निर्मलकुमार फडकुले (जन्म : १६ नोव्हेंबर, १९२८ - २९ जुलै, २००६) हे मराठी संत साहित्यातले विद्वान होते.त्यांचा जन्म सोलापूर येथे एका संस्कृत विद्वानाच्या (न्यायतीर्थ, पंडित जिनदासशास्त्री फडकुले यांच्या) घरी झाला.
त्याच्या "लोकहितवादी: काल आणि कर्तृत्व" ह्या संशोधन प्रबंधास डॉक्टरेट मिळाली होती. त्यांनी नांदेडमध्ये (इ.स.१९५४ ते५५ या काळात) व नंतर संगमेश्वर कॉलेजमध्ये मराठी विभाग प्रमुख म्हणून काम केले.
ललित लेखन आणि संतसाहित्याच्या लेखनाबरोबरच त्यांची "आस्वाद समीक्षा" साहित्य जगतात कौतुकास पात्र ठरली होती.