गॅरंटीड रेट फील्ड

गॅरंटीड रेट फील्ड (पूर्वीचे कॉमिस्की पार्क तथा यूएस सेल्युलर फील्ड) हे अमेरिकेच्या इलिनॉय राज्यातील शिकागो शहराच्या दक्षिण भागात असलेले बेसबॉलचे मैदान आहे. हे मेजर लीग बेसबॉलच्या शिकागो व्हाईट सॉक्स संघाचे घरचे मैदान आहे. हे मैदान इलिनॉय राज्याच्या मालकीचे असून अमेरिकेतील व्यावसायिक खेळांच्या मैदानांपैकी सार्वजनिक मालकीच्या मोजक्या अशा मैदानांपैकी एक आहे. याची बांधणी १९९१मध्ये १३ कोटी ७० लाख डॉवर खर्चाने केली गेली. त्यावेळी त्याला कॉमिस्की पार्क असे नाव होते.

या मैदानाची आसनक्षमता ४४,३२१ इतकी आहे.

२००३मध्ये शिकागोमधील दूरसंचार कंपनी यूएस सेल्युलरने ६ कोटी ८० लाख डॉलर देउन या मैदानाचे नाव २० वर्षांसाठी यूएस सेल्युलर फील्ड असे करून घेतले. [१] तेराच वर्षांनी यूएस सेल्युलरने १ कोटी ३० लाख डॉलर देउन हा करार रद्द केला आणि सुमारे १ कोटी डॉलर देणे टाळले. [२] यानंतर २०१६मध्ये खाजगी निवासी तारण कंपनी गॅरंटीड रेटने १३ वर्षे आपले नाव देण्याचा करार केला. यासाठी पहिल्या १० वर्षांत २ कोटी डॉलर दिले जातील [३] [४] [५]

२०१६मध्ये गॅरंटीड रेट फील्ड

संदर्भ

ओरियोल पार्क ऍट कॅम्डेन यार्ड्सफेनवे पार्कयांकी स्टेडियमट्रॉपिकाना फील्ड
रॉजर्स सेंटरगॅरंटीड रेट फील्डप्रोग्रेसिव्ह फील्डकोमेरिका पार्क
कॉफमन स्टेडियमटारगेट फील्डएंजेल स्टेडियम ऑफ ऍनाहाइमओकलंड-अलामेडा काउंटी कॉलिझियम
सेफको फील्डग्लोब लाइफ फील्डट्रुइस्ट पार्कलोन डेपो पार्क
सिटी फील्डसिटिझन्स बँक पार्कनॅशनल्स पार्करिगली फील्ड
ग्रेट अमेरिकन बॉल पार्कमिनिट मेड पार्कअमेरिकन फॅमिली फील्डपीएनसी पार्क
बुश स्टेडियमचेझ फील्डकूर्स फील्डडॉजर स्टेडियम
पेटको पार्कएटी अँड टी पार्क
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत