कन्यादान

कन्यादान[१] हा हिंदू विवाह विधी आहे.[२][१] या परंपरेचे एक संभाव्य मूळ १५ व्या शतकातील दक्षिण भारतातील विजयनगर साम्राज्यात सापडलेल्या शिलालेखांमध्ये सापडते.[३] परंतु भारतभर कन्यादान संदर्भात वेगवेगळे अर्थ लावले जातात.

Hindu Wedding Ritual
कन्यादान करतानाचा प्रसंग
हिंदू धर्माशी निगडित लेख
हिंदू धर्म

हिंदू धर्म

आरंभ

कन्यादान[१] ह्या हिंदु विवाह विधीचा इतिहास हा १५ व्या शतकांपर्यत काढला जाऊ शकतो, कारण विजयनगर साम्राज्यात सापडलेल्या अनेक शिलालेखांवर याचा उल्लेख मिळू शकतो. कन्यादानाचा अनेकदा गैरसमज काढला जातो कि मुलीला तिच्या पालकांकडून वराच्या कुटुंबाला देऊन टाकले. परंतु, ऐतिहासिकदृष्ट्या ही प्रथा वधूने वडिलांचे गोत्र सोडून वराचे गोत्र स्वीकारण्याचे प्रतीक आहे. या शिलालेखांमध्ये नोंदवलेल्या अनेक घटनांवरून असे दिसून येते की त्याकाळी ‘कन्याविक्रय’ ची व्यापक प्रथा होती.[४] ‘ विक्रय ’ म्हणजे ‘ विकणे ’. कन्येच्या पित्याला द्रव्य देऊन त्यापासून कन्या विकत घेऊन तिशी लग्न करणे म्हणजे कन्याविक्रय (आसुरविवाह). हुंड्याचाच एक प्रकार ज्यामध्ये वर वधूला पैसे किंवा तिचे मुल्य देतो.[५] या सामाजिक विकृतीशी लढण्यासाठी, ब्राह्मणांच्या एका समुदाय गटाने त्यांच्या समुदायासाठी कन्यादान विवाह पद्धतीचा अवलंब करण्यासाठी एक सामाजिक कायदा तयार केला. लग्नादरम्यान कोणतेही पैसे दिले जाऊ नयेत किंवा घेतले जाऊ नयेत, जे याचे पालन करणार नाहीत ते राजाकडून शिक्षेस पात्र राहतील असा आदेश होता. वरील शिलालेख हे देखील बळकट करतात की धार्मिक शास्त्रांवर आधारित वैयक्तिक कायद्यांच्या विरोधात समुदाय गटांमध्ये सामाजिक कायद्यांची व्यवस्था व्यापकपणे व्यवहारात होती.[३]

कन्यादान गाणी

ज्या समुदायांमध्ये कन्यादान हे वास्तविक लग्नाचा भाग म्हणून केले जाते, तेथे विविध कन्यादान गाण्यांद्वारे विधी पार पाडला जातो. या गाण्यांद्वारे आपल्या कन्येच्या वियोगाचे दुःख, तिच्या लहानपणींच्या आठवणी, घरच्यांचा जिव्हाळा या गोष्टी त्या गाण्यांमध्ये असतात. महत्त्वाचे म्हणजे, कन्यादान विधी सिंदूर विधी (सिंदूरदान) च्या अगदी आधी होतो.[६]

हे सुद्धा पहा

अजुन वाचण्यासाठी

  • Gutschow, Niels; Michaels, Axel; Bau, Christian (2008). The Girl's Hindu Marriage to the Bel Fruit: Ihi and The Girl's Buddhist Marriage to the Bel Fruit: Ihi in Growing up - Hindu and Buddhist Initiation Ritual among Newar Children in Bhaktapur, Nepal. Otto Harrassowitz Verlag, Germany. आयएसबीएन 3-447-05752-1. pp. 93–173.

संदर्भ

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत