इंग्लंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१६-१७

नोव्हेंबर २०१६ आणि जानेवारी २०१७ दरम्यान इंग्लंड क्रिकेट संघ पाच कसोटी, तीन एकदिवसीय आणि तीन टी२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारताचा दौरा केला.[१][२][३] भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ने जुलै २०१६ मध्ये दौऱ्याच्या तारखा जाहीर केल्या.[४] कसोटी मालिका समाप्त झाल्यानंतर इंग्लंडचा संघ मायदेशी परतला आणि एकदिवसीय सामन्यासाठी पुन्हा भारतात आला.[५]

इंग्लंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१६-१७
भारत
इंग्लड
तारीख९ नोव्हेंबर २०१६ – १ फेब्रुवारी २०१७
संघनायकविराट कोहलीअलास्टेर कुक (कसोटी)
आयॉन मॉर्गन (ए.दि. व टी२०)
कसोटी मालिका
निकालभारत संघाने ५-सामन्यांची मालिका ४–० जिंकली
सर्वाधिक धावाविराट कोहली (६५५)ज्यो रूट (४९१)
सर्वाधिक बळीरविचंद्रन अश्विन (२८)आदिल रशीद (२३)
मालिकावीरविराट कोहली (भा)
एकदिवसीय मालिका
निकालभारत संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावाकेदार जाधव (२३२)जासन रॉय (२२०)
सर्वाधिक बळीहार्दिक पंड्या (५)
जसप्रीत बुमराह (५)
ख्रिस वोक्स (६)
मालिकावीरकेदार जाधव (भा)
२०-२० मालिका
निकालभारत संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावासुरेश रैना (१०४)ज्यो रूट (१२६)
सर्वाधिक बळीयुझवेंद्र चहल (८)ख्रिस जॉर्डन (५)
मालिकावीरयुझवेंद्र चहल (भा)

भारताने इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी सुधारित डीआरएस पद्धत वापरण्यास सहमती दर्शवली.[६][७] २००८ मध्ये एकदा चाचणी केल्यानंतर पहिल्यांदाच भारताचा समावेश असलेल्या द्विपक्षीय मालिकेमध्ये डीआरएस प्रणाली वापरली गेली.[८] परंतू, हॉटस्पॉटचा वापर केला गेला नाही.[९]

सदर कसोटी मालिका ॲंथोनी डीमेलो चषकासाठी खेळवली गेली, ज्यामध्ये भारताने ५-सामन्यांची मालिका ४-० अशी जिंकली.[१०] मालिकेतील पाचव्या सामन्यात भारतीय संघाने ७ बाद ७५९ धावांवर डाव घोषित करून कसोटी क्रिकेटमधील त्यांची सर्वात मोठी धावसंख्या नोंदवली.[११] पाचव्या कसोटीतील विजयामुळे भारत सलग १८ कसोटी सामन्यांमध्ये अजिंक्य राहिला आणि स्वतःचा १७ कसोटी सामन्यांमध्ये अजिंक्य राहण्याचा विक्रम मोडला.[१२] त्याशिवाय भारताने एका वर्षात आतापर्यंतचे सर्वाधिक ९ कसोटी सामने जिंकले.[१२]

मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी संघ जाहीर होण्या आधी, महेंद्रसिंग धोणीने मर्यादित षटकांच्या क्रिकेट कर्णधार पदावरून पायउतार होत असल्याचे जाहीर केले.[१३][१४] टी२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी कर्णधार म्हणून विराट कोहलीची निवड करण्यात आली.[१५] भारतीय संघाचा कर्णधार म्हणून धोणीचा शेवटचा सामना होता इंग्लंड XI विरुद्ध १० जानेवारी २०१७ रोजी झालेला ५०-षटकांचा सामना.[१६]

एकदिवसीय मालिकेमध्ये तब्बल २०९० धावा केल्या गेल्या, तीन किंवा कमी सामन्यांच्या मालिकेमधील हा एक विक्रम आहे.[१७] सर्वच्या सर्व डावांमध्ये ३०० पेक्षा जास्त धावा नोंदवल्या गेल्या. भारताने एकदिवसीय आणि टी२० मालिका २-१ अशा जिंकल्या. इंग्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी२० मालिका जिंकण्याची ही भारताची पहिलीच वेळ.[१८]

संघ

कसोटीएकदिवसीयटी२०
 भारत[१९][२०]  इंग्लंड[२१][२२]  भारत[१५]  इंग्लंड[२३]  भारत[१५]  इंग्लंड[२३]

सराव सामने

५० षटके: भारत अ वि. इंग्लंड XI

१० जानेवारी २०१७
१३:३० (दि/रा)
धावफलक
भारत अ
३०४-४ (५० षटके)
वि
इंग्लंड XI
३०७-७ (४९.५ षटके)
अंबाती रायडू १०० (९७)
डेव्हिड विली २/५५ (१० षटके)
सॅम बिलिंग्स ९३ (८५)
कुलदीप यादव ५/६० (१० षटके)
इंग्लंड XI ३ गडी राखून विजयी
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: अनिल डांडेकर (भा) व पश्चिम पाठक (भा)


५० षटके: भारत अ वि. इंग्लंड XI

१२ जानेवारी २०१७
१३:३० (दि/रा)
धावफलक
इंग्लंड XI
२८२ (४८.५ षटके)
वि
भारत अ
२८३/४ (३९.४ षटके)
जॉनी बेरस्टो ६४ (६५)
परवेझ रसूल ३/३८ (१० षटके)
भारत अ ६ गडी आणि ६२ चेंडू राखून विजयी
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: अनिल डांडेकर (भा) व पश्चिम पाठक (भा)
  • नाणेफेक : इंग्लंड XI, फलंदाजी
  • प्रत्येकी १२ खेळाडू (११ फलंदाज, ११ क्षेत्ररक्षक)


कसोटी मालिका

१ली कसोटी

९-१३ नोव्हेंबर २०१६
९:३०
धावफलक
वि
५३७ (१५९.३ षटके)
बेन स्टोक्स १२८ (२३५)
रवींद्र जडेजा ३/८६ (३० षटके)
४८८ (१६२ षटके)
मुरली विजय १२६ (३०१)
आदिल रशीद ४/११४ (३१ षटके)
२६०/३घो (७५.३ षटके)
अलास्टेर कुक १३० (२४३)
अमित मिश्रा २/६० (१३ षटके)
१७२/६ (५२.३ षटके)
विराट कोहली ४९*(९८)
आदिल रशीद ३/६४ (१४.३ षटके)
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
  • कसोटी पदार्पण: हसीब हमीद (इं).
  • हसीब हमीद हा इंग्लंडचा सर्वात कमी वयाचा कसोटी सलामीवीर ठरला.[३८]
  • ह्या मैदानावरील हा पहिलाच कसोटी सामना.
  • स्टुअर्ट ब्रॉडची (इं) ही १०० वी कसोटी.[३९]
  • अलास्टेर कुक, इंग्लंडच्या क्रिकेट संघाचे सर्वात जास्त ५५ कसोटीत नेतृत्व करणारा खेळाडू ठरला.[४०]
  • अलास्टेर कुकचे इंग्लंडच्या दुसऱ्या डावातील शतक हे त्याचे भारतातील पाचवे, आणि कोणत्याही पाहुण्या खेळाडूची सर्वात जास्त शतके.[४१]
  • कर्णधार म्हणून अलास्टेर कुकचे १२वे शतक, इंग्लंडच्या कर्णधारांतर्फे त्याने सर्वात जास्त शतकांचा विक्रम केला.[४२]

२री कसोटी

१७-२१ नोव्हेंबर २०१६
९:३०
धावफलक
वि
४५५ (१२९.४ षटके)
विराट कोहली १६७ (२६७)
जेम्स ॲंडरसन ३/६२ (२० षटके)
२५५ (१०२.५ षटके)
बेन स्टोक्स ७० (१५७)
रविचंद्रन अश्विन ५/६७ (२९.५ षटके)
२०४ (६३.१ षटके)
विराट कोहली ८१ (१०९)
स्टुअर्ट ब्रॉड ४/३३ (१४ षटके)
१५८ (९७.३ षटके)
अलास्टेर कुक ५४ (१८८)
जयंत यादव ३/३० (११.३ षटके)
भारत २४६ धावांनी विजयी
एसीए-व्हिडीसीए क्रिकेट मैदान, विशाखापट्टणम
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: विराट कोहली (भा)

३री कसोटी

२६-३० नोव्हेंबर २०१६
९:३०
धावफलक
वि
२८३ (९३.५ षटके)
जॉनी बेरस्टो ८९ (१७७)
मोहम्मद शमी ३/६३ (२१.५ षटके)
४१७ (१३८.२ षटके)
रवींद्र जडेजा ९० (१७०)
बेन स्टोक्स ५/७३ (२६.२ षटके)
२३६ (९०.२ षटके)
ज्यो रूट ७८ (१७९)
रविचंद्रन अश्विन ३/८१ (२६.२ षटके)
१०४/२ (२०.२ षटके)
पार्थिव पटेल ६७* (५४)
ख्रिस वोक्स १/१६ (२ षटके)
भारत ८ गडी राखून विजयी
पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली
पंच: मराईस इरास्मुस (द) आणि ख्रिस गाफने (न्यू)
सामनावीर: रवींद्र जडेजा (भा)
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी
  • कसोटी पदार्पण: करुण नायर (भा)
  • पार्थिव पटेल हा दोन कसोटी सामन्यांच्या दरम्यान सर्वात जास्त (८३) कसोटी सामन्यांना मुकणारा भारतीय क्रिकेट खेळाडू ठरला.[४५]

४थी कसोटी

८-१२ डिसेंबर २०१६
९:३०
धावफलक
वि
४०० (१३०.१ षटके)
किटन जेनिंग्स ११२ (२१९)
रविचंद्रन अश्विन ६/११२ (४४ षटके)
६३१ (१८२.३ षटके)
विराट कोहली २३५ (३४०)
आदिल रशीद ४/१९२ (५५.३ षटके)
१९५ (५५.३ षटके)
ज्यो रूट ७७ (११२)
रविचंद्रन अश्विन ६/५५ (२०.३ षटके)
भारत १ डाव आणि ३६ धावांनी विजयी
वानखेडे मैदान, मुंबई
पंच: ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ) आणि पॉल रायफेल (ऑ)
सामनावीर: विराट कोहली (भा)
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी
  • कसोटी पदार्पण: किटन जेनिंग्स (इं).
  • पहिल्या दिवशी भुवनेश्वर कुमारने क्षेत्ररक्षण करताना फेकलेला चेंडू लागून मैदानावरील पंच पॉल रायफेल यांना दुखापत झाल्याने, त्यांच्या जागी मराईस इरास्मुस यांनी पंचगिरी केली आणि चेट्टीतोडी शमशुद्दीन यांनी तिसऱ्या पंचांची भूमिका केली.[४६][४७]
  • पदार्पणात कसोटौ शतक झळकावणारा किटन जेनिंग्स हा इंग्लंडचा पाचवा सलामीवीर तर कसोटी इतिहासातील ६९वा फलंदाज.[४८] त्याच्या ११२ धावा ह्या भारताविरुद्ध कसोटी पदार्पणात सलामीवीरातर्फे सर्वाधिक धावा.[४९]
  • विराट कोहलीच्या (भा) ४,००० आणि कर्णधार म्हणून २,००० कसोटी धावा पूर्ण. तसेच भारतीय कर्णधार म्हणून आणि इंग्लंड विरुद्ध भारतातर्फे सर्वाधिक वैयक्तिक धावासंख्येचा विक्रम.[५०][५१]
  • जयंत यादवचे (भा) पहिले शतक आणि नवव्या क्रमांकावरील भारतीय फलंदाज म्हणून पहिलेच शतक.[५१]
  • रविंद्र जडेजा (भा) चे १०० कसोटी बळी पूर्ण.[५२]
  • भारताची त्यांच्या सलग १७ कसोटी सामन्यांमध्ये अपराजित राहण्याच्या विक्रमाशी बरोबरी (१७ कसोटी).[५३]
  • भारताची त्यांच्या सलग ५ कसोटी मालिका जिंकण्याच्या विक्रमाशी बरोबरी.[५३]

५वी कसोटी

१६-२० डिसेंबर २०१६
९:३०
धावफलक
वि
४७७ (१५७.२ षटके)
मोईन अली १४६ (२६२)
रविंद्र जडेजा ३/१०६ (४५ षटके)
७५९/७घो (१९०.४ षटके)
करुण नायर ३०३* (३८१)
स्टुअर्ट ब्रॉड २/८० (२७ षटके)
२०७ (८८ षटके)
किटन जेनिंग्स ५४ (१२१)
रविंद्र जडेजा ७/४८ (२५ षटके)
भारत १ डाव आणि ७५ धावांनी विजयी
एम.ए. चिदंबरम मैदान, चेन्नई
पंच: मराईस इरास्मुस (द) आणि सायमन फ्रे (ऑ)
सामनावीर: करुण नायर (भा)
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
  • कसोटी पदार्पण: लियाम डॉसन (इं)
  • अलास्टेर कुक (इं) हा कसोटी क्रिकेटमध्ये ११,००० धावा पूर्ण करणारा दहावा आणि सर्वात लहान खेळाडू.[५४]
  • करुण नायर (भा) हा पहिल्या कसोटी शतकाचे त्रिशतकात रुपांतर करणारा पहिला भारतीय फलंदाज. तसेच कसोटी त्रिशतक करणारा दुसरा भारतीय आणि त्याच्या नाबाद ३०३ धावा ह्या इंग्लंडविरुद्ध भारतीय फलंदाजाच्या सर्वात जास्त धावा तसेच कसोटी क्रिकेटमधील भारतीय फलंदाजातर्फे तिसरी सर्वात मोठी वैयक्तिक धावसंख्या.[५५]
  • पहिल्या डावातील भारताची धावसंख्या ही कसोटी क्रिकेटमधील भारतातर्फे सर्वात मोठी धावसंख्या, तसेच इंग्लंडविरुद्ध कोणत्याही संघातर्फे सर्वोच्च धावसंख्या[५५][५६]
  • रविंद्र जडेजाचे (भा) कसोटी सामन्यामध्ये पहिल्यांदाच बळी.[१०]
  • भारतीय संघाने सलग १८ कसोटी सामन्यांमध्ये अजिंक्य राहून स्वतःचा विक्रम मोडला.[१२]

एकदिवसीय मालिका

१ला सामना

१५ जानेवारी २०१७
१४:३० (दि/रा)
धावफलक
इंग्लंड 
३५०/७ (५० षटके)
वि
 भारत
३५६/७ (४८.१ षटके)
विराट कोहली १२२ (१०५)
जेक बॉल ३/६७ (१० षटके)
भारत ३ गडी व ११ चेंडू राखून विजयी
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान, पुणे
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि सी.के.नंदन (भा)
सामनावीर: केदार जाधव (भा)
  • नाणेफेक : भारत, गोलंदाजी
  • बेन स्टोक्स हा इंग्लंडतर्फे भारतामध्ये सर्वात जलद एकदिवसीय अर्धशतक करणारा फलंदाज ठरला.[५७]
  • इंग्लंडची भारतामध्ये आणि भारताविरुद्ध सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय धावसंख्या.[५७]
  • विराट कोहलीचे (भा) यशस्वी पाठलाग करताना १५वे एकदिवसीय शतक, कोणत्याही फलंदाजातर्फे हा एक विक्रम आहे.[५७]
  • भारताची धावसंख्या ही इंग्लंडविरुद्ध कोणत्याही संघाची यशस्वी पाठलाग करताना सर्वात मोठी धावसंख्या.[५८]

२रा सामना

१९ जानेवारी २०१७
१४:३० (दि/रा)
धावफलक
भारत 
३८१/६ (५० षटके)
वि
 इंग्लंड
३६६/८ (५० षटके)
युवराज सिंग १५० (१२७)
ख्रिस वोक्स ४/६० (१० षटके)
आयॉन मॉर्गन १०२ (८१)
रविचंद्रन अश्विन ३/६५ (१० षटके)
भारत १५ धावांनी विजयी
बाराबती मैदान, कटक
पंच: अनिल चौधरी (भा) आणि रुचिरा पल्लियागुरूगे (श्री)
सामनावीर: युवराज सिंग (भा)
  • नाणेफेक : इंग्लंड, गोलंदाजी
  • इंग्लंडची भारताविरुद्ध सर्वोच्च धावसंख्या, त्यांची पाठलाग करताना सर्वोच्च धावसंख्या आणि एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात मोठा अयशस्वी पाठलाग[५९]
  • महेंद्रसिंग धोणी आणि युवराजसिंग यांची २५६ धावांची भागीदारी ही इंग्लंडविरुद्ध भारताची सर्वोच्च भागीदारी.
  • महेंद्रसिंग धोणीचे इंग्लंडविरुद्ध पहिले शतक.
  • जेव्हा इंग्लंडच्या संघाच्या ३६० धावा झाल्या, ती वेळ ही कोणत्याही संघाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३५० पेक्षा जास्त धावा करण्याची १००वी वेळ होती[६०]
  • षटकांची गती कमी राखल्याने इंग्लंडच्या संघाला सामन्याच्या मानधनाच्या १०% तर कर्णधार आयॉन मॉर्गनला २०% दंड ठोठावण्यात आला.[६१]

३रा सामना

२२ जानेवारी २०१७
१४:३० (दि/रा)
धावफलक
इंग्लंड 
३२१/८ (५० षटके)
वि
 भारत
३१६/९ (५० षटके)
जेसन रॉय ६५ (५६)
हार्दीक पंड्या ३/४९ (१० षटके)
केदार जाधव ९० (७५)
बेन स्टोक्स ३/६३ (१० षटके)
इंग्लंड ५ धावांनी विजयी
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: अनिल चौधरी (भा) आणि कुमार धर्मसेना (श्री)
सामनावीर: बेन स्टोक्स (इं)
  • नाणेफेक : भारग, गोलंदाजी
  • विराट कोहलीच्या (भा) कर्णधार म्हणून सर्वात कमी डावांमध्ये १,००० धावा पूर्ण (१७ डाव).[१७]

टी२० मालिका

१ला सामना

२६ जानेवारी २०१७
१६:३० (दि/रा)
धावफलक
भारत 
१४७/७ (२० षटके)
वि
 इंग्लंड
१४८/३ (१८.१ षटके)
महेंद्रसिंग धोणी ३६* (२७)
मोईन अली २/२१ (४ षटके)
आयॉन मॉर्गन ५१ (३८)
युझवेंद्र चहल २/२७ (४ षटके)
इंग्लंड ७ गडी व ११ चेंडू राखून विजयी
ग्रीन पार्क मैदान, कानपूर
पंच: अनिल चौधरी (भा) आणि नितीन मेनन (भा)
सामनावीर: मोईन अली (इं)
  • नाणेफेक : इंग्लंड, गोलंदाजी
  • आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण: परवेझ रसूल (भा)
  • नितीन मेनन (भा) यांचा पंच म्हणून पहिला टी२० सामना.
  • विराट कोहलीचा (भा) कर्णधार म्हणून पहिला टी२० सामना[६२]
  • ह्या मैदानावरील पहिलाच आंतरराष्ट्रीय टी२० सामना[६२]
  • आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये १,५०० धावा करणारा, आयॉन मॉर्गन हा इंग्लंडचा पहिलाच फलंदाज.[६३]

२रा सामना

२९ जानेवारी २०१७
१९:०० (दि/रा)
धावफलक
भारत 
१४४/८ (२० षटके)
वि
 इंग्लंड
१३९/६ (२० षटके)
लोकेश राहुल ७१ (४७)
ख्रिस जॉर्डन ३/२२ (४ षटके)
बेन स्टोक्स ३८ (२७)
आशिष नेहरा ३/२८ (४ षटके)
भारत ५ धावांनी विजयी
विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूर
पंच: अनिल चौधरी (भा) आणि सी.के. नंदन (भा)
सामनावीर: जसप्रीत बुमराह (भा)
  • नाणेफेक : इंग्लंड, गोलंदाजी.

३रा सामना

१ फेब्रुवारी २०१७
१९:०० (दि/रा)
धावफलक
भारत 
२०२/६ (२० षटके)
वि
 इंग्लंड
१२७ (१६.३ षटके)
सुरेश रैना ६३ (४५)
लियाम प्लंकेट १/२२ (२ षटके)
ज्यो रूट ४२ (३७)
युझवेंद्र चहल ६/२५ (४ षटके)
भारत ७५ धावांनी विजयी
एम. चिन्नास्वामी मैदान, बंगळूर
पंच: अनिल चौधरी (भा) आणि नितीन मेनन (भा)
सामनावीर: युझवेंद्र चहल (भा)
  • नाणेफेक : इंग्लंड, गोलंदाजी
  • आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण: रिषभ पंत (भा). भारतातर्फे आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण करणारा तो सर्वात तरुण खेळाडू.[१८]
  • टी२० मध्ये पाच बळी घेणारा युझवेंद्र चहल हा भारताचा पहिलाच गोलंदाज. त्याची गोलंदाजीतील कामगिरी ही आंतरराष्ट्रीय टी२० मधील तिसरी सर्वोत्तम कामगिरी होय.[१८]
  • टी२० अर्धशतक करण्यासाठी भारताच्या महेंद्रसिंग धोणीला सर्वात जास्त (६२) डाव खेळावे लागले.[६४]
  • इंग्लंडच्या संघाचे ८ फलंदाज अवघ्या ८ धावांत बाद झाले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासातील ही दुसरी सर्वात वाईट कामगिरी आहे.[१८]


संदर्भ आणि नोंदी

बाह्य दुवे


इंग्लंड क्रिकेट संघाचे भारत दौरे
१९२६-२७ | १९३३-३४ | १९५१-५२ | १९६१-६२ | १९६३-६४ | १९७२-७३ | १९७६-७७ | १९७९-८० | १९८१-८२ | १९८४-८५ | १९९२-९३ | २००१-०२ | २००५-०६ | २००८-०९ | २०११ | २०१२-१३ | २०१६-१७
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत