टोराँटो पीयर्सन आंतरराष्ट्रीय विमानतळ

टोरॉंटो पीयर्सन आंतरराष्ट्रीय विमानतळ (Toronto Pearson International Airport) (आहसंवि: YYZआप्रविको: CYYZ) हा कॅनडा देशामधील सर्वात मोठा व टोरॉंटो शहराचा प्रमुख विमानतळ आहे. हा विमानतळ टोरॉंटो शहराच्या वायव्येस २२ किमी अंतरावर मिसिसागा ह्या भागात स्थित आहे. १९३७ साली बांधण्यात आलेल्या ह्या विमानतळाला कॅनडाचा १४वा पंतप्रधान लेस्टर बी. पियरसन ह्याचे नाव देण्यात आले. कॅनडाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी एर कॅनडाचा प्रमुख वाहतूकतळ येथेच आहे.

टोरॉंटो पीयर्सन आंतरराष्ट्रीय विमानतळ
आहसंवि: YYZआप्रविको: CYYZ
YYZ is located in ऑन्टारियो
YYZ
YYZ
ऑन्टारियोमधील स्थान
माहिती
मालकट्रान्सपोर्ट कॅनडा
कोण्या शहरास सेवाटोरॉंटो
स्थळमिसिसागा, ऑन्टारियो
हबएर कॅनडा
फेडेक्स एक्सप्रेस
समुद्रसपाटीपासून उंची५६९ फू / १७३ मी
गुणक (भौगोलिक)43°40′36″N 79°37′50″W / 43.67667°N 79.63056°W / 43.67667; -79.63056
धावपट्टी
दिशालांबीपृष्ठभाग
मीफू
05/23११,१२०डांबरी/कॉंक्रीट
15L/33R११,०५०डांबरी
06L/24R९,६९७डांबरी
06R/24L९,०००डांबरी
15R/33L९,०८८डांबरी
सांख्यिकी (२०१६)
एकूण प्रवासी४,४३,३५,१९८
विमाने४,५६,५३६
स्रोत:
Environment Canada[१]
Transport Canada[२]
Movements from Statistics Canada[३]
Passengers and Movements from Airports Council International[४]
येथे उतरणारे ब्रिटिश एरवेजचे बोइंग ७८७ विमान

२०१६ साली ४.४३ कोटी प्रवाशांची वाहतूक करणारा पीयर्सन विमानतळ जगातील ३५व्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ होता. आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या संख्येबाबतीत पीयर्सन विमानतळ उत्तर अमेरिकेमध्ये न्यू यॉर्कच्या जॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळाखालोखाल दुसऱ्या क्रमांकाचा विमानतळ आहे. येथून जगातील बहुतेक सर्व प्रमुख शहरांना थेट विमानसेवा पुरवली जाते.

बाह्य दुवे

संदर्भ आणि नोंदी

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत