अन्वर हुसेन

महाराष्ट्रातील चित्रकार

अन्वर हुसेन (जन्म:मे २०, १९७५, बुधगाव - ) हे महाराष्ट्रातील चित्रकार आहेत. त्यांनी विशेषतः ॲक्रिलिक माध्यमात चित्रे काढलेली आहेत. तसेच तैलरंग, जलरंग या माध्यमातसुद्धा ते काम करतात. त्यांच्या चित्रात रचनेतील साधेपणा, पर्स्पेक्टिव्हवरची पकड, रेखाटनाची अचूकता, तंत्रशुद्धता आणि भावपूर्णता दिसते. अन्वर हुसेन यांची चित्रे वास्तववादी शैलीशी नाते सांगणारी पण निव्वळ वास्तववादी शैलीच्या पलीकडे जाणारी आहेत.[१]

अन्वर हुसेन

पूर्ण नावअन्वर हुसेन
जन्ममे २०, १९७५
बुधगाव, सांगली जिल्हा, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्वभारतीय
कार्यक्षेत्रचित्रकला, रेखाटन
चित्र रंगवताना

पार्श्वभूमी

इस्लामपूर येथे वास्तव्य असलेल्या अन्वर यांच्या आई शिक्षिका आणि वडील प्राध्यापक आहेत. वडिलांना कविता, संगीत, शेरोशायरी, वाचन इ.ची आवड असल्यामुळे या वातावरणाचा प्रभाव अन्वर यांच्यावर पडला.

शिक्षण

अन्वर यांनी सांगलीच्या कलाविश्व महाविद्यालयातून जी.डी. आर्टची पदविका घेतलेली आहे.[ संदर्भ हवा ]

अन्वर हुसेन आपल्या काही चित्रांसह

प्रदर्शने

अन्वर हुसेन यांच्या चित्रांची आत्तापर्यंत ९ एकल (सोलो शो) प्रदर्शने झाली आहेत.[ संदर्भ हवा ] ती अशी :-

  • 'नॉस्टल्जिया', इंडिया आर्ट गॅलरी, पुणे, २००३
  • 'गोवन ऱ्हॅप्सोडी, इंडिया आर्ट गॅलरी, पुणे, २००४
  • 'पास्ट प्रेझेंट पोर्ट्रेट्स, इंडिया आर्ट गॅलरी, पुणे, २००६
  • 'अलमिराज', कपाटे या विषयावरची चित्रमालिका, जहांगीर आर्ट गॅलरी, मुंबई, २००८
  • 'मेमरीज', इंडिया आर्ट गॅलरी, पुणे, २०१०
  • 'व्हिस्परिंग सायलेन्स', नेहरू सेंटर आर्ट गॅलरी, मुंबई, २०१०
  • 'मुंबई डायरी' मुंबईतील अनुभवांवर आधारित चित्रमालिका, जहांगीर आर्ट गॅलरी, मुंबई, २०१३
  • फेसबुकवर 'हायवेपलीकडच्या गावात' हे डिजिटल चित्र प्रदर्शन, २०१५ [२]
  • 'रोड स्टोरीज', जहांगीर आर्ट गॅलरी, मुंबई, २०१७
  • 'रोड स्टोरीज' आर्ट टुडे, पुणे,
  • 'द सिम्फनी ऑफ टाइम' - या चित्रमालिकेचं प्रदर्शन , मे 2023 - जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई.

२०१८[३]

अन्वर हुसेन आपल्या काही चित्रांसह

पुस्तकांची मुखपृष्ठे आणि रेखाचित्रे[ संदर्भ हवा ]

अन्वर हुसेन यांनी अनेक पुस्तकांची मुखपृष्ठे आणि पुस्तकांतली रेखाचित्रे केली आहेत. त्यापैकी काही पुस्तके :-

  • फ्रॅग्रन्स ऑफ अर्थ - या बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांच्या इंग्रजी अनुवादाच्या पुस्तकासाठी रेखाचित्रे आणि मुखपृष्ठ[४]
  • गावगाडा, लेखक- त्रिंबक नारायण आत्रे या पुस्तकाच्या शताब्दी आवृत्तीसाठी रेखाचित्रे[५]
  • लस्ट फॉर लालबाग, लेखक: विश्वास पाटील या कादंबरीचे मुखपृष्ठ आणि आतील रेखाचित्रे
  • जू या ऐश्वर्य पाटेकर यांच्या आत्मकथनाच्या पुस्तकासाठी मुखपृष्ठ आणि रेखाचित्रे
  • अनुभव या मराठी मासिकात २०१८ साली वर्षभर मुखपृष्ठ आणि त्या चित्रांबद्दल ' कॅनव्हासमागचे रंग' हे सदर लेखन
  • विश्राम गुप्ते यांच्या ऊन, ढग या कादंबऱ्यांसाठी मुखपृष्ठ.
  • ऋषिकेश गुप्ते यांच्या रोहन प्रकाशन द्वारे प्रकाशित गोठण्यातल्या गोष्टी या पुस्तकासाठी मुखपृष्ठ आणि रेखाटने.
  • अनंत सामंत यांच्या रोहन प्रकाशन द्वारे प्रकाशित दृष्टी, माईन फ्रॉइंड, एक ड्रीम...,मायला! या पुस्तकांसाठी मुखपृष्ठ.
  • ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित लेखक दामोदर मावजो यांच्या जीव द्यावा की चहा घ्यावा या मराठी अनुवादित पुस्तकासाठी मुखपृष्ठ 2022
  • आसाराम लोमटे, गणेश मतकरी, बालाजी सुतार, प्रदीप कोकरे, प्रणव सखदेव, विवेक कुडू, प्रियांका पाटील, ऋषिकेश गुप्ते, संग्राम गायकवाड, समीर गायकवाड अशा मराठीतील नव्या पिढीतील महत्वाच्या

लेखकांच्या पुस्तकांसाठी मुखपृष्ठ आणि रेखाटने केली आहेत.

पुरस्कार [ संदर्भ हवा ]

  • व्ही.व्ही. ओक स्मृती कला पुरस्कार, १९९८
  • महाराष्ट्र राज्य कला पुरस्कार, राज्य कला प्रदर्शन, १९९८
  • पंडित सातवळेकर प्रतिष्ठान, पुणे पुरस्कार , सप्टेंबर २०१८[६]
  • प्रमोद कोपर्डे प्रतिष्ठानचा कलेसाठीचा पुरस्कार, २०१८
  • अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचा उत्कृष्ट मुखपृष्ठ पुरस्कार 2019 (वा! म्हणताना) या पुस्तकाच्या मुखपृष्ठासाठी.
  • आर्ट बिट्स संस्थेकडून देण्यात येणारा आर्टिस्ट अवॉर्ड 2020.
  • अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचा उत्कृष्ट मुखपृष्ठ पुरस्कार 2021 ( अल्लखचिन्हे या पुस्तकाच्या मुखपृष्ठासाठी)
  • अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचा उत्कृष्ट मुखपृष्ठ पुरस्कार अक्षरधारा दिवाळी अंक 2021 या अंकाच्या मुखपृष्ठासाठी.
  • छंदश्री पुणे या संस्थे कडून देण्यात येणार उत्कृष्ट मुखपृष्ठ पुरस्कार वाघूर दिवाळी अंक 2021 च्या मुखपृष्ठासाठी.
  • अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचा उत्कृष्ट मुखपृष्ठ पुरस्कार 2022 (काजवा, या मनोविकास प्रकाशन प्रकाशित पुस्तकाच्या मुखपृष्ठासाठी)

संदर्भ

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत