जगातील अमान्य व अंशतः मान्य देशांची यादी

ह्या जगातील अमान्य व अंशतः मान्य देशांची यादी मध्ये अशा देशांचा समावेश केला गेला आहे जे जगातील इतर राष्ट्रांना अमान्य, अंशतः किंवा बहुतांशी मान्य आहेत.

  पुर्णपणे अमान्य
  अंशतः मान्यता
  बहुतांशी मान्यता
  असे वादग्रस्त भाग ज्यांना काही राष्ट्रांनी मान्यता दिलेली आहे

पूर्णपणे अमान्य देश

नावकधीपासुन वादग्रस्तमान्यतासंदर्भ
 सोमालीलँड१९९१जगातील सर्व देश सोमालीलॅंडला सोमालियाचा भाग मानतात.

इतर अमान्य देशांकडून मान्यता मिळालेले देश

नावकधीपासुन वादग्रस्तमान्यतासंदर्भ
 नागोर्नो-काराबाख१९९१जगातील सर्व देश नागोर्नो-काराबाखला अझरबैजानचा भाग मानतात. ट्रान्सनिस्ट्रिया,दक्षिण ओसेशियाअबखाझिया या अमान्य देशांनी नागोर्नो-काराबाखला मान्यता दिली आहे.
 ट्रान्सनिस्ट्रिया१९९०ट्रान्सनिस्ट्रियाचे स्वातंत्र्य फक्त अबखाझियादक्षिण ओसेशिया ह्या देशांना मान्य आहे. जगातील सर्व देश ट्रान्सनिस्ट्रियाला मोल्दोव्हाचा भाग मानतात.[१]

किमान एका राष्ट्राकडून मान्यता मिळालेले देश

नावकधीपासून वादग्रस्तमान्यतासंदर्भ
 अबखाझिया१९९२अबखाझियाला रशियानिकाराग्वा ह्या राष्ट्रांकडून व ट्रान्सनिस्ट्रिया आणि दक्षिण ओसेशिया ह्या अमान्य देशांकडून मान्यता मिळाली आहे.[२] जगातील इतर सर्व देश अबखाझियाला जॉर्जियाचा भाग मानतात.[३][४]
 तैवान१९४९तैवानला व्हॅटिकन सिटी व २२ इतर देशांनी मान्यता दिलेली आहे. इतरांपैकी बहुतांश देशांचे तैवानशी अनधिकृत संबंध आहेत.[५]
 कोसोव्हो२००८कोसोव्होचे स्वातंत्र्य ६२ राष्ट्रांनी, तैवानने व अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांनी मान्य केलेले आहे. जगातील इतर सर्व देश कोसोव्होला सर्बियाचा भाग मानतात.[६].[७]
 उत्तर सायप्रस१९८३उत्तर सायप्रसचे स्वातंत्र्य केवळ तुर्कस्तान ह्या एकाच राष्ट्राला मान्य आहे. जगातील इतर सर्व देश उत्तर सायप्रसला सायप्रसचा भाग मानतात.[८]
पॅलेस्टाईन१९८८पॅलेस्टाईनला ९३ राष्ट्रांनी मान्यता दिलेली आहे.[९] २२ इतर राष्ट्रांमध्ये पॅलेस्टाईनचे दूतावास आहेत. इस्रायलला स्वतंत्र पॅलेस्टाईन देश अमान्य आहे.[१०]
 सहरावी अरब लोकशाही प्रजासत्ताक१९७६पश्चिम सहारावर मोरोक्कोने आपला हक्क सांगितला आहे व येथील बराचसा भाग व्यापलेला आहे. उरलेल्या भागात सहारवी अरब लोकशाही प्रजासत्ताकची सत्ता असून त्यानेही पूर्ण पश्चिम सहारावर आपला हक्क सांगितला आहे. पंचवीस राष्ट्रे आणि अरब लीग याला मोरोक्कोचा भाग समजतात. एकोणपन्नास देश याला सहारवी अरब लोकशाही प्रजासत्ताक हा स्वतंत्र देश समजतात तर उरलेले देश येथे कोणाचीच सत्ता असल्याचे मान्य करीत नाहीत.[११]
 दक्षिण ओसेशिया१९९१दक्षिण ओसेशियाला रशियानिकाराग्वा ह्या राष्ट्रांकडून व ट्रान्सनिस्ट्रिया आणि अबखाझिया ह्या अमान्य देशांकडून मान्यता मिळाली आहे.[२] जगातील इतर सर्व देश दक्षिण ओसेशियाला जॉर्जियाचा भाग मानतात.[४][१२]

असे देश जे किमान एका देशाला अमान्य

नावकधीपासून वादग्रस्तमान्यतासंदर्भ
आर्मेनिया१९९२आर्मेनियाला पाकिस्तानने मान्यता दिलेली नाही[१३][१४]
चीन१९४९चीनला तैवानने तसेच व्हॅटिकन सिटी व २२ इतर राष्ट्रांनी चीनला मान्यता दिलेली नाही.[१५]
 सायप्रस१९७४सायप्रस देश तुर्कस्तान ह्या राष्टाला व उत्तर सायप्रसला अमान्य. हे दोन्ही देश सायप्रसला दक्षिण सायप्रसचा ग्रीक भाग असे संबोधतात.[१६][१७][१८]
 इस्रायल१९४८इस्रायल खालील राष्ट्रांना अमान्य आहे: बहरैन[१९], क्युबा, इंडोनेशिया, इराण[२०], इराक[२१], उत्तर कोरिया, कुवैत, लेबेनॉन, लिबिया[२२], मलेशिया, पाकिस्तान, सौदी अरेबिया, सुदान, सीरियायेमेन.[२३][२४]
 उत्तर कोरिया१९४८उत्तर कोरिया देश जपानदक्षिण कोरिया ह्या राष्ट्रांना मान्य नाही.[२५][२५][२६][२७]
 दक्षिण कोरिया१९४८दक्षिण कोरिया देश उत्तर कोरियाला मान्य नाही.[२८][२९]

हेसुद्धा पहा

संदर्भ

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत