कातानिया


कातानिया (इटालियन: Catania, It-Catania.ogg उच्चार ) हे इटली देशाच्या सिचिल्या प्रदेशामधील एक शहर आहे. हे शहर सिचिल्याच्या पूर्व भागात आयोनियन समुद्राच्या किनाऱ्यावर वसले आहे. कातानिया हे सिसिलीमधील दुसऱ्या क्रमांकाचे (पालेर्मोखालोखाल)[१] तर इटलीमधील दहाव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. शहराची लोकसंख्या ३,११,५८४ तर महानगराची लोकसंख्या ११,०७,७०२ इतकी आहे.[२]

कातानिया
Catania
इटलीमधील शहर


ध्वज
कातानिया is located in इटली
कातानिया
कातानिया
कातानियाचे इटलीमधील स्थान

गुणक: 37°30′0″N 15°5′25″E / 37.50000°N 15.09028°E / 37.50000; 15.09028

देश इटली ध्वज इटली
प्रांत कातानिया
प्रदेश सिचिल्या
स्थापना वर्ष इ.स. पूर्व आठवे शतक
क्षेत्रफळ १८०.९ चौ. किमी (६९.८ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १६ फूट (४.९ मी)
लोकसंख्या  
  - शहर २,९२,०४४
  - घनता १,६०० /चौ. किमी (४,१०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
comune.catania.it

इ.स. पूर्व आठव्या शतकात वसवलेले[३] व मोठा इतिहास असणारे कातानिया रानिसां काळात इटलीमधील महत्त्वाचे सांस्कृतिक व राजकीय शहर होते. सध्या कातानिया सिसिलीमधील एक मोठे औद्योगिक व पर्यटन केंद्र आहे.‌हे शहर अनेकदा नैसर्गिक आपत्त्यांमध्ये उद्ध्वस्त झाले होते. ११६९मधील भूकंप, १६६९मधील माउंट एटना या ज्वालामुखीचा उद्रेक आणि त्यातून शहरावर आलेली लाव्हाची लाट आणि पुन्हा १६९३चा भूकंप ही काही उदाहरणे आहेत.

प्रेक्षणीय स्थळे

कातानिया शहरातील उ लिओत्रु तथा फाँताना देल'एलेफांते हे कारंजे शहराचे मानचिह्न आहे. हे कारंजे १७३६मध्ये जियोव्हानी बाटिस्टा व्हॅक्कारिनीने बांधले. याच्यावरील हत्ती येथे सापडणाऱ्या लाव्हाजन्य खडकातून कोरलेला आहे.

शिक्षण

पालाझ्झो सेंत्राल देलउनिव्हर्सिता

येथील कातानिया विद्यापीठाची स्थापना १४३४मध्ये झाली होती. इटलीमधील हे सगळ्यात जुने विद्यापीठ आहे.[४] येथे १२ विभागांमध्ये सुमारे ६२,००० विद्यार्थी पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतात.[५]

या विद्यापीठाशी संलग्न असलेली स्कुओला सुपेरिओर दि कातानिया ही संस्था शिक्षणशास्त्रातील उच्च शिक्षण देते.[६]

यांशिवाय येथे इस्तित्युतो मुझिकाल व्हिन्सेंझो बेलिनी ही संगीतशास्त्र शिकवणारी संस्था[७] आणि अक्कादामिया दि बेल आर्ती हे कलामहाविद्यालय आहेत.[८]

वाहतूक

महामार्ग

कातानिया ए१९ मोटरवेद्वारे मेसिना आणि ए१९ मोटरवेद्वारे पालेर्मोशी जोडलेले आहे.

रेल्वे

फेरोव्हिया सर्कमएट्निया हा नॅरो गेज रेल्वे मार्ग कातानियाला रिपोस्तो शहराशी जोडतो. ११० किमी लांबीचा हा मार्ग माउंट एटनाला प्रदक्षिणा घालतो व कातानियापासून २८ किमी ईशान्येस रिपोस्तोला थांबतो.

मेट्रो

मेत्रोपोलिताना दि कातानिया ही भुयारी रेल्वे १९९९ मध्ये सुरू झाली. ८.८ किमी लांबीचा हा भुयारी मार्ग कातानियाच्या पश्चिमेस नेसिमो गावापासून कातानिया शहराच्या मध्यवर्ती भागापर्यंत धावतो.[९]

विमानतळ

व्हिन्सेंझो बेलिनी विमानतळावरून दिसणारा माउंट एटना हा ज्वालामुखी

कातानिया-फाँतानारोसा विमानतळ येथील प्रमुख विमानतळ आहे. येथून युरोपमधील अनेक शहरांना विमानसेवा उपलब्ध आहे.

जुळी शहरे

उ लिओत्रु, कातानियाचे मानचिह्न

हे सुद्धा पहा

संदर्भ

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत