ताकिन


ताकिन हा एक सस्तन चतुष्पाद प्राणी आहे. हा भारतातील अरुणाचल प्रदेश, तसेच भूतान आणि तिबेट मध्ये आढळतो.

ताकिन
Takin

शास्त्रीय वर्गीकरण
वंश:पृष्ठवंशी (Vertebra)
जात:सस्तन (Mammalia)
वर्ग:युग्मखुरी (Artiodactyla)
कुळ:गवयाद्य (Bovidae)
जातकुळी:काप्रिने (Caprinae)
जीव:ताकिन (Budorcas)
जाति (जीवविज्ञान)
  • Budorcas taxicolor bedfordi - सोनेरी ताकिन
  • Budorcas taxicolor taxicolor - मिश्मी ताकिन
  • Budorcas taxicolor tibetana - तिबेटी ताकिन
  • Budorcas taxicolor whitei - भूतान ताकिन

त्याचे डोके मोठे असते. त्याला लांब, कमानीयुक्त शिंगे असतात. शिंगे नर व मादी दोन्ही लिंगांमध्ये असतात. शिंगाची लांबी सुमारे ३० सेमी (१२ इंच) असते. परंतु ते ६४ सेमी (२५ इंच) पर्यंत वाढू शकतात. नर व मादीचे चेहरे रंगाने काळे असतात.ताकिनच्या अंगावर काळसर जाड लोकर असते. ताकिन हे तपकिरी-लालसर, तपकिरी -पिवळ्या, पिवळसर-तपकिरी रंगाचे आढळतात. त्यांना कमी जास्त केस असतात. केसांची लांबी ३ सेमी (१.२ इंच) पर्यंत असू शकते. हिवाळ्यात डोक्याच्या खाली २४ सेमी (९.४ इंच) पर्यंत वाढू शकते. मादी ताकिनचे वजन २५०-३०० किलो तर नर ताकिनचे वजन ३००-३५० किलो असते. ताकिन आपल्या संपूर्ण शरीरावर एक तेलकट आणि उग्र गंधयुक्त पदार्थ ठेवतो.

प्रजाती

ताकिनच्या चार प्रजाती ज्ञात आहेत:

चित्रदालन

गोल्डन ताकिन
भुतानी ताकिन
मिश्मी ताकिन


संदर्भ

संदर्भ

https://www.britannica.com/animal/takin

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत