गजलक्ष्मी

हिंदू धर्म आणि संस्कृतीतील अष्टलक्ष्मींपैकी गजलक्ष्मी ही महत्त्वाची देवता मानली जाते. हत्तींसह असणारी, कमळात बसलेली लक्ष्मी म्हणून हिला गजलक्ष्मी असे संबोधिले जाते.

तंजावर चित्रशैलीतील गजलक्ष्मी

वर्णन

ही देवी पद्मासनात बसलेली असून चतुर्भुजा असते. एका हाती कमळ अणि एका हातात अभय मुद्रा अशी हिची मूर्ती असते. तिच्या दोन्ही बाजूला एकूण दोन किंवा चार हत्ती असून ते आपल्या सोंडेत पाणी घेऊन त्याचा देवीवर अभिषेक करताना दाखविलेले असतात. ही पर्जन्याची देवता मानली जाते तसेच समृद्धी आणि ऐश्वर्याचे प्रतीक म्हणून पूजिली जाते.[१]हिंदू संप्रदायातही तिचे महत्त्व विशेष मानले जाते.[२]गजलक्ष्मीला हत्ती अभिषेक करीत आहेत असे चित्रण दिसते.गजान्तलक्ष्मी हिचे स्वरूप यापेक्षा वेगळे आहे हे येथे लक्षात घ्यावे लागेल.

शिल्प

कमलासनावर बसलेली देवी, तिच्या दोन बाजूंना दोन उभे हत्ती, त्यांच्या सोंडेमधे पाण्याने भरलेल्या दोन घागरी, ते हत्ती घागरीमधले पाणी देवीच्या डोक्यावर ओतत आहेत असे शिल्प आपल्याला अनेकदा बघायला मिळते. हिलाच अभिषेकलक्ष्मी अथवा गजलक्ष्मी असे संबोधले जाते. लक्ष्मी, हत्ती ही संपत्ती, ऐश्वर्याची प्रतीके मानली गेली आहेत. तद्वत लक्ष्मीचा पृथ्वीशी आणि हत्तींचा मेघाशी संबंध जोडलेला बघायला मिळतो. मेघांच्या द्वारे धरतीला केलेला जलाभिषेक हेसुद्धा या मूर्तीमधून कलाकारांना दाखवायचे असते. गजलक्ष्मीच्या सुंदर मूर्ती आपल्याला विविध ठिकाणी बघायला मिळतात. त्यातली नितांतसुंदर आणि त्रिमितीचा भास करून देणारी भव्य अशी मूर्ती वेरुळच्या कैलास लेण्याच्या प्रवेशापाशीच आहे. कैलास लेण्यात प्रवेश केल्यावर समोरच आपल्याला अत्यंत भव्य, देखणे असे गजलक्ष्मीचे शिल्प सामोरे येते. इथे बसलेल्या देवीच्या डोक्यावर हत्ती पाण्याचे कलश रिते करताहेत, देवी एका जलाशयात फुललेल्या कमळावर बसलेली आहे आणि त्या जलाशयात निर्माण होणाऱ्या लाटासुद्धा या प्रतिमेत दाखवलेल्या आहेत. त्या लाटांमुळे त्या शिल्पाला त्रिमितीचा भास निर्माण होतो. इतके देखणे शिल्प क्वचितच दुसरीकडे असेल.

गडचिरोली जिल्ह्य़ातल्या मरकडी इथल्या मंदिरावरसुद्धा गजलक्ष्मीचे असेच सुंदर शिल्प पाहायला मिळते. कोंकणात ही शिल्पे आश्चर्य वाटावं एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर बघायला मिळतात. कोंकणात गजलक्ष्मीला ‘भावई’ असे म्हटले जाते. म्हणजे मूर्ती तीच, पण तिचे नाव भावई देवी. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात गोठोस या गावी या देवीचे अतिशय सुबक आणि आकर्षक शिल्प मंदिरात ठेवलेले आहे. तसेच गोव्यातसुद्धा वळवई या गावाची ग्रामदेवता म्हणून याच भावईची अतिशय सुंदर मूर्ती बघायला मिळते. कोंकणात अनेक मंदिरांच्या आवारात हे गजलक्ष्मीचे शिल्प ठेवलेले दिसते. कदाचित जुन्या कुठल्या मंदिरावरील हे शिल्प आता मात्र ऊन-पाऊस झेलत उभे असते. याचे उदाहरण म्हणजे चिपळूण इथल्या भरव मंदिराच्या बाहेर असेच सुंदर शिल्प बाजूला ठेवलेले आहे.

पुणे जिल्ह्य़ातील प्राचीन नाणेघाटाच्या तोंडाशी गजलक्ष्मीचे एक काहीसे भग्न शिल्प आहे, तसेच हरिश्चंद्रगडावर जाताना टोलारखिडीत गजलक्ष्मी आपल्याला दर्शन देते.[३]

हत्तीसह संबंध

लक्ष्मीसहित गजयुग्म कोरण्याची कल्पना केंव्हा उगम पावली हे सांगता येत नाही,परंतु ऋग्वेदातील श्रीसूक्तात हस्तीनादः प्रबोधीनीम असा संदर्भ आढळतो.हत्ती हे वैभवाचे प्रतीक मानले जाते.[४]

ॠग्वेदातील सूक्तात लक्ष्मीचे वर्णन आहे. ती हस्तिनाद प्रबोधिनी आहे. म्हणजे हत्तीच्या चित्कारांनी ती जागी होते.[५]

प्राचीनत्व

गजलक्ष्मीचा सर्वात प्राचीन संदर्भ इसवी सनाच्या तिसऱ्या शतकापासून उपलब्ध होतो.कौशांबीच्या नाण्यांवर ही देवता कोरलेली आढळते.तसेच स्रीच्या दोन्ही बाजूंना असलेले हत्ती बौद्ध धर्मामध्ये गौतम बुद्धांच्या जन्माचे निदर्शक म्हणून दाखविले जातात. इसवी सणाच्या सहाव्या-सातव्या शतकातील ताम्रपटावर गजलक्ष्मी युक्त राजमुद्रा दिसून येतात.कलचुरी राजांच्या काळापर्यंत अशा मुद्रा प्रचलित होत्या.[६]

संदर्भ

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत