कर्णधार (क्रिकेट)

(कर्णधार, क्रिकेट या पानावरून पुनर्निर्देशित)

Dhoni is the only captain to win all icc trophies क्रिकेट संघाचा कर्णधार बहुदा स्कीपर म्हणून उल्लेखला जातो.[२]. एक नियमीत खेळाडूपेक्षा कर्णधाराच्या खांद्यावर एक नायक म्हणून बऱ्याच अतिरीक्त भूमिका आणि जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. इतर खेळांप्रमाणेच, कर्णधार हा सहसा एक अनुभवी, चांगले संवाद कौशल्य असलेला, आणि संघामध्ये नियमीत असलेला खेळाडू असतो. संघनिवडीमध्ये कर्णधाराचे मत महत्त्वाचे असते. सामन्याच्याआधी कर्णधार नाणेफेक करतो. सामन्याच्या दरम्यान फलंदाजीची क्रमवारी लावण्याचा निर्णय कर्णधाराचा असतो, तसेच प्रत्येक षटक कोणता गोलंदाज करेल, आणि क्षेत्ररक्षकांच्या जागा ठरवण्याची जबाबदारी सुद्धा कर्णधाराची असते. कर्णधाराचे निर्णय अंतिम असला तरीही, हे निर्णय सहसा सर्वसंमतीने घेतलेले असतात. कर्णधाराला क्रिकेट विषयीच्या धोरणामधील गुंतागुंतीचे असलेले ज्ञान, त्याचा धूर्तपणा आणि मुत्सदेपणा यावर संघाचे यश बऱ्याच अंशी अवलंबून असते.

कसोटी क्रिकेट मध्ये सर्वात जास्त सामन्यांत कर्णधारपदाचा तसेच सर्वाधिक कसोटी विजयांचा विक्रम ग्रेम स्मिथच्या नावावर आहे. त्याने २००३ ते २०१४ दरम्यान दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व केले. [१]
काही देश वेगळ्या स्वरूपाच्या खेळासाठी वेगवेगळे कर्णधार निवडण्याचा पर्याय अवलंबतात. मुशफिकूर रहिम (डावीकडे) बांगलादेशचा कसोटी कर्णधार, आणि मशरफे मोर्तझा (उजवीकडे) त्यांचा एकदिवसीय व टी२० कर्णदार.

मैदानावर मोठे निर्णय घेणे गरजेचे असल्याने, इतर खेळांच्या तुलनेत क्रिकेट कर्णधाराच्या खांद्यावर खूपच जास्त जबाबदारीचे ओझे असते. [३]

सध्याचे कर्णधार

आयसीसी पूर्ण सभासद

देशकर्णधारउप-कर्णधार
 इंग्लंडअ‍ॅलास्टेर कूक (कसोटी)
आयॉन मॉर्गन (ए.दि. आणि टी२०)
ज्यो रूट (कसोटी)
जोस बटलर (ए.दि. आणि टी२०)
 ऑस्ट्रेलियास्टीव्ह स्मिथ
डेव्हिड वॉर्नर
 झिम्बाब्वेहॅमिल्टन मसाकाद्झासिकंदर रझा (टी२०)
 दक्षिण आफ्रिकाए.बी. डी व्हिलियर्स (कसोटी आणि ए.दि.)
फाफ डू प्लेसी (टी२०)
रिक्त (कसोटी आणि टी२०)
हाशिम आमला (ए.दि.)
 न्यूझीलंडकेन विल्यमसन
रिक्त
 पाकिस्तानमिसबाह-उल-हक (कसोटी)
अझर अली (ए.दि.)
शाहिद आफ्रिदी (टी२०)
अझर अली (कसोटी)
सरफराझ अहमद (ए.दि. आणि टी२०)
 बांगलादेशमुशफिकुर रहीम (कसोटी)
मशरफे मोर्तझा (ए.दि. आणि टी२०)
तमिम इक्बाल (कसोटी)
शकिब अल हसन (ए.दि. आणि टी२०)
 भारतविराट कोहली (कसोटी)
महेंद्रसिंग धोणी (ए.दि. आणि टी२०)
विराट कोहली (ए.दि. आणि टी२०)
 वेस्ट इंडीजजेसन होल्डर (कसोटी आणि ए.दि.)
डॅरेन सामी (टी२०)
क्रेग ब्रेथवाईट (कसोटी)
ड्वेन ब्राव्हो (टी२०)
 श्रीलंकाॲंजेलो मॅथ्यूजलहिरु थिरिमन्ने (कसोटी)
दिनेश चंदिमल (ए.दि.) आणि (टी२०)

संदर्भ

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत