जानकी देवी बजाज

जानकी देवी बजाज (७ जानेवारी १८९३ - २१ मे १९७९) या भारतीय एक स्वातंत्र्य सेनानी होत्या, ज्यांना १९३२ मध्ये सविनय कायदेभंग चळवळीत भाग घेतल्याबद्दल तुरुंगवास भोगावा लागला होता.

जानकी देवी बजाज
जन्म७ जानेवारी १८९३ (1893-01-07)
जावरा, मध्य प्रदेश, भारत
मृत्यू२१ मे, १९७९ (वय ८६)
राष्ट्रीयत्वभारत भारतीय
नागरिकत्वभारतीय
पेशास्वातंत्र्य सैनिक, समाजसेविका
धर्महिंदू
जोडीदारजमनालाल बजाज
अपत्येकमलनयन बजाज
पुरस्कारपद्मविभूषण

प्रारंभिक जीवन

जानकी देवीचा जन्म ७ जानेवारी १८९३ रोजी मध्य प्रदेशातील जाओरा येथील अग्रवाल कुटुंबात झाला. वयाच्या आठव्या वर्षीच त्यांचा विवाह बारा वर्षाच्या जमनालाल बजाज सोबत झाला.[१] विवाह पूर्णपणे सुसंवादी आणि पारंपारिक होता, आणि जानकीदेवी एक समर्पित पत्नी आणि आई होत्या. त्यांच्या लग्नाच्या वेळी, बजाज कुटुंब अत्यंत मध्यमवर्गीय व्यापारी लोकांपैकी एक होते. काही वर्षांमध्ये, जमनालालने एक मोठे व्यावसायिक साम्राज्य निर्माण केले आणि ते भारतातील सुरुवातीच्या उद्योगपतींपैकी एक बनले.[२]

जमनालाल यांनी स्वातंत्र्य संग्राम चळवळीत भाग घेतला आणि जानकीदेवी यांनी चरख्यावर खादी कातणे, गौसेवेसाठी आणि हरिजनांचे जीवन सुधारणे आणि १९२८ मध्ये त्यांच्या मंदिर प्रवेशासाठी काम केले. स्वातंत्र्यानंतर त्यांनी विनोबा भावे यांच्यासोबत भूदान चळवळीत काम केले.[३] त्यांनी १९४२ पासून अनेक वर्षे अखिल भारतीय गोसेवा संघाच्या अध्यक्षा म्हणून काम केले.[१] स्वातंत्र्या नंतर इ.स. १९५६ मध्ये त्यांना पद्मविभूषण हा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला.[४] १९६५ मध्ये त्यांचे 'मेरी जीवन यात्रा' नावाचे आत्मचरित्र प्रकाशित झाले.

वारसा

इस १९७९ मध्ये त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. 'जानकी देवी बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज', 'जानकी देवी बजाज गव्हर्नमेंट पीजी गर्ल्स कॉलेज, कोटा' आणि बजाज इलेक्ट्रिकल्सने स्थापित 'जानकीदेवी बजाज ग्राम विकास संस्था' यासह अनेक शैक्षणिक संस्था आणि पुरस्कार त्यांच्या स्मरणार्थ स्थापन केल्या गेल्या.[५] इंडियन मर्चंट्स चेंबरच्या लेडीज विंगने 1992-93 मध्ये ग्रामीण उद्योजकांसाठी IMC-लेडीज विंग जानकीदेवी बजाज पुरस्काराची स्थापना केली.[१]

लेखन कार्य

  • मेरी जीवन यात्रा. लेखक: जानकी देवी बजाज, विनोबा भावे. प्रकाशन:सत्साहित्य प्रकाशन (१९५६), नवी दिल्ली.

पुरस्कार

संदर्भ

बाह्य दुवे

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत