अबू बक्र

(अबु बकर या पानावरून पुनर्निर्देशित)

अबू बक्र अस्-सिद्दिक (अब्दल्ला इब्न अबी कहाफा) (अरबी : أبو بكر الصديق or عبد الله بن أبي قحافة) (५७३ - ऑगस्ट २३, ६३४) हा इस्लाम धर्माचा प्रेषित मोहम्मद पैगंबराचा मित्र व जवळचा सल्लागार, पाठिराखा होता. पैगंबरानंतर त्याच्या राजकीय व संघटनात्मक कार्याचा कारभार अबू बक्राने सांभाळला. रूढ लोकसमजुतीनुसार अबू बक्र इस्लामाचा पहिला पुरुष अनुयायी मानला जातो; मात्र या समजुतीच्या ऐतिहासिक सत्यतेबद्दल इतिहासकारांमध्ये एकमत नाही. सत्याची पाठराखण करण्याच्या गुणविशेषावरून पैगंबराने त्याला 'अस्-सिद्दिक' (अर्थ : खरा) हा किताब बहाल केला. पैगंबराच्या निधनानंतर तो पहिला मुस्लिम राज्यकर्ता (६३२ - ६३४) झाला. सुन्नी इस्लामानुसार तो राशिदुनांपैकी (अर्थ : उपदिष्ट खलिफे) पहिला होता. शिया इस्लामानुसार मात्र तो राजकीय संधिसाधू मानला जातो. अबू बक्राची खिलाफत दोन वर्षे व तीन महिने चालली. या काळात त्याने इस्लामी राज्याची बांधणी केली. पैगंबराच्या निधनानंतर ज्या अरब टोळ्यांनी इस्लामी मताविरुद्ध बंड पुकारले होते, त्यांच्याविरुद्ध त्याने रिद्दा युद्धे लढून संपूर्ण अरबी द्वीपकल्प जिंकला व इस्लामाच्या अमलाखाली आणला. त्याने सास्सानी पर्शियन साम्राज्यावर व बायझंटाइन साम्राज्यावर आक्रमण करून वर्तमान सीरियाइराकाचा भूप्रदेश काबीज केला. त्याच्याच कारकीर्दीत कुराणातील वचनांचे वर्तमानातील प्रचलित स्वरूपामध्ये संकलन केले गेले.

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत