कॉलोराडो

अमेरिकेचे एक राज्य

'कोलोराडो (किंवा कॉलोराडो, Colorado) अमेरिकेचे एक राज्य आहे. कोलोराडो हे नाव स्पॅनिश भाषोत्पन्न आहे. या भाषेतकोलोराडोचा अर्थ लाल नदी असा होतो.

कोलोराडो
Flag of the United States अमेरिका देशाचे राज्य
कोलोराडो राज्याचा ध्वजकोलोराडो राज्याचे राज्यचिन्ह
कोलोराडोचा ध्वजचिन्ह
टोपणनाव: The Centennial State (शतकी राज्य)
ब्रीदवाक्य: निल सिने नुमिने (लॅटिन - दैवाशिवाय काही (होत) नाही)
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत कोलोराडो दर्शविणारा नकाशा
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत कोलोराडो दर्शविणारा नकाशा

अमेरिकेच्या नकाशावर कोलोराडोचे स्थान
अधिकृत भाषाइंग्लिश
रहिवासीकोलोराडन
राजधानीडेन्व्हर
मोठे शहरडेन्व्हर
सर्वात मोठे महानगरडेन्व्हर
क्षेत्रफळ अमेरिकेत ८वावा क्रमांक
 - एकूण२,६९,८३७[१] किमी² (१,०४,१८५[१] मैल²)
 - % पाणी०.३६
  - अक्षांश३७o उत्तर ते ४१o उत्तर
  - रेखांश१०२°०३' पश्चिम to १०९°०३' पश्चिम
लोकसंख्या अमेरिकेत २२वावा क्रमांक
 - एकूण४३,०१,२६१ (२०१० सालच्या गणनेनुसार)
 - लोकसंख्या घनता१६.०१/किमी² (अमेरिकेत ३७वावा क्रमांक)
 - सरासरी उत्पन्न $५१,०२२
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेशऑगस्ट १, १८७६ (३८वावा क्रमांक)
गव्हर्नरजॅरेड पोलिस(डे.)
संक्षेपCO  US-CO
संकेतस्थळwww.colorado.gov

कोलोराडो साधारणपणे अमेरिकेच्या मध्य-पश्चिम भागात आहे. कोलोराडोला रॉकी पर्वताचे घर मानतात.

महत्त्वाची शहरे

इतिहास

कोलोराडो हे जुलै ४, इ.स. १८७६ रोजी अधिकृतपणे संयुक्त संस्थानात समाविष्ट झाले. याच दिवशी अमेरिकेच्या स्वातंत्र्याला शंभर वर्षे पूर्ण झाली असल्यामुळे कोलोराडोला शतकी राज्य (सेन्टेनियल स्टेट) असे म्हटले जाते.

भूगोल

कोलोराडो राज्याचे दोन मुख्य भौगोलिक प्रदेश आहेत. राज्याच्या पूर्व भागात सपाट प्रेअरी मैदाने आहेत तर पश्चिम भाग हा अर्ध पर्वतीय प्रदेश आहे.

पूर्व

पश्चिम

रॉकी माऊंटन पर्वतरांगांतील मुख्य रांग राज्याच्या मध्यातून उत्तरदक्षिण गेलेली आहे, तर इतर पर्वतरांगा पश्चिमेस आहेत. अमेरिकेतील १०,०००फुटापेक्षा जास्त उंची असलेल्या जमिनीपैकी अर्ध्याहून अधिक जमीन कोलोराडोत आहे.[२] हीत १४,००० फुटांपेक्षा जास्त उंचीच्या ५३ शिखरांचा समावेश होतो.

नद्या

कोलोराडोमध्ये चार मोठ्या नद्या उगम पावतात.

प्रशासन व राजकारण

कोलोराडोचे प्रशासन अमेरिकेतील इतर राज्यांप्रमाणे आहे. कोलोराडोचे गव्हर्नकोलोराडोचा गव्हर्नर]] राज्याचा मुख्याधिकारी असतो. याची निवडणूक थेट मतदानाने होते. कोलोराडोचे प्रतिनिधीगृह व सेनेट ही दोन सभागृहे राज्यातील कायदे करण्याचे तसेच अंदाजपत्रक पारित करण्याचे काम करतात.

कोलोराडो राज्य ६४ काऊंट्यांमध्ये विभागलेले आहे. प्रत्येक काऊंटीचे स्वतंत्र प्रशासन असते. डेन्व्हर, ब्रूमफील्ड आणि बोल्डर या काऊंट्यांचे प्रशासन त्या त्या शहराच्या प्रशासनाद्वारे चालते.

संदर्भ आणि नोंदी

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत