देशस्थ ब्राह्मण

हिंदू धर्मातील ब्राह्मण जातीतील पोटजाती

देशस्थ ब्राह्मण ही महाराष्ट्रीय सनातन वैदिक हिंदूंच्या ब्राह्मण जातीतील ६ पोटजातींपैकी लोकसंख्येने सर्वात मोठी पोटजात आहे. मराठी ब्राह्मण जातीतील इतर ५ पोटजाती कऱ्हाडे, चित्पावन, देवरुखे , दैवज्ञसारस्वत ह्या आहेत. देशस्थ ब्राह्मणांच्या ऋग्वेदी व यजुर्वेदी ह्या दोन शाखा आहेत. देशस्थ ब्राह्मण समाज हा प्रामुख्याने महाराष्ट्रातकर्नाटकच्या उत्तर भागात आढळतो.

गेल्या दोन सहस्र वर्षात देशस्थ समाजाने अनेक ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची व्यक्तिमत्त्वे निर्माण केली आहेत. यामध्ये भास्कर II [१]सारखे गणितज्ञ, भवभूती सारखे संस्कृत विद्वान,[२][३][४][५] ज्ञानेश्वर, श्रीपादराजा, एकनाथ, पुरंदर दास, समर्थ रामदास आणि विजय दास सारखे भक्ती संत आणि जयतीर्थ आणि व्यासतीर्थ यांसारखे तर्कशास्त्रज्ञ यांचा समावेश आहे.[६]

आदी शंकराचार्यांनी भारताच्या चार टोकांना धर्मपीठे स्थापन केली. या चारही पीठाच्या व्यवस्थेसाठी शंकराचार्यांनी कोल्हापूरकडील चार देशस्थ ब्राह्मणांची मुख्य पुजारी म्हणून नेमणूक केली होती. ही परंपरा आजही चालू आहे. जगद्‍गुरू शंकराचार्यांच्या केरळमधल्या कालडी या गावातील वेदपाठशाळेचे मुख्य कमलाकर नावाचे देशस्थ ब्राह्मण आहेत. काशीला विश्वेश्वराच्या मंदिराच्या आसपास स्थायिक झालेल्या मराठी ब्राह्मणांपैकी जवळजवळ सगळे देशस्थ ब्राह्मण असतात.[ संदर्भ हवा ]

भौगोलिक वितरण

देशस्थ ब्राह्मण हे मूळ भारतीय महाराष्ट्र, कर्नाटक, पश्चिम आंध्र प्रदेश ह्या राज्यात अधिक आहेत। मराठी देशस्थ व कानडी देशस्थ ह्यामध्ये भाषा वगळल्यास काही फरक नाही । तथापि पुरोहित म्हणून त्यांचे प्रशिक्षण, हिंदू कायदे आणि धर्मग्रंथांमधील कौशल्य आणि प्रशासकीय कौशल्ये यांनी ऐतिहासिकदृष्ट्या त्यांना भारताच्या कानाकोपऱ्यात रोजगार मिळवून दिला आहे. शिवकालीन पेशवे पद हे देशस्थ ब्राह्मण भूषवित असत । त्या पूर्वीही महाराष्ट्रातून अनेक देशस्थ ब्राह्मण हे उत्तर भारतातील ब्रज , अवध , कोसल प्रांतात तर शिवकालीन दक्षिण दिग्विजया पासून दक्षिणेत तमिळ नाडू मध्ये स्थायिक झाले। उदाहरणार्थ, १७०० च्या दशकात, जयपूरच्या दरबारात काशी येथून देशस्थ ब्राह्मणांची भरती करण्यात आली होती. दक्षिण भारतात विजयनगर साम्राज्य पडल्यानंतर हा समुदाय बनारसला स्थलांतरित झाला होता.[७]मराठा साम्राज्य भारतभर विस्तारत असताना समाजाची सर्वात मोठी चळवळ झाली. पेशवे, होळकर, सिंधिया, आणि गायकवाड राजघराण्यातील नेत्यांनी सत्तेच्या नवीन जागा स्थापन केल्या तेव्हा पुजारी, कारकून आणि सैन्यातील लोकांची लक्षणीय लोकसंख्या त्यांच्यासोबत घेतली. यातील बहुतेक स्थलांतरित साक्षर वर्गातील होते जसे की विविध ब्राह्मण उपजाती आणि चांद्रसेनीय कायस्थ प्रभू. या गटांनी बडोदा, इंदूर, ग्वाल्हेर, बुंदेलखंड, तंजावूर यांसारख्या अनेक ठिकाणी नवीन मराठा साम्राज्याच्या राज्यांमध्ये प्रशासनाचा कणा बनवला.[८]सध्याच्या महाराष्ट्रात, समाज आता बहुतांशी शहरी आहे.[९]

आडनावे

कुलकर्णी, देशमुख, देशपांडे, जोशी ही देशस्थांमधली प्रमुख आडनावांपैकी आहेत. यांशिवाय काही सहस्र आडनावे देशस्थांत अस्तित्वात आहेत. त्यांच्या या विशाल संख्येमुळे पंचांगांत त्यांच्या आडनावांची जंत्री दिलेली नसते. रुईकर पंचांगात एक छोटी जंत्री दिलेली आहे.[ संदर्भ हवा ] यांची आडनावे काहीवेळा त्यांच्या पूर्वजांच्या गावाच्या नावापासून तयार होतात. उदाहरणार्थ बीडकर आडनाव असलेल्या व्यक्तीचे मूळ गाव हे बीड असते. धारवाडकर आडनाव असलेल्या व्यक्तीचे धारवाड. कविवर्य कुसुमाग्रज हे मूळचे शिरवाड गावचे म्हणून त्यांचे आडनाव शिरवाडकर. त्याव्यतिरिक्त काही आडनावे त्यांच्या उद्योगव्यवसायामुळे ठरत असत. जसे कुलकर्णी हे आडनाव कुळांच्या करसंबंधीत गणिते करणाऱ्या व्यक्तीचे, तर जोशी हे आडनाव ज्योतिषशास्त्र जाणणाऱ्या व्यक्तीचे. कधीकधी आडनाव हे शारीरिक व मानसिक गुणावरून असते. ब्राह्मणांमध्ये पाटील, देशमुख ही देखील नवे आढळतात । उदाहरणार्थ बुद्धिसागर म्हणजे बुद्धीचा सागर किंवा सागरासम अफाट बुद्धी असलेला.[ संदर्भ हवा ]. काही काही आडनावे क्वचितच असतात, जसे गाडे, ससाणे, भणगे, गाडेकर ही आडनावे देखील देशस्थ ब्राम्हणांत येतात ।

देशस्थ ब्राह्मणांच्या संस्था

  • शुक्ल यजुर्वेदी देशस्थ ब्राह्मण सभा , पुणे
  • देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संस्था, कसबा पेठ, पुणे आणि कांदिवली, कुर्ला, गोरेगाव, डोंबिवली, दादर, बोरीवली, मालाड, मुलुंड (सर्व मुंबई).
  • देशस्थ ऋग्वेदी मंगल कार्यालय, तपकीर गल्ली, पुणे
  • देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्था, पुणे
  • देशस्थ संघ, विले-पार्ले (मुंबई)
  • देशस्थ ऋग्वेदी संस्था, नाशिक
  • ब्राह्मण कार्यालय, चित्रशाळेसमोर, सदाशिव पेठ, पुणे

संदर्भ आणि नोंदी

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत