जुने संसद भवन

दिल्लीतील भारताच्या संसदेची पूर्वीची जागा

जुने संसद भवन ही भारतीय संसदेची जुनी इमारत आहे. १९१२-१३ साली ब्रिटीश वास्तुकार एडविन लुट्येन्स आणि हर्बट ब्रेकर यांनी या वर्तुळकार इमारतीची रचना केली. २०२४मध्ये नवीन संसद भवन बांधल्यावर भारताच्या संसदेच्या बैठका तेथे होतात.इमारतीच्या बाह्य वर्तुळकार गच्चीस २५७ ग्रेनाइट स्तंभांचा आधार आहे. संसद भवन दिल्लीच्या जनपथवरील राष्ट्रपतीभवन जवळ आहे.

संसद भवन, दिल्ली

आंबेडकर पुतळा

भारतीय संसदेच्या परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा हा दिल्लीच्या भारतीय संसद भवनासमोर उभारलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा कांस्य धातूचा पुतळा आहे. हा पुतळा १५ फुट उंचीचा असून त्याचा उजवा पाय तितक्याच उंचीच्या चौथऱ्यावर थोडा पुढे सरकून ठेवलेला आहे. बाबासाहेबांच्या या पुतळ्याच्या डाव्या बगलेत भारताचे संविधान हे पुस्तक आहे. त्यांचा उजवा हात पूर्णपणे वर उचललेला असून तर्जनी संसद भवनाकडे रोखलेली आहे.[१]

हा डॉ. आंबेडकर पुतळा बी.व्ही. वाघ यांनी बनवलेला असून २ एप्रिल १९६७ रोजी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते त्याचे अनावरण झालेले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीने हा पुतळा भेट दिला होता.[२]

छायाचित्रे

हे सुद्धा पहा

संदर्भ

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत