक संख्या

गणितानुसार नैसर्गिक संख्या[१] (अन्य नावे: नैसर्गिक अंक; जर्मन: Natürliche Zahl, फ्रेंच: Entier naturel, स्पॅनिश: Número natural, इंग्लिश: Natural number, नॅचरल नंबर) म्हणजे मोजणीसाठी (उदाहरणार्थ, "माझ्याकडे १० रुपये आहेत" असे म्हणताना) किंवा अनुक्रम सांगण्यासाठी (उदाहरणार्थ, "हे शहर लोकसंख्येनुसार जगातील ५वे मोठे शहर आहे" असे म्हणताना) वापरण्यात येणाऱ्या संख्या या पूर्ण संख्या होत. नैसर्गिक संख्यांच्या वापरामागील ही उद्दिष्टे भाषेतील प्रमुख संख्या आणि क्रमसूचक संख्या यांच्यावर आधारित आहेत.

नसर्गिक संख्या मोजणीसाठी वापरल्या जातात (उदाहरणार्थ, वरपासून खालपर्यंत : एक सफरचंद, दोन सफरचंदे, तीन सफरचंदे)

नामकरणासाठीही या संख्या वापरतात. उदाहरणार्थ, हवालदार बक्कल नंबर ८७६, कैदी नंबर ९११.

नैसर्गिक संख्यांचे त्यांच्या विभाज्यतेशी संबंधित गुणधर्म(अवयवांचे गुणधर्म इ.) इत्यादि, संख्या सिद्धांत या शाखेत अभ्यासले जातात. मोजमाप आणि संचाच्या उपसंचांची मोजणी असल्या प्रकारचे, क्रमव्यवस्थेबद्दल उदभवणारे प्रश्न कॉंबिनेटॉरिक्स या शाखेत अभ्यासले जातात.

संकल्पनेचा इतिहास आणि शून्याच्या समावेशाविषयीचे मतभेद

कोणत्या संचातील संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणावे याबद्दल एकवाक्यता नाही. काहीजण धन संख्यांना {१, २, ३, ...} नैसर्गिक संख्या म्हणतात तर काहीजण यात ०चा समावेश करून {०, १, २, ...} या ऋण नसलेल्या संचाला नैसर्गिक संख्या असे म्हणतात. यातील पहिली व्याख्या पारंपरिक आहे, तर दुसरी व्याख्या इ.स.च्या १९ व्या शतकापासून सुरू झालेली आहे. तर काही जण नैसर्गिक संख्यांमध्ये ऋण संख्यांचाही समावेश करतात. अर्थात पहिली व्याख्या म्हणजे (१,२,३..)ही अधिक लोकमान्य आहे.

संदर्भ व नोंदी

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत