काळ्या डोक्याचा शराटी

पक्ष्यांच्या प्रजाती

काळ्या डोक्याचा शराटी हा एक पाणपक्षी आहे. याला पांढरा अवाक, कंकर असेही म्हणतात.

काळ्या डोक्याचा शराटी, कंकर
शास्त्रीय नावThreskiornis melanocephalus (Latham)
कुळअवाकाद्य (Threskiornithidae)
अन्य भाषांतील नावे
इंग्लिशBlack-headed Ibis
संस्कृतशराटिका
हिंदीकचाटोर

वर्णन

कोंबडीपेक्षा मोठा साधारण ७५ सें. मी. आकाराचा काळ्या डोक्याचा शराटी पक्षी मुख्यत्वे काळ्या आणि पांढऱ्या रंगाचा आहे. याची चोच, डोके आणि मान तसेच पाय काळ्या रंगाचे असून उर्वरीत पक्षी पांढऱ्या रंगाचा आहे. याची चोच लांब आणि बाकदार असते. वीण काळात नराच्या पाठीकडील भाग आणि पंख काळपट करड्या रंगाचे होतात. एरवी नर-मादी दिसायला सारखेच असतात. हे पक्षी पाणथळ भागात थव्याने राहतात.

वास्तव्य/आढळस्थान

भारतासह नेपाळ, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, म्यानमार, जपान पर्यंत दक्षिण आशियाई देशात काळ्या डोक्याचा शराटी पक्ष्याचे वास्तव्य आहे. हे भारतात निवासी आणि स्थानिक स्थलांतर करणारे आहेत. दलदलीचे प्रदेश, सरोवरांच्या भागात आढळणारा हा पक्षी काळा अवाक तसेच बगळ्यांसह राहतो. सकाळ-संध्याकाळ एखाद्या झाडावर सर्व एकत्र जमतात. अशा जागेला सारंगागार म्हणतात.

खाद्य

उथळ पाण्यात चोच बुडवून एकट्याने आणि लहान-मोठ्या थव्याने हे पक्षी दिवसभर खाद्य शोधत फिरतात. सरडे, गोगलगाय, बेडुक, मासोळ्या, खेकडे वगैरे पाण्यात राहणारे जीव काळ्या डोक्याचा शराटी पक्ष्यांचे खाद्य आहे.

प्रजनन काळ

उत्तर भारतात जून ते सप्टेंबर आणि दक्षिण भारतात नोव्हेंबर ते फेब्रुवारी-मार्च हा काळ या पक्ष्यांचा वीण काळ आहे. यांचे घरटे पाण्यात उभ्या असलेल्या किंवा जवळच्या झाडांवर, मोठ्या काटक्या वापरून केलेले असते. सहसा अशा झाडांवर बगळ्यांचे घरटेही असते. मादी एकावेळी २ ते ४ निळसर किंवा हिरवट पांढऱ्या रंगाची त्यावर क्वचित तपकिरी ठिपके असलेली अंडी देते. अंडी उबविण्यापासून पिलांच्या संगोपनाची सर्व कामे नर-मादी मिळून करतात.

चित्रदालन

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत