काराकोरम महामार्ग

काराकोरम महामार्ग हा जगातील सर्वाधिक उंचीवर बांधला गेलेला रस्ता आहे.[१] काराकोरम पर्वतरांगेतील अत्यंत दुर्गम भागातून वाट काढत हा रस्ता चीनच्या शिंच्यांग प्रांताला पाकिस्तानच्या गिलगित-बाल्टिस्तान ह्या स्वायत्त भागाशी जोडतो. याचे अधिकृत नाव पाकिस्तानात एन-३५ तर चीनमध्ये जी-३१४ आहे.

एन-३५ (पाकिस्तान), जी-३१४ (चीन)
लांबी१,३०० किमी
देशपाकिस्तान चीन
सुरुवातअबॉटाबाद, पाकिस्तान
मुख्य शहरेअबॉटाबाद - थाकोट - चिलास - गिलगिट - अलियाबाद - सुस्त, खुंजेराब घाट, काश्गर
शेवटअत्तारी
जुळणारे प्रमुख महामार्ग

एन-५

एन-१५
राज्ये व प्रदेशपंजाब (पाकिस्तान)
गिलगित-बाल्टिस्तान (पाकव्याप्त काश्मीर)
शिंच्यांग (चीन)
इतर नावे काराकोरम महामार्ग

या रस्त्यावरील सर्वोच्च बिंदू खुंजेराब घाटात ४,६९३ मी उंचीवर आहे.[२][३]

इतिहास

प्राचीन काळात सिंधू नदीच्या खोऱ्यातून काश्मीर, अफगाणिस्तान, तसेच चीनकडे जाण्यासाठी हा मुख्य मार्ग होता. चीनमधील काश्गर शहराजवळ हा रस्ता रेशीम मार्गास जाऊन मिळे. १९५९ च्या सुमारास पाकिस्तान व चीनच्या शासकांनी हा रस्ता पक्का करण्यास सुरुवात केली व त्यास 'मैत्री महामार्ग' असे नाव दिले. वीस वर्षे बांधकाम चालल्यावर १९७९मध्ये हा रस्ता बांधून पूर्ण झाला. यात ८१० पाकिस्तानी तर अंदाजे २०० चीनी कामगार मृत्युमुखी पडले.[४] पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीर भागात फ्रंटियर वर्क्स ऑर्गेनायझेशन व पाकिस्तान आर्मी कोर ऑफ इंजिनीयर्स यांनी हा रस्ता बांधला..[५] सुरुवातीस फक्त लष्करी हालचाली करण्यासाठी वापरात असलेला हा रस्ता १९८६ च्या सुमारास आम जनतेस खुला करण्यात आला.

अट्टाबाद सरोवर

जानेवारी ४, इ.स. २०१० रोजी दुपारी दोनच्या सुमारास या रस्त्यावरील करीमाबाद शहराच्या उत्तरेस प्रचंड दरड कोसळली. यात रस्त्याचा मोठा भाग नाहीसा तर झालाच परंतु या अवाढव्य दरडीने जवळून वाहणाऱ्या नदीचे पात्र रोखले गेले व एक सरोवर तयार झाले. काही महिन्यांत हे सरोवर २२ किमी लांब व २०० मी खोल इतके मोठे झाले व त्यात काराकोरम महामार्गाचा १२ किमी लांबीचा भाग बुडून गेला. यानंतर या रस्त्यावरून होणारी वाहतूक थांबली आहे व चीन-दक्षिण पाकिस्तान यांच्यामधील दळणवळण बंद पडले आहे. हा रस्ता पुन्हा केव्हा व कसा सुरू होईल याबद्दल साशंकता आहे.[६]

संदर्भ आणि नोंदी

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत