अरुण जेटली स्टेडियम

भारतातील नवी दिल्लीच्या बहादूर शाह झाफर मार्ग येथे अरुण जेटली क्रिकेट मैदान (पुर्वीचे फिरोजशहा कोटला मैदान) वसलेले आहे.[२] मैदानाची स्थापन १८८३ मध्ये झाली कोलकाता येथील इडन गार्डन्स नंतर, सध्या चालू स्थितीतील ते भारतातील दुसरे मैदान आहे. २०१६ पर्यंत, शेवटची कसोटी सामन्यांमध्ये २८ वर्षे आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये १० वर्षे या मैदानावर भारतीय क्रिकेट संघ अजिंक्य राहिला आहे.[३] अनिल कुंबळेचे पाकिस्तानविरुद्ध एका कसोटी डावातील १० बळी, सुनील गावसकरला मागे टाकून ३५ शतकांसह सचिन तेंडुलकरचा सर्वाधिक कसोटी शतके करण्याचा विक्रम आणि त्या आधी डॉन ब्रॅडमनचा सर्वाधिक २९ कसोटी शतकांच्या विक्रमाशी गावसकरने केलेली बरोबरी अशा उल्लेखनीय घटनांमुळे हे मैदान लक्षात राहते.

फिरोजशाह कोटला मैदान
मैदान माहिती
स्थानबहादूर शहा झाफर मार्ग, दिल्ली
गुणक28°38′16″N 77°14′35″E / 28.63778°N 77.24306°E / 28.63778; 77.24306 77°14′35″E / 28.63778°N 77.24306°E / 28.63778; 77.24306
स्थापना१८८३[१]
आसनक्षमता४८,०००[२]
मालकदिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशन
प्रचालकदिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशन
यजमानभारतीय क्रिकेट संघ
दिल्ली क्रिकेट संघ
दिल्ली डेरडेव्हिल्स

आंतरराष्ट्रीय माहिती
प्रथम क.सा.१०-१४ नोव्हेंबर १९४८:
भारत  वि. वेस्ट इंडीज
अंतिम क.सा.३-७ डिसेंबर २०१५:
भारत  वि. दक्षिण आफ्रिका
प्रथम ए.सा.१५ सप्टेंबर १९८२:
भारत वि. श्रीलंका
अंतिम ए.सा.२० ऑक्टोबर २०१६:
भारत वि. न्यू झीलंड
प्रथम २०-२०२३ मार्च २०१६:
अफगाणिस्तान वि. इंग्लंड
अंतिम २०-२०३० मार्च २०१६:
इंग्लंड वि. न्यू झीलंड
शेवटचा बदल १ जानेवारी २०१७
स्रोत: इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर)

इतिहास

भारत आणि वेस्ट इंडीज दरम्यान १० नोव्हेंबर १९४८ रोजी झालेला कसोटी सामना, हा ह्या मैदानावरचा पहिला कसोटी सामना होता. मैदानाचे मालकी आणि व्यवस्थापकिय हक्क डीडीसीए (दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशन) कडे आहेत. १९५२ मध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळताना हेमू अधिकारी आणि गुलाम अहमद यांनी दहाव्या गड्यासाठी १०९ धावांची भागीदारीचा ह्या मैदानातील विक्रम आजपर्यंत अबाधित आहे. १९६५ मध्ये, श्रीनिवास वेंकटराघवनने त्याच्या पदार्पणातील मालिकेमध्ये न्यू झीलंडच्या फलंदाजीला खिंडार पाडताना ७२ धावांत ८ आणि ८० धावांत ४ गडी बाद केले होते. १९६९-७० मध्ये, बिशनसिंग बेदी आणि एरापल्ली प्रसन्ना ह्या फिरकी जोडीने १८ बळी घेऊन ऑस्ट्रेलियाविरुद्ध संघाला ७ गड्यांनी सुप्रसिद्ध विजय विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.[४]१९८१ मध्ये, जेफ्री बॉयकॉटने गॅरी सोबर्सचा सर्वाधिक कसोटी धावांचा विक्रम मोडला. १९८-८४ मध्ये सुनील गावसकरने त्याचे २९वे शतक ठोकून डॉन ब्रॅडमनचा सर्वाधिक काळासाठी अबाधित असलेला सर्वात जास्त कसोटी शतकांच्या विक्रमाशी बरोबरी केली. १९९९-२००० मध्ये, पाकिस्तान विरुद्ध कसोटीच्या चवथ्या डावात ७४ धावांत १० बळी घेऊन एका डावात १० बळी घेणारा अनिल कुंबळे हा जिम लेकर नंतर दुसरा गोलंदाज ठरला. २००५-०६ मध्ये ह्याच मैदानावर सचिन तेंडुलकरने गावस्करचा सर्वाधिक ३५ कसोटी शतकांचा विक्रम मोडला.[४]२७ डिसेंबर २००९ रोजी, सामना खेळवण्यास खेळपट्टी योग्य नसल्या कारणाने भारत आणि श्रीलंकेदरम्यानचा सामना रद्द करण्यात आला. सामनाधिकाऱ्याच्या सामना अहवालावरुन, आयसीसीने मैदानावर १२ महिन्यांचा निर्बंध लादला. त्यानंतर थेट २०११ क्रिकेट विश्वचषकासाठी मैदानाची निवड करण्यात आली.[५] २००८ पासून सदर मैदान हे भारतीय प्रीमियर लीगचा संघ दिल्ली डेरडेव्हिल्सचे होम ग्राऊंड आहे.[४]

आकडेवारी

फिरोज शाह कोटला – वेस्ट इंडीज वि दक्षिण आफ्रिका
फिरोज शाह कोटला मैदान

कसोटी क्रिकेट

  • सर्वाधिक सांघिक धावसंख्या: वेस्ट इंडीज ६४४/८घो वि भारत, ६ फेब्रुवारी १९५९[६]
  • सर्वात निचांकी सांघिक धावसंख्या: भारत ७५ वि वेस्ट इंडीज, २५ नोव्हेंबर १९८७[७]
  • सर्वाधिक धावा: सचिन तेंडुलकर (७५९ धावा)
  • सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या: बर्ट सुटक्लिफ २३०* वि भारत, १६ डिसेंबर १९५५
  • सर्वात यशस्वी गोलंदाज: अनिल कुंबळे (५८ बळी)

एकदिवसीय क्रिकेट

आंतरराष्ट्रीय सामन्यांची यादी

कसोटी

आजवर मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[९]:

दिनांकसंघ १संघ २विजयी संघफरकधावफलक
१०-१४ नोव्हेंबर १९४८  भारत  वेस्ट इंडीजअनिर्णितधावफलक
२-७ नोव्हेंबर १९५१  भारत  इंग्लंडअनिर्णितधावफलक
१६-१८ ऑक्टोबर १९५२  भारत  पाकिस्तान  भारत१ डाव आणि ७० धावाधावफलक
१६-२१ डिसेंबर १९५५  भारत  न्यूझीलंडअनिर्णितधावफलक
६-११ फेब्रुवारी १९५९  भारत  वेस्ट इंडीजअनिर्णितधावफलक
१२-१६ डिसेंबर १९५९  भारत  ऑस्ट्रेलिया  ऑस्ट्रेलिया१ डाव आणि १२७ धावाधावफलक
८-१३ फेब्रुवारी १९६१  भारत  पाकिस्तानअनिर्णितधावफलक
१३-१८ डिसेंबर १९६१  भारत  इंग्लंडअनिर्णितधावफलक
८-१३ फेब्रुवारी १९६४  भारत  इंग्लंडअनिर्णितधावफलक
१९-२२ मार्च १९६५  भारत  न्यूझीलंड  भारत७ गडीधावफलक
२८ नोव्हेंबर-२ डिसेंबर १९६९  भारत  ऑस्ट्रेलिया  भारत७ गडीधावफलक
२०-२५ डिसेंबर १९७२  भारत  इंग्लंड  इंग्लंड६ गडीधावफलक
११-१५ डिसेंबर १९७४  भारत  वेस्ट इंडीज  वेस्ट इंडीज१ डाव आणि १७ धावाधावफलक
१७-२२ डिसेंबर १९७६  भारत  इंग्लंड  इंग्लंड१ डाव आणि २५ धावाधावफलक
२४-२९ जानेवारी १९७९  भारत  वेस्ट इंडीजअनिर्णितधावफलक
१३-१८ ऑक्टोबर १९७९  भारत  ऑस्ट्रेलियाअनिर्णितधावफलक
४-९ डिसेंबर १९७९  भारत  पाकिस्तानअनिर्णितधावफलक
२३-२८ डिसेंबर १९८१  भारत  इंग्लंडअनिर्णितधावफलक
२९ ऑक्टोबर -३ नोव्हेंबर १९८३  भारत  वेस्ट इंडीजअनिर्णितधावफलक
१२-१७ डिसेंबर १९८४  भारत  इंग्लंड  इंग्लंड८ गडीधावफलक
२६-३० सप्टेंबर १९८६  भारत  ऑस्ट्रेलियाअनिर्णितधावफलक
२५-२९ नोव्हेंबर १९८७  भारत  वेस्ट इंडीज  वेस्ट इंडीज५ गडीधावफलक
१३-१७ मार्च १९९३  भारत  झिम्बाब्वे  भारत१ डाव आणि १३ धावाधावफलक
१०-१३ ऑक्टोबर १९९६  भारत  ऑस्ट्रेलिया  भारत७ गडीधावफलक
४-७ फेब्रुवारी १९९९  भारत  पाकिस्तान  भारत२१२ धावाधावफलक
१८-२२ नोव्हेंबर २०००  भारत  झिम्बाब्वे  भारत७ गडीधावफलक
२८ फेब्रुवारी-४ मार्च २००२  भारत  झिम्बाब्वे  भारत४ गडीधावफलक
१०-१४ डिसेंबर २००५  भारत  श्रीलंका  भारत१८८ धावाधावफलक
२२-२६ नोव्हेंबर २००७  भारत  पाकिस्तान  भारत६ गडीधावफलक
२९ ऑक्टोबर-२ नोव्हेंबर २००८  भारत  ऑस्ट्रेलियाअनिर्णितधावफलक
६-९ नोव्हेंबर २०११  भारत  वेस्ट इंडीज  भारत५ गडीधावफलक
२२-२४ मार्च २०१३  भारत  ऑस्ट्रेलिया  भारत६ गडीधावफलक
३-७ डिसेंबर २०१५  भारत  दक्षिण आफ्रिका  भारत३३७ धावाधावफलक

एकदिवसीय

आजवर मैदानावर झालेल्या एकदिवसीय सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[१०]:

दिनांकसंघ १संघ २विजयी संघफरकधावफलक
१५ सप्टेंबर १९८२  भारत  श्रीलंका  भारत६ गडीधावफलक
०२ ऑक्टोबर १९८६  भारत  ऑस्ट्रेलिया  भारत३ गडीधावफलक
१३ जानेवारी १९८७  भारत  श्रीलंका  भारत६ गडीधावफलक
२२ ऑक्टोबर १९८७  भारत  ऑस्ट्रेलिया  भारत५६ धावाधावफलक
१५ ऑक्टोबर १९८९  इंग्लंड  श्रीलंका  इंग्लंड५ गडीधावफलक
२३ ऑक्टोबर १९८९  भारत  वेस्ट इंडीज  वेस्ट इंडीज२० धावाधावफलक
०३ नोव्हेंबर १९९४  भारत  न्यूझीलंड  भारत१०७ धावाधावफलक
०२ मार्च १९९६  भारत  श्रीलंका  श्रीलंका६ गडीधावफलक
११ एप्रिल १९९८  ऑस्ट्रेलिया  झिम्बाब्वे  ऑस्ट्रेलिया१६ धावाधावफलक
१४ एप्रिल १९९८  भारत  ऑस्ट्रेलिया  ऑस्ट्रेलिया४ गडीधावफलक
१७ नोव्हेंबर १९९९  भारत  न्यूझीलंड  भारत७ गडीधावफलक
३१ जानेवारी २००२  भारत  इंग्लंड  इंग्लंड२ धावाधावफलक
१७ एप्रिल २००५  भारत  पाकिस्तान  पाकिस्तान१५९ धावाधावफलक
२८ मार्च २००६  भारत  इंग्लंड  भारत३९ धावाधावफलक
०२ डिसेंबर २००८  भारत  इंग्लंडसामना रद्दधावफलक
३१ ऑक्टोबर २००९  भारत  ऑस्ट्रेलिया  भारत६ गडीधावफलक
२७ डिसेंबर २००९  भारत  श्रीलंकाअनिर्णितधावफलक
२४ फेब्रुवारी २०११  दक्षिण आफ्रिका  वेस्ट इंडीज  दक्षिण आफ्रिका७ गडीधावफलक
२८ फेब्रुवारी २०११  नेदरलँड्स  वेस्ट इंडीज  वेस्ट इंडीज२१५ धावाधावफलक
०७ मार्च २०११  कॅनडा  केन्या  कॅनडा५ गडीधावफलक
०९ मार्च २०११  भारत  नेदरलँड्स  भारत५ गडीधावफलक
१७ ऑक्टोबर २०११  भारत  इंग्लंड  भारत८ गडीधावफलक
०६ जानेवारी २०१३  भारत  पाकिस्तान  भारत१० धावाधावफलक
११ ऑक्टोबर २०१४  भारत  वेस्ट इंडीज  भारत४८ धावाधावफलक
२० ऑक्टोबर २०१६  भारत  न्यूझीलंड  न्यूझीलंड६ धावाधावफलक

टी२०

आजवर मैदानावर झालेल्या आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[११]:

दिनांकसंघ १संघ २विजयी संघफरकधावफलक
२३ मार्च २०१६Afghanistan  इंग्लंड  इंग्लंड१५ धावाधावफलक
२६ मार्च २०१६  इंग्लंड  श्रीलंका  इंग्लंड१० धावाधावफलक
२८ मार्च २०१६  दक्षिण आफ्रिका  श्रीलंका  दक्षिण आफ्रिका८ गडीधावफलक
३० मार्च २०१६  इंग्लंड  न्यूझीलंड  इंग्लंड७ गडीधावफलक

संदर्भ आणि नोंदी

बाह्यदुवे

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत