टोपणनाव: नागनाथ / नागेश्वर | |
— तालुका — | |
![]() | |
भाषा | मराठी |
तहसील | |
पंचायत समिती |
औंढा नागनाथ तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील हिंगोली जिल्ह्यातील एक तालुका आहे. येथे बारा ज्योतिर्लिंगांपैकी औंढा-नागनाथ हे ज्योतिर्लिंग आहे. याचे प्राचीन नाव आमर्दक. ही एक शिवाची उपाधी असून, या नावाचा एक शैवपंथही अस्तित्वात होता. यातूनच या स्थलनामाची उत्पत्ती झाली. 'आमर्दक सन्तान' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शैव अनुयायांचे हे मुख्य पीठ असून, त्याचा प्रसार सातव्या ते अकराव्या शतकात गुजराथ, राजस्थान आणि मध्य प्रदेश या भागांतही झाला होता.[१]
भारतातील पवित्र बारा ज्योतिर्लिंगापैकी आद्य ज्योतिर्लिंग मानल्या जाणाऱ्या नागनाथ (नागेश्वर) मंदिरासाठी औंढा हे गाव प्रसिद्ध आहे. या गावात एकेकाळी आमर्दक सरोवर होते. हे मंदिर एका विस्तीर्ण २९०X१९० फुटी आवारात असून त्याभोवती एक मोठा परकोट आहे. परकोटाला चार प्रवेशद्वारे असून त्यातील उत्तरेकडील प्रवेशद्वारावर नगारखाना आहे. तेच मुख्य प्रवेशद्वार होय. आवारातच एक पायविहीर असून तिचा नागतीर्थ असा उल्लेख केला जातो. सासू-सुनेची बारव असेही तिला म्हणतात. मुख्य मंदिराची लांबी १२६ फूट, रुंदी ११८ फूट आणि उंची ९६ फूट आहे. मंदिराच्या पश्चिमेस नामदेव महाराजांचे मंदिर व सभामंडप आहे. औंढा हे संत नामदेवाचे गुरू विसोबा खेचर यांचेही गाव आहे. त्यांची समाधी या परिसरातच आहे.
येथे नागनाथ या नावाने महाविद्यालय आहे.
औंढा नागनाथ तालुक्यातील काहीं गांवे
अंजनवाडाअंजनवाडीअनखळीअसोंदाअसोलाअसोलाआजरसोंडाआमदरीउंडेगावउखळीउमराऔंढा नागनाथकंजाराकाकडदाभाकाठोडा तांडाकुंडकर पिंपरीकेळीकोंडशी बुद्रूकगढाळागांगलवाडीगोजेगावगोळेगावचिंचोलीचिमेगावचोंडी शहापूरजडगावजलालदाभाजलालपूरजवळाजामगव्हाणजोडपिंपरीटाकळगावढेगजतपोवनदुघाळातामटी तांडादरेगावदुरचुनादेवाळादेवाळादौडगावधारनांदखेडानांदगावनागझरीनागेशवाडीनालेगावनिशाणापांगरापार्डी सावळीपिंपळदरीपिंपळापुरजळपूरपोटापोटा खुर्दफुलदाभाबेरुळाबोरजाब्राह्मणवाडाभोसीमाथामार्डीमूर्तीजापूर सावंगीमेथायेडूतयेळीयेहळेगावरांजाळाराजदरीराजापूररामेश्वर [रामेश्वर १]रूपूरलक्ष्मणनाईक तांडालांडाळालाखलोहरा खुर्दलोहरा बुद्रूकवगरवाडीवगरवाडी तांडावडचुनावडदवसईवाळकीशिरड शहापूरशिरलासंमगानाईक तांडासारंगवाडीसाळणासावरखेडासावळी खूर्दसावळी बुद्रूकसिद्धेश्वरसुकापूरसुरेगावसूरवाडीसेंदूरसनासोनवाडीहिवरखेडाहिवराजाटू........ई.
चुका उधृत करा: "रामेश्वर" नावाच्या गटाकरिता <ref>
खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="रामेश्वर"/>
खूण मिळाली नाही.