अँटीलिआ (इमारत)

अँटिलिया हे मुंबईच्या अल्टामाउंट रोडवर स्थित असलेले $१.६[३] अब्ज किमतीचे खाजगी निवासस्थान आहे.[४] हे नाव १५ व्या शतकातील स्पॅनिश कथांमधील एका बेटाच्या नावावरून देण्यात आले आहे.[५] भारतीय अब्जाधीश मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाचे निवासस्थान आहे.[६]

ॲन्टिलिआ
सर्वसाधारण माहिती
प्रकारवैयक्तिक रहिवासी इमारत
ठिकाणअल्टामाउंट रोड, दक्षिण मुंबई
18°58′6″N 72°48′35″E / 18.96833°N 72.80972°E / 18.96833; 72.80972
बांधकाम सुरुवात२००७
पूर्ण२०१०
ऊंची
छत१७३ मीटर (५६८ फूट)[१]
तांत्रिक माहिती
एकूण मजले२७ (पण ६० मजल्यांच्या बरोबरीचे)[२]
क्षेत्रफळ४,००,००० चौ. फूट
प्रकाशमार्ग
बांधकाम
मालकीमुकेश अंबानी
कंत्राटदारलेईटन होल्डींग्ज
वास्तुविशारदपर्किन्स ॲन्ड विल
रचनात्मक अभियंतास्टर्लिंग इंजिनिअरींग कन्सल्टन्सी प्रा. लि.

८ रिश्टर स्केलचा भूकंप ही इमारत सहन करू शकते.[७]वरचे सहा मजले खाजगी निवासी क्षेत्र आहेत. संरचनेच्या रचनेत कमळाचे रोप आणि सूर्य यांचा समावेश आहे. ही इमारत २७ मजली असून याची उंची १७३ मीटर (५६८ फूट) उंच, ६,०७० चौरस मीटर (६५,३४० चौ. फूट) इतकी आहे. यामध्ये १६८- कार गॅरेज, बॉलरूम, ९ हाय-स्पीड लिफ्ट्स, ५० आसनांचे थिएटर, टेरेस गार्डन्स, स्विमिंग पूल, स्पा, हेल्थ सेंटर, एक मंदिर यासारख्या सुविधा आहेत.[८][९]

या इमारतीचे २०२३ मधील मूल्य $४.६ अब्ज इतके आहे.[३][१०]

हे सुद्धा पहा

संदर्भ

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत