नेहा भसीन

نیہا بھاسن (skr); নেহা ভাসিন (bn); Neha Bhasin (fr); नेहा भसीन (bho); Neha Bhasin (de); Neha Bhasin (ast); Neha Bhasin (ca); नेहा भसीन (mr); नेहा भासिन (mai); ନେହା ଭସିନ (or); Neha Bhasin (ga); نه بهاسین (fa); Neha Bhasin (es); Neha Bhasin (en); Neha Bhasin (sl); ネーハー・バシン (ja); ਨੇਹਾ ਭਸੀਨ (pa); నేహా భాసిన్ (te); نيها بهاسين (arz); Neha Bhasin (id); നേഹ ഭാസിൻ (ml); Neha Bhasin (nl); نیہا بھاسن (ur); नेहा भसीन (hi); ನೇಹಾ ಭಾಸಿನ್ (kn); Neha Bhasin (uz); নেহা ভাসীন (as); Neha Bhasin (sq); نیہا بھاسن (pnb); நேகா பாசின் (ta) ہندوستانی گلوکار (skr); ভারতীয় গায়িকা (bn); chanteuse indienne (fr); ଭାରତୀୟ କଣ୍ଠଶିଳ୍ପୀ (or); India laulja (et); abeslari indiarra (eu); Indiaas zangeres (nl); cantante india (ast); cantant índia (ca); Indian singer (en); مغنية هندية (ar); cantora indiana (pt); Indian singer (en-gb); خواننده هندی (fa); cantante india (gl); baaŋa ŋun nyɛ paɣa (dag); cântăreață indiană (ro); بھارتی گلوکار (ur); këngëtare indiane (sq); indiai énekes (hu); مغنيه من الهند (arz); amhránaí Indiach (ga); індійська співачка (uk); ureueng meujangeun asai India (ace); cantante indiana (it); זמרת הודית (he); panyanyi (mad); penyanyi asal India (id); Indian singer (en); Indian singer (en-ca); cantante india (es); தமிழ்த் திரைப்படப் பின்னணிப் பாடகர் (ta) நேகா பசின் (ta)

नेहा भसीन (जन्म १८ नोव्हेंबर १९८२) ही एक भारतीय गायिका आणि गीतकार आहे. हिंदी, तेलुगु, तमिळ सिनेमांमध्ये आणि भारतीय पॉप आणि पंजाबी लोकसंगीताच्या शैलीतील स्वतंत्र गाण्यांसाठी ती ओळखली जाते. भसीनला वेगवेगळ्या भाषांमध्ये सात फिल्मफेअर नामांकने मिळाली आहेत आणि तिच्या '' जग घूमया '' (हिंदी) आणि ''पानी रवी दा'' (पंजाबी) गाण्यांसाठी तिला दोन फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत.

नेहा भसीन 
Indian singer
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखनोव्हेंबर १८, इ.स. १९८२
नवी दिल्ली
कार्य कालावधी (प्रारंभ)
  • इ.स. २००५
नागरिकत्व
व्यवसाय
अधिकृत संकेतस्थळ
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

वैयक्तिक जीवन

भसीनने वयाच्या ९ व्या वर्षी मारिया कॅरीचे गाणे "हिरो" गाऊन पहिल्या गायन स्पर्धेत पुरस्कार जिंकला. तिला लहानपणापासूनच पॉपस्टार बनण्याची इच्छा होती.[१] तिने विविध नृत्य प्रकार शिकण्यासाठी श्यामक दावर यांच्या नृत्य अकादमीमध्ये प्रवेश घेतला. तिने उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांच्याकडून शास्त्रीय गायनाचे प्रशिक्षण घेतले.[२][३]

नेहा भसीनने २३ ऑक्टोबर २०१६ रोजी इटलीतील टस्कनी येथे एका पाश्चात्य विवाह सोहळ्यात संगीतकार समीर उद्दीन सोबत विवाह केला.[४][५]

कारकीर्द

२००२ मध्ये जेव्हा तिने चॅनल व्ही च्या कोक पॉपस्टार्ससाठी ऑडिशन दिले तेव्हा भसीन दिल्लीतील लेडी श्री राम कॉलेजमध्ये शिकत होती. तिने स्पर्धा जिंकली व विजेत्यांनी भारतातील पहिला ऑल-गर्ल्स म्युझिक ग्रुप विवा बनवला. सीमा रामचंदानी, प्रतिची महापात्रा, महुआ कामत आणि अनुष्का मनचंदा या बँडच्या इतर सदस्य होत्या. २००४ मध्ये बँड तुटल्यानंतर, भसीनने बॉलीवूड चित्रपट आणि तमिळ चित्रपट संगीत उद्योगासाठी गाणे गायले.

२००७ मध्ये "कुछ खास है" हे गाणे बॉलीवूडमध्ये तिचे पहिले यश होते, ज्याने नेहाला २००८ मध्ये पहिले फिल्मफेअर नामांकनही मिळाले होते. फॅशन चित्रपटातील हे गीत सलीम-सुलेमान यांनी संगीतबद्ध केले होते. भसीनचे पहिले तामिळ गाणे "पेसुगिरेन पेसुगिरेन" हे युवन शंकर राजायांनी संगीतबद्ध केले होते साठम पोडाथे चित्रपटासाठी व तिला २००८ मध्ये सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिकेचा विजय पुरस्कार मिळाला होता.

२०१७ मध्ये, तिला सुलतान चित्रपटातील "जग घूम्या" या अनुष्का शर्मावर चित्रित केलेल्या हिंदी गाण्यासाठी भसीनला पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. यासाठी तिने सर्वोत्कृष्ट गायिकेसाठी स्टारडस्ट अवॉर्ड आणि झी सिने पुरस्कारही जिंकले. तिला मिर्ची म्युझिक अवॉर्ड्ससाठीही नामांकन मिळाले होते. हे गाणे विशाल-शेखर यांनी संगीतबद्ध केले आहे तर गीते इर्शाद कामील यांनी लिहिली आहेत.[६][७] २०२० मध्ये आलेल्या भारत चित्रपटातील तिच्या "चाशनी" या गाण्याला चांगला प्रतिसाद मिळाला आणि फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले.

२०२१ मध्ये, तिने "उट पटांगी" या गाण्यासाठी स्पॉटिफाय वर टाइम्स स्क्वेअर बिलबोर्डवर महन्यातील कलाकार म्हणून वैशिष्ट्यीकृत केले.[८]

भसीनने २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या लाइफ की तो लग गई या हिंदी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलेज्यात तिने के.के. मेनन आणि रणवीर शोरी यांच्यासोबत काम केले होते.[९] झलक दिखला जा सीझन ५ (२०१२) मध्ये नेहा वाइल्डकार्ड एंट्री होती पण पुढे निवडली गेली नव्हती.[१०]

२०२१ मध्ये बिग बॉस ओटीटी मध्ये एक ती स्पर्धक होती आणि ३९ व्या दिवशी बाहेर काढली गेली. २०२१ मध्ये बिग बॉस १५ मध्ये ती वाइल्डकार्ड स्पर्धक होती. तिने ३५ व्या दिवशी प्रवेश केला आणि ५५ व्या दिवशी तिला बाहेर काढण्यात आले.

पुरस्कार

वर्षपुरस्कारश्रेणीगाणे व चित्रपटनिकाल
२००७विजय टीव्ही पुरस्कार[११]सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक – महिला"पेसुगिरेन पेसुगिरेन" (सथम पोडाथे) - तमिळविजयी
२००८फिल्मफेर सर्वोत्तम महिला पार्श्वगायक पुरस्कार[१२]"कुछ खास हैं" (फॅशन) - हिंदीनामांकन
२००९म्युझिक मिर्ची अवॉर्ड्स साउथ अवॉर्ड्स"अतु नुव्वे" (करन्ट) - तेलुगुनामांकन
२०११स्टारडस्ट पुरस्कार[१३]म्युजीकल सेन्सेशन ऑफ द यीअर"धुनकी" (मेरे ब्रदर की दुल्हन)विजयी
स्क्रीन पुरस्कारसर्वोत्कृष्ट पार्श्वगायक – महिलानामांकन
अप्सरा पुरस्कारनामांकन
झी सिने पुरस्कारनामांकन
पीपल्स चॉइस अवॉर्ड्सनामांकन
फिल्मफेर पुरस्कार दक्षिण"पोरने पोराने" (वागई सूडा वा) - तमिळनामांकन
फिल्मफेर पुरस्कार दक्षिणसर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका (तेलुगु)"हॅलो हॅलो" (धाडा) - तेलुगुनामांकन
संगीत मिर्ची पुरस्कार दक्षिणसर्वोत्कृष्ट पार्श्वगायक – महिलानामांकन
मिर्ची म्युझिक पुरस्कार[१४]वर्षातील महिला गायिका"धुनकी" (मेरे ब्रदर की दुल्हन) - हिंदीनामांकन
२०१४दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कारसर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका (तेलुगु)"ओव तुझो मोघ कोरथा" (१ नेनोक्कडाइन) – तेलुगुविजयी
२०१६स्टारडस्ट पुरस्कार[१५]सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायक"जग घूम्या" (सुलतान) – हिंदीविजयी
मिर्ची म्युझिक पुरस्कार[१६]वर्षातील सर्वोत्कृष्ट महिला गायिकानामांकन
२०१७फिल्मफेर सर्वोत्तम महिला पार्श्वगायक पुरस्कारसर्वोत्कृष्ट पार्श्वगायक – महिलाविजयी
झी सिने अवॉर्ड्सविजयी
फेमिना महिला पुरस्कार[१७]संगीत आणि परफॉर्मिंग आर्ट्समध्ये फेमिना महिला ज्युरी पुरस्कारविजयी
२०१८फिल्मफेर पुरस्कार दक्षिणसर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका - तेलुगु"स्विंग जरा" (जय लावा कुसा) – तेलुगुनामांकन
फिल्मफेर पुरस्कारसर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका – पंजाबी"पानी रवी दा" (लाहोरीये) – पंजाबीविजयी
२०२०फिल्मफेर सर्वोत्तम महिला पार्श्वगायक पुरस्कारBest Playback Singer – Female"चाशनी" (भारत') – हिंदीनामांकन

संदर्भ

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत