ज्ञान दिन (महाराष्ट्र)

बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म दिवस
(ज्ञान दिवस (महाराष्ट्र) या पानावरून पुनर्निर्देशित)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस - १४ एप्रिल हा इ.स. २०१७ पासून पुढे ज्ञान दिवस म्हणून महाराष्ट्र राज्यात साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने घेतला आहे.[१][२][३][४][५]

ज्ञानवंत डॉ. आंबेडकर आंबेडकर

गेल्या अनेक दशकांपासून आंबेडकरवादी लोक आंबेडकर जयंतीला ‘ज्ञान दिवस’ म्हणून साजरा करीत होते. महाराष्ट्र सरकारने सुद्धा आंबेडकर जयंतीला ज्ञान दिवस म्हणून घोषित करावे ही मागणी वारंवार ते करत होते. शेवटी त्यांना यश आलं आणि ‘प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस ‘ज्ञान दिवस' म्हणून साजरी होऊ लागली.[६][७]

ज्ञानवंत डॉ. आंबेडकरांचे पैलू

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ‘ज्ञानाचे प्रतिक’ म्हटले जाते, त्याची काही कारणे खालिलप्रमाणे आहेत.

  1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगातील सर्वाधिक शिकलेल्या व्यक्तींपैकी एक आहेत व त्यांनी एकूण ३२ पदव्या मिळवलेल्या आहेत.
  2. इ.स. २००४ मध्ये, कोलंबिया विद्यापीठाने जगातल्या टॉप १०० विद्वानांची यादी तयार केली होती त्यात पहिलेनाव 'डॉ. भीमराव आंबेडकर' हे होते. विद्यापीठाने त्यांचा उल्लेख आधुनिक भारताचे जनक असा केला होता.
  3. इ.स. २०११ मध्ये, इंग्लंडच्या केंब्रिज विद्यापीठाने डॉ. आंबेडकरांवर केलेल्या संशोधननानुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ज्ञानक्षेत्रांतील तब्बल ६४ विषयांचा गाढा अभ्यास (मास्टरी) होता, जगाताच्या इतिहासात अन्य कुणाचेही एवढ्या विषयांत प्रभुत्व नव्हते.

हे सुद्धा पहा

संदर्भ आणि नोंदी

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत