जमदग्नी

सप्तर्षींपैकी एक ऋषी, श्री परशुरामाचे पिता

महर्षि जमदग्नी (संस्कृत: जमदग्नि) हे हिंदू हिंदू इतिहास व पौराणिक कथांमध्ये उल्लेखलेल्या सप्तर्षींपैकी एक ऋषी आहेत । विद्यमान मन्वंतरातील सप्तर्षींमध्ये ते सातवे मानले जातात । रेणुका ही त्यांची पत्नी होती. त्यांचा जन्म भृगू ऋषींच्या कुळात झाला । महाराज रेणु ह्यांचे ते जावई होते । रेणुका देवी आणि महर्षि जमदग्नी ह्यांना पाच पुत्र झाले. विष्णुंचे अवतार मानले जाणारे परशुराम हे त्यांचे पुत्र पाच पुत्रांमधील सर्वांत धाकटे होते.

महर्षि जमदग्नि हे थोर तपस्वी या ज्ञानी ऋषि होते। मात्र त्यांचा क्रोध हा सुरुवातीला आत्यंतिक होता । एकदा त्यांनी क्रोधित होऊन रेणुका मातेच्या शिरच्छेद करण्याची आज्ञा आपल्या पुत्रांना दिली । ज्येष्ठ पुत्राने हे ऐकताच मातेच्या विषयी असे कृत्य करण्यास नकार देत क्रोधित होऊन त्यांना विरोध केला । त्यास रागाच्या भरात जमदग्नि ऋषींनी भस्म करून टाकले , अश्या प्रकारे पहिले ४ पुत्र नकार दिल्यामुळे भस्मसात झाले । शेवटी त्यांनी परशुरामाला ही आज्ञा दिली । वडिलांच्या योगसामर्थ्याचे बल माहीत असल्याने परशुरामांनी वडिलांच्या आज्ञेचे पालन केले। आज्ञाधारी पुत्रामुळे महर्षि जमदग्नि त्यावर प्रसन्न होऊन त्यांचा राग त्वरित शांत झाला । त्यांनी परशुरामाला वर मागितला असता , चतुराईने परशुरामांनी आपल्या आईस या चारही भावांना पुनर्जीवित करण्याची विनंती केली । महर्षि जमदग्नि ह्यांनी त्वरित सर्वांना जीवंत केले या आपल्या हातून पतिव्रता पत्नी वर संशय घेण्याचे व हत्या करण्याचे भीषण पापकृत्य घडले आहे हे त्यांच्या लक्षात येताच ते भावनाविवश होऊन शोक करू लागले । त्यांना रेणुका मातेने शांत केले या परशुरामास टपाल जाण्याची अनुमति दिली । आपल्या पापाचे प्रायश्चित्त म्हणून महर्षि जमदग्नि ह्यांनी क्रोध कायमचा त्यागण्याची प्रतिज्ञा केली ।

सप्तर्षी
अत्रीभारद्वाजगौतमजमदग्नीकश्यपवसिष्ठविश्वामित्र
🔥 Top keywords: आषाढी एकादशीविशेष:शोधामुखपृष्ठशिवाजी महाराजसंत तुकारामज्ञानेश्वरए.पी.जे. अब्दुल कलामआषाढी वारी (पंढरपूर)पसायदानलोकमान्य टिळकविठ्ठलकृत्रिम बुद्धिमत्ताक्लिओपात्रानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेविशाळगडमुकेश अंबाणीमहाराष्ट्रामधील जिल्हेदिशाबाबासाहेब आंबेडकरराधिका मर्चंट अंबाणीशंकरराव चव्हाणसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळानामदेवभारताचे संविधानमहाराष्ट्र विधान परिषदमहाराष्ट्र शासनमहाराष्ट्रथॅलसीमियारायगड (किल्ला)मराठी संतअण्णा भाऊ साठेकोल्हापूर संस्थानतंतुवाद्यहोमी भाभाभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळभारतपंढरपूरभारताच्या पंतप्रधानांची यादी