जाॅन कॅल्व्हिन

जाॅन कॅल्व्हिन (फ्रेंच: John Calvin; १० जुलै १५०९, पिकार्दी, फ्रान्स - २७ मे १५६४, जिनिव्हा, स्वित्झर्लंड) हा प्रबोधन काळातील एक प्रमुख धर्मसुधारक होता. तो जन्माने फ्रेंच होता, पण त्याला तेथून हद्दपार करण्यात आल्याने तो स्वित्झर्लंडमध्ये जाऊन राहिला. जाॅन कॅल्व्हिन व्यवसायाने वकील होता. त्याने धर्मशास्त्रतत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास करून 'ख्रिश्चन धर्मसंस्था' (Institutes of Christian Religion) हा ग्रंथ लिहिला. तसेच त्याने प्रोटेस्टंट पंथास तत्त्वज्ञानाची बैठक प्राप्त करून दिली. लोकांनी बायबल वाचावे, प्रवचने ऐकावीत, बायबलमधील वचनाप्रमाणे वर्तन करावे, सामुदायिक प्रार्थना कराव्यात, उत्सव, खेळ, समारंभ व नाच टाळावेत असे त्याचे मत होते. त्यामुळे लोक त्याला कर्मठ हुकुमशहा असे म्हणत.

जाॅन कॅल्व्हिन

जाॅन कॅल्व्हिनने स्वीकारलेल्या प्रोटेस्टंट पंथाच्या शाखेस प्युरिटन असे म्हटले जाते. त्याच्या विचारांचा प्रभाव फ्रान्स, नेदरलॅंड, जर्मनी, हंगेरी, पोलंड, स्कॉटलंड इत्यादी देशांत दिसून येतो.

बाह्य दुवे

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत